धावत्या ट्रेनच्या टॉयलेटमध्ये मैत्रीणीवर बलात्कार, ठाण्यात 19 वर्षीय तरुणावर गुन्हा

आरोपी तरुण आणि पीडित तरुणी दोघेही गोरखपूर एक्स्प्रेसने एकत्र प्रवास करत होते. (Thane Raping Girl in Train Toilet)

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 14:29 PM, 14 Feb 2021
धावत्या ट्रेनच्या टॉयलेटमध्ये मैत्रीणीवर बलात्कार, ठाण्यात 19 वर्षीय तरुणावर गुन्हा
Crime-News

ठाणे : धावत्या ट्रेनच्या टॉयलेटमध्ये मैत्रीणीवर बलात्कार केल्याप्रकरणी 19 वर्षीय तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. व्हॅलेंटाईन्स डेच्या पूर्वसंध्येला म्हणजेच शनिवारी हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी ठाणे पोलिसांनी तरुणावर गुन्हा दाखल केला आहे. (Thane Cops Book 19 Years Old Boy for allegedly Raping Girl in Train Toilet)

आरोपी तरुण आणि पीडित तरुणी दोघेही गोरखपूर एक्स्प्रेसने एकत्र प्रवास करत होते. यावेळी तरुणाने पीडितेला स्वच्छतागृहात नेले आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केला, असा आोप केला जात आहे. बुधवारी सकाळी सात वाजता ही घटना घडल्याचा आरोप बलात्कार पीडितेने केला आहे.

तरुणीच्या तक्रारीवरुन मुंबईतील कुरार पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला. त्यानंतर तो ठाणे रेल्वे पोलिसात वर्ग करण्यात आला. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत असून अद्याप कोणालाही अटक झाली नसल्याची माहिती पोलिसांनी दिली.

पाच महिन्यात 17 जणांचा बलात्कार

अल्पवयीन तरुणीवर पाच महिन्यांच्या कालावधीत तब्बल 17 जणांनी बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार काही दिवसांपूर्वी कर्नाटकात उघडकीस आला होता. विशेष म्हणजे मुलीची मावशीच या प्रकरणात मुख्य आरोपी असल्याचं समोर आलं. पीडितेचे फोटो, व्हिडीओ काढून ब्लॅकमेलिंगनंतर तिच्यावर लैंगिक अत्याचाराची मालिका सुरु झाली होती.

कर्नाटकातील चिकमंगळुरु जिल्हा बालकल्याण समितीच्या सभापतींनी 30 जानेवारीला 17 जणांविरोधात बलात्कार आणि लैंगिक अत्याचाराची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल केली होती. अतिरिक्त पोलीस अधीक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार 15 वर्षांच्या मुलीवर पाच महिने 17 जणांकडून बलात्कार आणि लैंगिक अत्याचार करण्यात आले.

बसचालकाशी ओळख, मित्रांकडून अत्याचार

पीडित तरुण दगड फोडणाऱ्या कंपनीत काम करत असताना तिची ओळख गिरीश नावाच्या बस चालकासोबत झाली. त्याने तिच्यावर बलात्कार आणि लैंगिक अत्याचार केले. गिरीशने तिचा नंबर अभी नावाच्या आरोपीला दिला. अभीने तिच्यावर लैंगिक अत्याचार करुन तिचे फोटो, व्हिडीओ काढले आणि ब्लॅकमेल करायला सुरुवात केली. त्यानंतर त्याच्या मित्रांनीही पीडितेवर बलात्कार केल्याची माहिती पोलिसांनी दिली.

संबंधित बातम्या :

आधी हत्या, नंतर मृतदेह जाळण्याचा प्रयत्न; माजी नगरेवकाच्या आईच्या खुनामुळे परिसरात खळबळ

नागपूरचा बाबा, लंडनची मैत्रिण, फेसबुकवर मैत्री, थेट खिशाला कात्री !

(Thane Cops Book 19 Years Old Boy for allegedly Raping Girl in Train Toilet)