गुजरातमधील व्यापाऱ्याचे अपहरण करुन फरार, नागपूर पोलिसांच्या जाळ्यात सापडला

आरोपी कितीही चतूर असता तरी तो पोलिसांच्या तावडीतून सुटू शकत नाही (Nagpur Police Arrest Kidnapper)

गुजरातमधील व्यापाऱ्याचे अपहरण करुन फरार, नागपूर पोलिसांच्या जाळ्यात सापडला
Follow us
| Updated on: Feb 03, 2021 | 10:13 PM

नागपूर : गुजरातमध्ये व्यापाऱ्याचे अपहरण करुन फरार झालेल्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. या आरोपीकडून तब्बल 22 लाख रोख आणि इतर साहित्य सुद्धा जप्त करण्यात आले आहे. नागपूरच्या बेलतरोडी पोलिसांनी ही कारवाई केली आहे. (Nagpur Police Arrest Kidnapper)

गुजरातच्या गांधीधाममध्ये एका व्यापाऱ्याचे अपहरण केले होते. या गुन्ह्यातील कुख्यात आरोपी मनोज नंदकिशोर हा फरार होता. यानंतर गुजरात पोलिसांना आरोपीबद्दलची गुप्त माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे त्यांनी नागपूर पोलिसांना ही माहिती दिली.

एक कुख्यात आरोपी राजस्थानवरून बेंगलोरकडे i20 कारने निघाला असून तो नागपूर मार्गे प्रवास करत आहे, अशी माहिती नागपूर पोलिसांना मिळाली होती. या माहितीवरुन पोलिसांनी पांजरी टोल नाक्याजवळ सापळा रचला. यानंतर आरोपीला अटक करण्यात आली.

यानंतर पोलिसांनी त्याची चौकशी केली असता त्याने उडवाउडवीची उत्तर देण्यास सुरुवात केली. मात्र पोलिसांनी त्याची झडती घेतली असता त्याच्याजवळ चार मोबाईल सापडले. त्यानंतर एक बॅग उघडली असता त्यात 22 लाख रुपयांची रोख रक्कम आढळली. यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

आरोपीने ती रक्कम अपहरण केलेल्या व्यापारी कडून घेतलेली होती की आणखी कुठून याचा तपास आता गुजरात पोलीस करेल. मात्र आरोपी कितीही चतूर असता तरी तो पोलिसांच्या तावडीतून सुटू शकत नाही, हे पुन्हा  एकदा सिद्ध झाले आहे.  (Nagpur Police Arrest Kidnapper)

संबंधित बातम्या : 

आत्महत्या केलेल्या मुलीला पुरुन बेपत्ता असल्याचा कांगावा, आई-वडिलांचा बनाव दहा वर्षांनी उघड

‘क्राईम पेट्रोल’, ‘दृश्यम’चा इफेक्ट, खेळताना पुन्हा पुन्हा ‘राज्य’ आल्यानं मित्राला गाडलं; 13 वर्षीय मुलाला अटक

अवघ्या 400 रुपयांसाठी दोन मित्रांमध्ये हाणामारी, एकाचा मृत्यू, थरार सीसीटीव्हीत कैद

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.