राष्ट्रीय स्तरावरील नेमबाजाची आत्महत्या, स्पोर्ट्स रायफलने गोळी झाडून आयुष्य संपवलं

हुनर सिंहला 3 महिन्यांपूर्वी हाताला दुखापत झाली होती. या दुखापतीतून तो बराच सावरला होता. पण गेल्या काही दिवसांपासून या वेदनेबद्दल तो अत्यंत काळजीत होता.

राष्ट्रीय स्तरावरील नेमबाजाची आत्महत्या, स्पोर्ट्स रायफलने गोळी झाडून आयुष्य संपवलं
Hunar Singh

चंदिगढ : राष्ट्रीय स्तरावरील नेमबाज हुनर ​​सिंहने (Hunar Singh) रविवारी सकाळी पंजाबच्या अमृतसर जिल्ह्यात आपल्या रायफलने स्वतःवर गोळी झाडली. यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदन केले. हुनर सिंह राष्ट्रीय स्तरावरील उत्तम नेमबाज होता.

हाताच्या वेदनेमुळे हुनर चिंताग्रस्त

हुनर ​​सिंहने अनेक स्पर्धांमध्ये भाग घेऊन आपल्या राज्याचे नाव उंचावले होते. त्याच्या कुटुंबीयांनी सांगितले की, हुनरने पुणे, दिल्ली आणि जालंधर येथे झालेल्या स्पर्धांमध्ये भाग घेतला होता. हुनर सिंहला 3 महिन्यांपूर्वी हाताला दुखापत झाली होती. या दुखापतीतून तो बराच सावरला होता. पण गेल्या काही दिवसांपासून या वेदनेबद्दल तो अत्यंत काळजीत होता.

स्पोर्ट्स रायफलने डोक्यात गोळी झाडली

हुनरचे वडील भूपिंदर सिंह हे प्रशासकीय अधिकारी म्हणून निवृत्त झाले आहेत, तर त्याची आईही निवृत्त शिक्षिका आहे. त्याने सांगितले की तीन महिन्यांपूर्वी हुनर ​​सिंहच्या हाताला दुखापत झाली होती. तो दुखापतीतून बरा झाला होता, परंतु गेल्या काही दिवसांपासून तो वेदनांमुळे खूप काळजीत होता. रविवारी सकाळी त्याने आपल्या स्पोर्ट्स रायफलने डोक्यात गोळी झाडून आपले जीवन संपवले.

घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहचले, आवश्यक ती कार्यवाही केल्यानंतर शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. एएसआय कुलदीप सिंह म्हणाले की, या प्रकरणाची चौकशी केली जात आहे.

दिल्लीत पत्नी-सासूची हत्या, जावयाला अटक

दुसरीकडे, देशाची राजधानी दिल्लीमध्ये तरुणाने पत्नी आणि सासूची हत्या केल्याने खळबळ उडाली आहे. गोळी झाडून पत्नी आणि सासूचा खून केल्यानंतर आरोपीने स्वतःच दिल्ली पोलिसांना या घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून त्याला अटक केली आणि प्रकरणाचा तपास सुरु केला.

ही घटना दिल्लीच्या बाबा हरिदास नगर परिसरातील आहे. टोमण्यांना कंटाळून जावयाने आपल्या सासू आणि पत्नीला गोळ्या झाडून ठार मारल्याचा आरोप केला जात आहे. दोघींचाही राहत्या घरातच मृत्यू झाला. आरोपीचे नाव महेश असून तो बाबा हरिदास नगरमधील नर्नम पार्क येथे सासूच्या घरी राहतो. आरोपीच्या मृत पत्नीचे नाव निधी (वय 21 वर्षे) आणि सासूचे नाव वीरो (वय 55 वर्षे) होते.

नेमकं काय घडलं?

दिल्ली पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महेशचा त्याच्या सासू आणि पत्नीवर राग होता, कारण तो घरजावई असल्यावरुन दोघी अनेकदा त्याला टोमणे मारत असत. या कारणास्तव त्याने पत्नी आणि सासूची गोळ्या घालून हत्या केली. एवढेच नाही तर ही घटना घडल्यानंतर महेशने स्वतः पोलिसांना फोन करून या प्रकरणाची माहिती दिली.

आरोपीला घटनास्थळावरुन अटक

अटकेच्या भीतीने पळून जाण्याऐवजी तो घटनास्थळीच थांबला होता. पोलिसांनी त्याला तिथूनच अटक केली. पोलिसांनी सांगितले की त्याच्या ताब्यातून हत्येसाठी वापरलेले शस्त्र जप्त करण्यात आले आहे. भारतीय दंड संहितेच्या कलम 302 (हत्या) अंतर्गत त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तीन वर्षांपूर्वी प्रेमविवाह, तरुण घरजावई

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महेश कार खरेदी आणि विक्रीचे काम करतो. त्याने आणि निधीने तीन वर्षांपूर्वी प्रेमविवाह केला होता, पण घर जावई असल्यावरुन रोजचे टोमणे ऐकून त्याने पत्नी आणि सासूला गोळ्या घालून ठार मारले. सध्या पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन दुहेरी हत्याकांडाचा तपास सुरू केला आहे.

संबंधित बातम्या :

55 वर्षीय महिलेवर चौघा जणांचा सामूहिक बलात्कार, जंगलात गाठून दुष्कृत्य

प्रेयसीच्या कमी उंचीवरुन गावकऱ्यांचे टोमणे, प्रियकराकडून कुऱ्हाडीने गळा चिरुन हत्या

वाईन शॉपीवर दारु खरेदी करताना चाकूहल्ला, औरंगाबादमध्ये तरुणाचा मृत्यू

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI