दरोड्याच्या तयारीत असलेल्या दोघांना बेड्या, नांदेड पोलीसांची कारवाई, पिस्तुल, जिवंत काडतुसं जप्त!

गोपनीय माहितीवरून त्यांनी तरोडा खुर्द परिसरातील खंडोबा चौक भागात शिव रोडवर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या दोघांना अटक केली.

दरोड्याच्या तयारीत असलेल्या दोघांना बेड्या, नांदेड पोलीसांची कारवाई, पिस्तुल, जिवंत काडतुसं जप्त!
नांदेडमध्ये अटक करण्यात आलेला आरोपी आणि जप्त केलेलं साहित्य Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jun 16, 2022 | 5:03 PM

नांदेडः नांदेडमध्ये दरोड्याच्या (Nanded Robbery) तयारीत असलेल्या दोघांना पिस्तूलासह पोलिसांनी अटक केली आहे. भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडला. तरोडा खुर्द भागात पोलिसांनी (Nanded police) ही कारवाई केली. त्यांच्याकडून एक पिस्तुल (Pistol) आणि अंदाजे बारा जिवंत काडतुसं जप्त करण्यात आली. बुधवारी रात्रीच्या सुमारास हा शस्त्रसाठा घेऊन दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या पाच जणांना पकडण्याचा पोलिसांनी प्रयत्न केला. मात्र यापैकी दोघांना पकडण्यात आलं तर तीघेजण अंधाराचा फायदा घेऊन फरार झाले. या प्रकरणी दोघांसह फरार तीन जणांविरुद्ध दरोडा टाकण्याचा प्रयत्न व इतर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

बियाणींच्या हत्येपासून दहशतीचं वातावरण

नांदेडमधील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांच्या हत्येनंतर शहरात दहशतीचं वातावरण आहे. नागरिकांमधील भीती घालण्यासाठी पोलिसांनी शहरात अवैध अग्निशस्त्र रायफल वापर करून दहशत पसरवण्याचा प्रयत्न करणाऱ्या गुन्हेदारी व्यक्तींना अटक करण्यास सुरुवात केली आहे. यापैकीच एका कारवाईत सदर दोघांना अटक करण्यात आली.

हे सुद्धा वाचा

भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतला प्रकार

पोलीस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक निलेश मोरे, उपविभागीय पोलीस अदिकारी चंद्रसेन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील सर्वच ठाणे प्रभारी रात्रीची गस्त मोठ्या प्रमाणात घालत आहेत. गोपनीय माहितीवरून त्यांनी तरोडा खुर्द परिसरातील खंडोबा चौक भागात शिव रोडवर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या दोघांना अटक केली. या कारवाईत त्यांनी रवी नारायणसिंग ठाकूर ऊर्फ लाला आणि आनंद यादव या दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून एक पिस्तूल, काही जिवंत काडतूस, मोबाइल आणि दुचाकी असा ऐवज जप्त केला गेला.

Non Stop LIVE Update
ठाकरेंचे किती आमदार अन् खासदार संपर्कात? सामंतांनी थेट आकडा सांगितला
ठाकरेंचे किती आमदार अन् खासदार संपर्कात? सामंतांनी थेट आकडा सांगितला.
माझ्यावर मताचा पाऊस पाडा, मी तुमच्यावर...भरपवसात पंकजा मुंडेंची बॅटींग
माझ्यावर मताचा पाऊस पाडा, मी तुमच्यावर...भरपवसात पंकजा मुंडेंची बॅटींग.
ठाकरेंना राजीनामा देण्यास कुणी भाग पाडलं? सेनेच्या नेत्याचा गौप्यस्फोट
ठाकरेंना राजीनामा देण्यास कुणी भाग पाडलं? सेनेच्या नेत्याचा गौप्यस्फोट.
गरिबांच्या मुलांना मराठीतून...सोलापुरातील सभेत मोदींनी सांगितलं स्वप्न
गरिबांच्या मुलांना मराठीतून...सोलापुरातील सभेत मोदींनी सांगितलं स्वप्न.
त्यांनी मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला, उदय सामंत यांचा गंभीर आरोप
त्यांनी मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला, उदय सामंत यांचा गंभीर आरोप.
मोठ्या मनाचा माणूस...राज ठाकरेंच कौतुक करत शिंदेंचा ठाकरेंना खोचक टोला
मोठ्या मनाचा माणूस...राज ठाकरेंच कौतुक करत शिंदेंचा ठाकरेंना खोचक टोला.
उबाठा म्हटलं की उलटी आल्यासारखं... राणेंची खोचक टीका, बघा काय म्हणाले?
उबाठा म्हटलं की उलटी आल्यासारखं... राणेंची खोचक टीका, बघा काय म्हणाले?.
शरद पवार यांना भाजप देणार मोठा धक्का? तरुण, तडफदार नेतृत्व साथ सोडणार?
शरद पवार यांना भाजप देणार मोठा धक्का? तरुण, तडफदार नेतृत्व साथ सोडणार?.
कुणाची तरी 200 एकर जमीन लखनऊमध्ये जप्त, लवकरच... शिंदेंचा रोख कुणावर?
कुणाची तरी 200 एकर जमीन लखनऊमध्ये जप्त, लवकरच... शिंदेंचा रोख कुणावर?.
मुख्यमंत्रीपदासाठी दुसऱ्यांच्या मांडीवर... मनसे नेत्याची ठाकरेंवर टीका
मुख्यमंत्रीपदासाठी दुसऱ्यांच्या मांडीवर... मनसे नेत्याची ठाकरेंवर टीका.