AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तुम्हाला केवायसीसाठी फोन येत असेल तर सावधान? सेवा निवृत्त प्राध्यापकावर ऑनलाईन दरोडा

केवायसीच्या नावावर एका अज्ञात भामट्याने सेवानिवृत्त प्राध्यापकाची 4 लाख 15 हजार 599 रुपयांना ऑनलाईन फसवणूक केल्याची घटना घडली आहे. सेवानिवृत्त प्राध्यापकाच्या तक्रारीवरुन भंडारा जिल्ह्याच्या पवनी पोलिसांनी या बाबात तक्रार दाखल केली आहे.

तुम्हाला केवायसीसाठी फोन येत असेल तर सावधान? सेवा निवृत्त प्राध्यापकावर ऑनलाईन दरोडा
एसबीआय बँक
| Edited By: | Updated on: Oct 08, 2021 | 12:44 PM
Share

भंडारा : केवायसीच्या नावावर सेवानिवृत्त प्राध्यापकाचे 4 लाख 15 हजार रुपये लंपास केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी भंडारा जिल्ह्यातील पवनी पोलिसात फसवणुकीची तक्रार दाखल करण्यात आली आहे. तुम्हालाही केवायसी अपडेट करण्यासाठी फोन येत असतील, तर ही सावधान करणारी घटना आहे.

काय आहे प्रकरण?

केवायसीच्या नावावर एका अज्ञात भामट्याने सेवानिवृत्त प्राध्यापकाची 4 लाख 15 हजार 599 रुपयांना ऑनलाईन फसवणूक केल्याची घटना घडली आहे. सेवानिवृत्त प्राध्यापकाच्या तक्रारीवरुन भंडारा जिल्ह्याच्या पवनी पोलिसांनी या बाबात तक्रार दाखल केली आहे.

स्टेट बँकेत सॅलरी अकाऊण्ट

भंडारा जिल्ह्यातील चिमूर तालुक्यातिल चिंचाळा येथील बबन हरी मुन हे सेवानिवृत्त प्राध्यापक आहेत. त्यांच्या पवनी येथे स्टेट बँक ऑफ इंडिया येथे खाते आहे. या खात्यावर त्यांचा पगार आणि पेंशन जमा होत असे.

एका अज्ञात भामट्याने त्यांना फोन करत केवायसी फॉर्म भरण्याकरता खाते क्रमांक, एटीएम क्रमांक आणि आधार नंबर मागून त्यांच्या खात्यातून 4 लाख 15 हजार 599 रुपये ऑनलाईन काढून फसवणूक केली. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पवनी पोलिस स्टेशन गाठत त्यांनी तक्रार नोंद केली असून पवनी पोलिसांनी पुढील तपास सायबर सेल भंडारा येथे वर्ग केला आहे.

तोतया आयकर अधिकाऱ्याचा सराफाला गंडा

याआधी, भंडारा शहरात तोतया आयकर अधिकाऱ्याने सराफा व्यापाऱ्याला गंडा घातला होता. सोन्याची खरेदीचे ऑनलाईन पैसे पाठवल्याचे बनावट स्क्रीनशॉट दाखवत फसवणूक करण्यात आली होती. फसवणुकीच्या नव्या फंड्यामुळे पोलिससुद्धा अचंबित झाले आहेत.

काय आहे प्रकरण?

आयकर अधिकारी असल्याचे सांगत एका भामट्याने भंडाऱ्यातील एका सराफा व्यापाऱ्याला 1 लाख 80 हजार रुपयांनी गंडवले आहे. ही लूट त्याने मोबाईलवरुन ऑनलाईन पद्धतीने पैसे पाठवल्याचा स्क्रीनशॉट दाखवून केली आहे. ही घटना भंडारा येथील अनादिनारायण ज्वेलर्समध्ये घडली. या प्रकरणी भंडारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या फसवणुकीच्या नव्या फंड्यामुळे पोलिससुद्धा अचंबित झाले आहेत.

नेमकं काय घडलं?

भंडारा येथील मेन लाईनमध्ये कमला हाऊसमध्ये अनादिनारायण ज्वेलर्स आहे. त्यांच्या दुकानात आलेल्या ग्राहकाने आपण आयकर अधिकारी असल्याचे खोटे सांगितले. सोने खरेदी करायचे आहे, असे सांगत त्याने सोन्याची चेन आणि अंगठीची पाहणी केली. सोन्याची चेन आणि दोन अंगठ्या (वजन 27.49 ग्रॅम) खरेदी केल्या.

पैसे पाठवल्याचा खोटा स्क्रीनशॉट

एकूण किमतीपैकी 1 लाख 80 हजार रुपये ऑनलाईन पद्धतीने मोबाईलवरुन करण सोनी यांच्या मोबाईलवर पाठवले. पैसे पाठवल्याचा स्क्रीनशॉटही दाखवण्यात आला. त्यावर विश्वास ठेवून 25.490 ग्रॅम सोन्याची चेन देण्यात आली, तर अंगठ्या रविवारी घेऊन जाईन, असे त्याने सांगितले. खरेदीचे बिलही रविवारीच घेऊन जाईन, असे सांगून तो निघून गेला.

अकाऊंटमध्ये पैसेच ट्रान्सफर नाहीत

काही वेळाने सोनी यांनी आपले अकाऊंट स्टेटमेंट चेक केले असता, त्यात कोणतीच रक्कम जमा झाली नसल्याचे दिसून आले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच, त्यांनी त्याचा शोध घेतला, परंतु तो आढळून आला नाही. अखेर रात्री भंडारा पोलीस ठाणे गाठून तक्रार देण्यात आली. त्यावरुन पोलिसांनी तोतया आयकर अधिकारी संतोष पी. नावाच्या व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. भंडारा शहर पोलिस त्याच्या शोध घेत आहेत.

संबंधित बातम्या :

सोन्याची चेन घेत ऑनलाईन पैसे पाठवल्याचा बनाव, तोतया आयकर अधिकाऱ्याचा 1.8 लाखांना गंडा

पुण्यात पु. ना. गाडगीळ ज्वेलर्सला 1 कोटी 60 लाखांचा गंडा, गुन्हा दाखल

सातारा-पंढरपूर एसटीवर दरोडा प्रकरण, 4 जणांवर गुन्हा

लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.