अकोला : जावयाने सासूची हत्या (Mother in Law Murder) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. वाद विकोपाला गेल्याने जावयाने टोकाचं पाऊल उचललं. जावईबापूंनी आपल्या 60 वर्षीय सासूला विहिरीत फेकल्याचं समोर आलं आहे. 80 फूट खोल विहिरीत पडल्यामुळे सासूबाईंचा मृत्यू झाला. अकोला (Akola Crime) जिल्हातल्या बाळापूर तालुक्यातल्या वाडेगावमध्ये हा प्रकार घडल्याची माहिती आहे. या घटनेनंतर आरोपी जावई फरार झाला आहे. आरोपीचा दोन वर्षांचा चिमुकला मुलगा घाबरुन तिथून पळाला, त्यामुळे त्याचा जीव वाचल्याचं बोललं जात आहे. चिमुरड्यानेच हा प्रकार कुटुंबीयांना सांगितला. शेताची रखवाली करण्यावरुन वृद्धेचा जावयासोबत वाद झाला होता. याच कारणावरुन 35 वर्षीय जावयाने सासूचा जीव घेतल्याचा आरोप केला जात आहे. पोलीस आरोपी जावयाच शोध घेत आहेत.