गुजरातमधील आरोपी तब्बल 12 वर्षांपासून फरार, शेवटी सापडला नाशिकच्या आसाराम बापूंच्या आश्रमात !

गुजरातमधील एका गुन्ह्यात वॉन्टेड असलेला आरोपी नाशिकच्या आसाराम बापू आश्रमात सापडला आहे. हा आरोपी बारा वर्षांपासून गुजातमधून फरार होता. संजय वैद्य असं आरोपीचं नाव आहे.

गुजरातमधील आरोपी तब्बल 12 वर्षांपासून फरार, शेवटी सापडला नाशिकच्या आसाराम बापूंच्या आश्रमात !
प्रातिनिधिक फोटो

नाशिक : गुजरातमधील एका गुन्ह्यात वॉन्टेड असलेला आरोपी नाशिकच्या आसाराम बापू आश्रमात सापडला आहे. हा आरोपी बारा वर्षांपासून गुजातमधून फरार होता. संजय वैद्य असं आरोपीचं नाव आहे. गुजरात पोलिसांनी आसाराम बापू आश्रमात येऊन त्याला अटक केली आहे. (accused for Gujarat has been found nashik Asaram Bapu Ashram was hiding since 12 years)

आरोपी आसाराम बापू आश्रमात लपून बसला

मिळालेल्या माहितीनुसार गुजरातमधील संजय वैद्य नावाचा व्यक्ती एका आरोपात वॉन्टेड होता. गुजरात पोलीस त्याचा शोध घेत होते. मागील बारा वर्षांपासून हा आरोपी गुजरातमधून पळालेला होता. सध्या तो नाशिकमधील आसाराम बापू आश्रमात लपून बसला होता. ही माहिती मिळताच गुजरात पोलिसांनी नाशिकला येऊन आरोपी संजयच्या मुसक्या आवळल्या.

वैद्यचे आपहरण करण्यात आल्याचा सेवेकऱ्यांचै गैरसमज

मात्र, गुजरात पोलिसांनी आरोपीला पकडल्यानंतर आश्रमातील सेवेकऱ्यांना गैरसमज झाला होता. मागील अनेक दिवसांपासून आश्रमात राहणाऱ्या संजय वैद्यचे अपहरण करण्यात आल्याचे सेवेकऱ्यांना वाटले होते. याच शंकेपोटी त्यांनी पोलिसांत वैद्य या आरोपीचं अपहरण झाल्यांची तक्रार दिली होती.

अपहरणकर्ते नसून ते गुजरातचे पोलीस  

सेवेकऱ्यांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार नाशिक पोलिसांनी तपास सुरु केला होता. तपासात संजय वैद्यला इनोव्हा गाडीमधून चार लोक घेऊन गेल्याचे पोलिसांना समजले होते. याच चार जणांनी वैद्यचे अपहरण केल्याचा संशय नाशिक पोलिसांना आला होता. मात्र, तपास केल्यानंतर इनोव्हा गाडीमध्ये वैद्यला घेऊन गेलेले जार जण अपहरणकर्ते नसून गुजरातचे पोलीस असल्याचे तपासातून उघड झाले. दरम्यान, नाशिकच्या आसाराम बापू आश्रमातून पकडण्यात आलेला आरोपी गुजरात पोलिसांच्या ताब्यात आहे.

इतर बातम्या :

नागपुरात सराईत गुन्हेगाराची हत्या, 450 रुपयांच्या उधारीतून जीव गमावला

रेल्वे रुळांवरील मृतदेहाचं गूढ सीसीटीव्हीने उलगडलं, लग्नाचा तगादा लावल्याने प्रेयसीची हत्या

मंदिरात जाताना पहाटे धारदार शस्त्राने हत्या, विरारच्या बिल्डरच्या हत्येचं गूढ उलगडलं

(accused for Gujarat has been found nashik Asaram Bapu Ashram was hiding since 12 years)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI