बहिणीकडून ओवाळणीनंतर निघालेल्या दादाला अपघात, रात्रभर नाल्यात पडून, सकाळी मृत्यू

जखमी अवस्थेत रात्रभर दोघेही नाल्यात पडून राहिल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला असावा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. राकेश केवळराम देशमुख (वय 28 वर्ष) आणि महेश जगदीश कामथे (वय 32 वर्ष) अशी मृत्युमुखी पडलेल्या तरुणांची नावे आहेत.

बहिणीकडून ओवाळणीनंतर निघालेल्या दादाला अपघात, रात्रभर नाल्यात पडून, सकाळी मृत्यू
भंडाऱ्यात बाईक अपघातात दोघांचा मृत्यू


तेजस मोहतुरे, टीव्ही 9 मराठी, भंडारा : बहिणीकडून भाऊबीजेची ओवाळणी करुन गावी परत येत असताना भावांवर काळाने घाला घातला. मोटारसायकल नाल्यात पडून झालेल्या अपघातात दोघा तरुणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे. भंडारा जिल्ह्याच्या लाखनी तालुक्यातील रेंगेपार (कोहळी) येथे हा अपघात घडला असून आज सकाळी उघडकीस आला. या घटनेमुळे बहिणीसह संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

जखमी अवस्थेत रात्रभर दोघेही नाल्यात पडून राहिल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला असावा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. राकेश केवळराम देशमुख (वय 28 वर्ष) आणि महेश जगदीश कामथे (वय 32 वर्ष) (दोघेही रा. रेंगेपार (कोहळी) ता. लाखनी) अशी या बाईक अपघातात मृत्युमुखी पडलेल्या तरुणांची नावे आहेत.

नेमकं काय घडलं?

भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यातील शिवनीबांध येथे हे दोघे तरुण महेशच्या बहिणीच्या घरी शुक्रवारी गेले होते. भाऊबिजेची ओवाळणी करुन रात्री मोटरसायकलने भुगाव मार्गे ते गावी परत येत होते. यावेळी मोटरसायकलवरील नियंत्रण गेल्याने रस्त्याच्या कडेला असलेल्या नालीत दोघेही मोटरसायकलसह कोसळले.

रात्रभर नाल्यात पडून राहिल्याने मृत्यू

रात्रीची वेळ असल्याने कुणालाही अपघाताची माहिती मिळाली नाही. दोघेही रात्रभर नाल्यात पडून राहिल्याने त्यांचा मृत्यू झाला. आज (शनिवारी) सकाळी हा प्रकार लक्षात आला. गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली असता दोघेही मृतावस्थेत आढळून आले आहेत. या अपघाताची माहिती पोलिसांना देण्यात आली असून पोलिसांनी घटनास्थळ गाठत पंचनामा सुरु केला आहे. मृत तरुणांचे शव पोस्टमार्टम करण्यासाठी लाखनी ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. या घटनेमुळे बहिणींसह संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

संबंधित बातम्या :

“हॅलो पोलीस स्टेशन? माझा बॉयफ्रेण्ड माझ्याशी बोलत नाहीये” व्याकुळ प्रेयसीला पोलिसांचं उत्तर काय?

24 वर्षीय पुतण्या नवविवाहित काकीच्या प्रेमात, दोघं घरातून रफूचक्कर, काका म्हणतो मी तिला एकदाच…

प्रेम विवाहाचा राग, पित्याकडून पोटच्या मुलीची बलात्कार करुन हत्या, आता जावयाने आयुष्य संपवलं

 

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI