नालासोपाऱ्यात पूर्ववैमनस्यातून दोघांवर गोळीबार, एक जण गंभीर जखमी

नालासोपारा पुर्वेच्या मोरेगाव येथे अज्ञातांनी दोघांवर गोळीबार केल्याची घटना घडली.

  • Updated On - 11:38 am, Mon, 15 February 21 Edited By: अनिश बेंद्रे
नालासोपाऱ्यात पूर्ववैमनस्यातून दोघांवर गोळीबार, एक जण गंभीर जखमी

नालासोपारा : नालासोपारा पुर्वेच्या मोरेगाव येथे अज्ञातांनी दोघांवर गोळीबार केल्याची घटना घडली (Nalasopara Shooting By Unknown). रविवारी रात्री पुर्ववैमन्यासातून ही घटना घडल्याची माहिती आहे. यावेळी आरोपींनी गावठी कट्ट्यातून गोळीबार केला. यात एक जण गंभीर जखमी झाला आहे. अज्ञात हल्लेखोर ज्युपीटर गाडीवर आल्याची माहिती आहे (Nalasopara Shooting By Unknown).

नालासोपारा पूर्व मोरेगांव परिसरातही “q अँड q” बारच्या समोर रात्री साडे नऊच्या सुमारास तीन अज्ञातांनी दोन जणांवर चाकूने डोक्यावर वार केले. तसेच, त्यांच्यावर चार राऊंड फायर केले आहेत. यात दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना जवळच्याच खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

हा हल्ला पुर्ववैमन्यासातून ही घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. या प्रकरणी तुळिंज पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला आहे. आरोपींना शोधण्यासाठी दोन विशिष्ट पथके देखील नेमण्यात आली आहेत. रहदारीच्या मुख्य रस्त्यावर हा हल्ला झाल्याने परिसरात तणाव पूर्ण शांतता निर्माण झाली आहे (Nalasopara Shooting By Unknown).

या प्रकरणात बळीराम गुप्ता याला दोन गोळ्या लागल्या तर राजकुमार गुप्ता याच्यावर कोयत्याने वार करण्यात आले. गुप्ता याला प्राथमिक उपचारासाठी पालिकेच्या तुळिंज रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी कांदिवलीच्या शताब्दी रुगणालयात हलविण्यात आले आहे. जखमी गुप्ता याची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे, असं पोलिसांनी सांगितलं.

Nalasopara Shooting By Unknown

संबंधित बातम्या :

जुन्या प्रेमावरुन वाद, रागाच्या भरात प्रियकराकडून चाकूने वार, महिलेची प्रकृती नाजूक

आईची नजर हटताच भामट्याने चिमुकलीला पळवलं, 24 तास उलटूनही शोध नाही

धावत्या ट्रेनच्या टॉयलेटमध्ये मैत्रीणीवर बलात्कार, ठाण्यात 19 वर्षीय तरुणावर गुन्हा

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI