भय इथले संपत नाही ! नागपुरात दीड वर्षात तब्बल अडीचशे पेक्षाही जास्त बलात्काराच्या घटना, हजारो गुन्हे

नागपूर असं शहर आहे ज्या ठिकाणी गुन्हा घडण्यासाठी मोठं कारण लागत नाही. हत्या, बलात्कार, चोरी, डकेती सारख्या घटना नेहमीच्या झाल्या आहेत.

भय इथले संपत नाही ! नागपुरात दीड वर्षात तब्बल अडीचशे पेक्षाही जास्त बलात्काराच्या घटना, हजारो गुन्हे
प्रतिकात्मक फोटो

नागपूर : नागपुरातील गुन्हेगारी कमी करण्यासाठी आणि गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलीस वेगवेगळ्या उपाययोजना राबवत आहे. मात्र नागपूर शहरात वाढत असलेली कमी होण्याचं नाव घेताना दिसत नाही. विशेष म्हणजे लॉकडाऊनच्या काळात सुद्धा गुन्हेगारी सुरूच होती. जेव्हा सर्वजण निर्बंधांमुळे घरात होते त्या कालावधीतही तिथे हत्येच्या घटना घडल्या. त्यामुळे नागपूर शहराला क्राईम सिटी म्हटलं जातं आहे. त्यात तथ्य असल्याचं माहिती अधिकारातून मिळालेल्या माहितीवरून स्पष्ट होत आहे. नागपुरात मे 2020 ते मे 2021 या काळात घडलेल्या घटना तरी असंच दाखवत आहेत. विशेष म्हणजे या कालावधीत लॉकडाऊन आणि कडक निर्बंध होते. तरीदेखील प्रचंड गुन्ह्याच्या घटना घडल्या.

नागपुरात गुन्हा घडण्यासाठी विशेष कारणाची गरज नाही

नागपूर असं शहर आहे ज्या ठिकाणी गुन्हा घडण्यासाठी मोठं कारण लागत नाही. हत्या, बलात्कार, चोरी, डकेती सारख्या घटना नेहमीच्या झाल्या आहेत. त्यामुळे या शहराकडे गुन्हेगारीचं शहर म्हणून सुद्धा बघितलं जातं. शहर वाढत आहे त्याचप्रमाणे बाहेरून येणाऱ्यांची संख्या सुद्धा नागपुरात वाढत आहे. लॉकडाऊनच्या काळात नागरीक बाहेर पडत नसले तरी एवढे गुन्हे कसे होतात? असा प्रश्न आता उपस्थित होतोय.

काय सांगतेय आकडेवारी?

 • नागपूर शहरात 1 जानेवारी 2020 ते 31 डिसेंबर 2020 मध्ये किती गुन्हे घडले आणि 2021 च्या पाच महिन्यात किती गुन्हे घडले त्याची सविस्तर आकडेवारी :

  गुन्ह्यांचे प्रकार             2020 मधील संख्या                2021 मे पर्यंतची संख्या
  बलात्कार                    172                                                      93
  मर्डर                           97                                                        41
  आत्महत्या                   22                                                        06
  चोरी                           2066                                                   990
  डकेती                         19                                                         05
  चैन स्नॅचिंग                   24                                                         11
  इतर गुन्हे                    4544                                                   2107

2020 मध्ये नागपुरात महिला अत्याचाराच्या तब्बल 172 घटना

नागपूरमधील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहिती अधिकारातून नागपुरातील गुन्हेगारी जगताची माहिती समोर आणली आहे. 1 जानेवारी 2020 ते 31 मे 2021 या कालावधीत नागपुरातील हत्या, महिलांवरील अत्याचार, चोरी, सोनसाखळी चोरी, किडनॅपिंग अशा अनेक गुन्ह्यांची माहिती मागवली होती. नागपूर पोलिसांच्या गुन्हे शाखेनं दिलेल्या माहितीनुसार 2020 मध्ये नागपुरात महिला अत्याचाराच्या तब्बल 172 घटना समोर आल्या होत्या. तर 2021 च्या सुरुवातीच्या 5 महिन्यात हा आकडा 93 आहे. हत्येच्या घटनांची आकडेवारीही तितकीच धक्कादायक आहे. नागपुरात 2020 मध्ये 97 हत्या झाल्या होत्या. तर हा आकडा 2021 च्या सुरुवातीच्या 5 महिन्यात 41 इतका आहे.

2021 च्या पाच महिन्यातही गुन्हेगारीत वाढ

आपण या आकड्यांवर नजर टाकली तर 2020 मध्ये वर्षभरात झालेले गुन्हे आणि 2021 मध्ये पाच महिन्यातील गुन्हे बघितले तर त्यात सरासरी वाढ झाल्याचे चित्र पाहायला मिळते. त्यामुळे आता तरी नागपुरातील गुन्हेगार संपविण्याचा बेडा हाती घेण्याची गरज आहे (large amount of Crime incidents took place in Nagpur even during the lockdown period).

संबंधित बातम्या :

उपराजधानी की क्राईम राजधानी? नागपुरात महिन्याला सरासरी 8 हत्या, तर 18 महिला अत्याचाराच्या घटना

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI