AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हिंगोलीत फटाक्यांच्या साठ्याला भीषण आग; २ जणांचा मृत्यू, १५ ते १६ जण गंभीर जखमी, अग्निशमन दलाची गाडी जळून खाक

Hingoli Fire News: हिंगोलीत फटाक्यांच्या आगीची मोठी दुर्घटना घडली आहे. या घटनेत २ जणांचा मृत्यू झाला आहे. अनेक जण जखमी आहेत.

हिंगोलीत फटाक्यांच्या साठ्याला भीषण आग; २ जणांचा मृत्यू, १५ ते १६ जण गंभीर जखमी, अग्निशमन दलाची गाडी जळून खाक
| Updated on: Oct 05, 2026 | 9:52 PM
Share

हिंगोलीतून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. हिंगोलीत आगीची घटना घडली आहे. फटाके व्यापाऱ्याच्या घरी ठेवलेल्या फटाक्याला आग लागल्याची घटना घडली आहे. या घटनेत २ जणांचा मृत्यू झाला आहे. तर १५ ते १६ जण गंभीर जखमी झाले आहेत. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या आहेत. अग्निशमन दलाकडून बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हिंगोली शहरातील कपडा गल्लीतील गोपाल बासटवार यांच्या घरात असलेल्या फटाक्याला आग लागली. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या आहेत. आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. या आगीत 15 ते 16 जण जखमी झाले आहेत. तर या घटनेत दोघांचा होरपळून मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. कपडा मार्केटमध्ये लागलेल्या भीषण आगीमध्ये अग्निशमन दलाची गाडी जळून खाक झाली आहे.

या घटनेत बचावकार्य करत असताना अग्निशमन दलाचा कर्मचारीही भाजल्याचे दिसून आले आहे. त्यांना उपचारासाठी लातूर येथे रवाना करण्यात आले आहे. हिंगोली जिल्ह्यातील सर्व अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. आग आटोक्यात झाली असली तरी परिस्थिती गंभीर आहे. मृत्यूचा आकडा वाढण्याची आमदार बांगर यांनी भीती व्यक्त केली आहे. ओट्यावर पडलेले दोन मृतदेह आम्ही उचलले, अशी आमदार संतोष बांगर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Follow Us
कल्याणमध्ये भरधाव कारचा थरार; संतप्त नागरिकांनी केली तोडफोड
Kalyan : कल्याणच्या सहजानंद चौकात भरधाव कारचा थरार; संतप्त नागरिकांनी केली तोडफोड, नेमकं काय घडलं?
पूर्णेकर प्रकरणात मोठा खुलासा; पप्या शिंदे-संतोष कनोजियाने रचला कट
Pradeep Purnekar : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठा खुलासा; पप्या शिंदे-संतोष कनोजियाने रचला कट, नेमकं काय घडलं?
आमदार फुटले, पक्ष फुटला, पण पेपर फुटला तेव्हा...; पेपरफुटीवरून....
Raj Thackeray : आमदार फुटले, पक्ष फुटला, पण पेपर फुटला तेव्हा...; पेपरफुटीवरून राज ठाकरेंचा सरकारवर घणाघात
आम्ही मेलेल्या आईचं दूध प्यायलो नाही; राज ठाकरेंसमोर विवेकानंद पाटील..
Vivekanad Patil : आम्ही मेलेल्या आईचं दूध प्यायलो नाही; राज ठाकरेंसमोर विवेकानंद पाटील आक्रमक, MPSC अध्यक्षांना थेट इशारा
मंगेश चिवटेंच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब; शिवसेनेकडून उद्या....
Mangesh Chivte : मंगेश चिवटेंच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब; शिवसेनेकडून उद्या अर्ज भरणार, पण पुणे शिक्षक मतदारसंघासाठी महायुतीत पेच कायम?
मुंबईत पाणीकपात अन् रस्ते धुण्यासाठी 8 कोटी 25 लाख; पालिकेच्या....
Mumbai : मुंबईत पाणीकपात अन् रस्ते धुण्यासाठी 8 कोटी 25 लाख; पालिकेच्या प्रस्तावावर संतापाचा सूर, पडद्यामागे काय घडतंय?
फॉर्म सिक्समध्ये बेकायदेशीर बदल सिद्ध; गांधींचा ज्ञानेश कुमारांवर....
Rahul Gandhi : फॉर्म सिक्समध्ये बेकायदेशीर बदल सिद्ध; राहुल गांधींचा ज्ञानेश कुमारांवर गंभीर आरोप, म्हणाले...
हनी सिंहच्या अडचणी वाढल्या?; महाराष्ट्र सायबरकडून समन्स, मात्र चौकशीला
honey singh : हनी सिंहच्या अडचणी वाढल्या?; महाराष्ट्र सायबरकडून समन्स, मात्र चौकशीला गैरहजर
आम्ही 2022 ला काहीतरी केलं....; शिरसाटांच्या विधानाने चर्चांना उधाण
Sanjay Shirsat : आम्ही 2022 ला काहीतरी केलं....; संजय शिरसाटांच्या त्या विधानाने राजकीय चर्चांना उधाण
MPSCच्या आजी-माजी अध्यक्षांवर कारवाईचा मार्ग मोकळा?...
MPSCच्या आजी-माजी अध्यक्षांवर कारवाईचा मार्ग मोकळा?; फडणवीसांची राज्यपालांकडे मोठी शिफारस, काय आहे मागणी?