VIDEO | मद्यधुंद पोस्टमास्तर ग्राहकाला भिडला, कार्यालयातच फ्री स्टाईल हाणामारी

गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगावच्या टपाल कार्यालयातील पोस्टमास्तर श्री सयाम हे कार्यालयात थांबत नसून नेहमीच मद्यपान करुन येत असल्याची तक्रार केली जाते. कार्यालयात असून सुद्धा ग्राहकांची कामे करत नाहीत, अशा स्वरुपाच्या अनेक तक्रारी त्यांच्याविरोधात होत्या.

VIDEO | मद्यधुंद पोस्टमास्तर ग्राहकाला भिडला, कार्यालयातच फ्री स्टाईल हाणामारी
गोंदियात पोस्टमास्तरची हाणामारी
शाहिद पठाण

| Edited By: अनिश बेंद्रे

Sep 03, 2021 | 1:51 PM

गोंदिया : प्रशासनातील कर्मचारी अभ्यंगताशी उद्धटपणे वागणे हे काही नवीन नाही, पण चक्क पोस्टमास्तरच त्यांच्याकडे आलेल्या ग्राहकांशी मारामारी करत असेल तर? पोस्टमास्तरने चक्क मद्यधुंद अवस्थेत ग्राहकाशी फ्री स्टाईल हाणामारी केल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. गोंदिया जिल्ह्यातील ही घटना सर्वत्र चर्चेचा विषय ठरत असून सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

काय आहे प्रकरण?

गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगावच्या टपाल कार्यालयातील पोस्टमास्तर श्री सयाम हे कार्यालयात थांबत नसून नेहमीच मद्यपान करुन येत असल्याची तक्रार केली जाते. कार्यालयात असून सुद्धा ग्राहकांची कामे करत नाहीत, अशा स्वरुपाच्या अनेक तक्रारी त्यांच्याविरोधात होत्या.

ग्राहकाशी वादानंतर हाणामारी

आता त्यांचा मद्यधुंद अवस्थेत फ्री स्टाईल मारामारीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ग्राहकाशी कुठल्यातरी कारणावरुन वाद झाल्यानंतर सयाम थेट मारामारीवर उतरले. त्यामुळे त्यांच्यावर कोणती कारवाई होणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

पाहा व्हिडीओ :

अंबरनाथमध्ये भररस्त्यात मद्यधुंद तरुणीचा धिंगाणा

दुसरीकडे, एका मद्यधुंद तरुणीने भररस्त्यात धिंगाणा घातल्याचा प्रकार अंबरनाथमध्ये घडला आहे. या प्रकाराचा व्हिडीओ सुद्धा व्हायरल झाला आहे. तरुणीने रस्त्यावरून जाणाऱ्या काही जणांना शिवीगाळ केली. अखेर तासाभराच्या तमाशानंतर ही तरुणी तिच्या मित्रासोबत निघून गेली.

नेमकं काय घडलं?

अंबरनाथ पूर्व भागातील गोविंद पूल ते लोकनगरी या दरम्यान झालेल्या नवीन रस्त्यावर हा प्रकार घडला. गुरुवारी रात्री एक तरुण आपल्या परिवारासह या रस्त्यावरून कारने जात होता. यावेळी अचानक एक तरुणी गाडीसमोर आली आणि गाडीवर हात आपटत शिवीगाळ करू लागली. त्यामुळे या तरुणाने तिला समजावण्याचा प्रयत्न केला, मात्र तरुणी पूर्णपणे नशेत होती.

रस्त्यावरून जाणाऱ्यांना शिवीगाळ

यानंतर या तरुणीने रस्त्यावरून जाणाऱ्या आणखी काही जणांना शिवीगाळ केली. अखेर तासाभराच्या तमाशानंतर ही तरुणी तिच्या मित्रासोबत निघून गेली. मात्र हा संपूर्ण धिंगाणा मोबाईल कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे. हा प्रकार तासभर सुरु असतानाही पोलीस मात्र तरुणी निघून गेल्यानंतर घटनास्थळी दाखल झाले आणि रिकाम्या हाती परतले.

पुण्यातही मद्यधुंद तरुणीचा धिंगाणा

याआधी, मद्यधुंद तरुणीने पुण्यात भररस्त्यात धिंगाणा घातल्याचा प्रकार समोर आला होता. गजबजलेल्या टिळक रस्त्यावरील हिराबाग चौकात तरुणीने अक्षरशः धिंगाणा घातला होता. रस्त्यावर झोपून तिने वाहतूक अडवण्याचा प्रयत्न केला होता. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तरुणीची समजूत काढण्याचा प्रयत्न केला होता. रात्री 11 वाजताच्या सुमारास ही घटना घडली होती. टिळक रस्त्यावरील हिराबाग चौकात तरुणीने घातलेल्या धिंगाण्याची सर्वत्र चर्चा रंगली होती.

संबंधित बातम्या

VIDEO | पुण्यात मद्यधुंद तरुणीचा धिंगाणा, टिळक रोडवर झोपून गाड्या अडवण्याचा प्रयत्न

VIDEO | अंबरनाथमध्ये भररस्त्यात मद्यधुंद तरुणीचा धिंगाणा, पादचाऱ्यांना शिवीगाळ

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें