AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नाशिकमध्ये म्युकरमायकोसिसचा पेच कायम, रुग्णांसाठी 30700 इंजेक्शनची गरज

नाशिक जिल्ह्यातीमल म्युकरमायकोसिस रुग्णांची आकडेवारी लक्षात घेतली असता जिल्ह्याला 30700 इंजेक्शनची गरज आहे. Nashik mucormycosis update

नाशिकमध्ये म्युकरमायकोसिसचा पेच कायम, रुग्णांसाठी 30700 इंजेक्शनची गरज
| Edited By: | Updated on: Jun 04, 2021 | 11:07 AM
Share

चंदन पुजाधिकारी, टीव्ही 9 मराठी, नाशिक: जिल्ह्यात म्युकरमायकोसिसचा पेच कायम असल्याचं समोर आलं आहे. गुरुवारी नाशिकला जिल्ह्याला एकही इंजेक्शन मिळाले नाही. जिल्ह्यात सध्या म्युकरमायकोसिस चे 307 रुग्ण आहेत. जिल्हा प्रशासनाकडे एमफोथरेसिनचे बी चे फक्त 3596 इंजेक्शन उपलब्ध आहेत. (Nashik mucormycosis update district administration not get any amphotericin b injection on 3 june )

30700 ची गरज 3596 इंजेक्शन उपलब्ध

नाशिक जिल्ह्यातीमल म्युकरमायकोसिस रुग्णांची आकडेवारी लक्षात घेतली असता जिल्ह्याला 30700 इंजेक्शनची गरज आहे. मात्र, जिल्हा प्रशासनाकडे सध्या 3596 इंजेक्शन उपलब्ध आहेत. यामुळे आरोग्य यंत्रणेसमोर नवीन आव्हान उभं राहिलं आहे.

नाशिक महापालकिका करणार बाल रुग्णालयांची तपासणी

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमध्ये बालकांना फटका बसणार असल्याचा अंदाज आहे. त्या पार्शवभूमीवर नाशिक महापालिका शहरातील बाल रुग्णालयांची पाहणी करणार आहे. औषध साठा, वैदकीय व्यवस्था आहेत की नाही याचा आढावा पालिकेकडून घेण्यात येणार आहे. बालरोग तज्ञांशी चर्चा करुन महापालिका पुढील नियोजन ठरवणार आहे.

उद्योगांना 20 टक्के ऑक्सिजन देण्यास परवानगी

नाशिक जिल्ह्यातील कोरोना विषाणू संसर्गाची आकडेवारी कमी झाल्यानं उद्योगांना आक्सिजन देण्यास परवानगी देण्यात आली आहे. ऑक्सिजनचा तुटवडा सहन करणाऱ्या उद्योगांना यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. नाशिकमध्ये गेल्या काही दिवसांपूर्वी कोरोनाचे रुग्ण वाढल्यानं उद्योगांना होणारा ऑक्सिजन पुरवठा 100 टक्के बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. स्टील,फेब्रिकेशन कंपन्यांना यामुळे मोठा फटका बसला होता. अनेक उद्योजकांनी ऑक्सिजन मिळत नसल्यानं कंपनी बंद करण्याचा निर्णय घेतला होता. आयमा संघटनेने ऑक्सिजन पुरवठा पूर्ववत व्हावा यासाठी पाठपुरावा केला होता.

नाशिक कोरोना अपडेट 3 जून 2021

पूर्ण बरे झालेले रुग्ण- 972

पॉझिटीव्ह रुग्ण संख्येत झालेली वाढ – 523

नाशिक मनपा- 170 नाशिक ग्रामीण- 339 मालेगाव मनपा- 11 जिल्हा बाह्य- 03

नाशिक जिल्ह्यातील एकूण मृत्यू – 4830

दिवसभरातील एकूण मृत्यू -41 नाशिक मनपा- 14 मालेगाव मनपा- 00 नाशिक ग्रामीण- 27 जिल्हा बाह्य- 00

संबंधित बातम्या:

काँग्रेसच्या माजी मंत्र्याची पत्नी ‘घड्याळ’ बांधण्याच्या तयारीत, मुलीला राष्ट्रवादीकडून मोठं पद

The Family Man 2 Full Review: श्रीकांत तिवारीवर भारी राजी, सामंथानं अख्खी सीरीज खाऊन टाकली, वाचा सर्वात आधी रिव्ह्यू

(Nashik mucormycosis update district administration not get any amphotericin b injection on 3 june )

'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.