प्रेयसीच्या कमी उंचीवरुन गावकऱ्यांचे टोमणे, प्रियकराकडून कुऱ्हाडीने गळा चिरुन हत्या

अजितने आपल्या प्रेयसीची हत्या केली, कारण ती लग्नासाठी त्याच्यावर दबाव आणत होती. तर गावकरी सतत अंजलीच्या कमी उंचीवरुन अजितला टोमणे मारत होते. तू कमी उंचीच्या मुलीसोबत लग्न करणार का, असं म्हणून त्याला चिडवत होते.

प्रेयसीच्या कमी उंचीवरुन गावकऱ्यांचे टोमणे, प्रियकराकडून कुऱ्हाडीने गळा चिरुन हत्या
प्रातिनिधीक फोटो

रांची : झारखंडमध्ये विचित्र कारणातून तरुणीचा खून झाल्याची घटना समोर आली आहे. खुंटी जिल्ह्यात एका प्रियकराने आपल्या प्रेयसीची निर्घृण हत्या केली, त्याचं कारण म्हणजे केवळ तिची उंची कमी. गावकरी आणि परिचयातील व्यक्ती तरुणाला प्रेयसीच्या उंचीवरुन सतत टोमणे मारायचे, तर प्रेयसी लग्नासाठी प्रियकराकडे सातत्याने तगादा लावत होती. त्यामुळे प्रियकर अजित गाडी याने तिचा धारदार शस्त्राने गळा चिरुन खून केल्याचा आरोप आहे.

काय आहे प्रकरण?

झारखंड जिल्ह्यातील खुंटी पोलीस ठाण्यात पत्रकार परिषद घेतल्यानंतर डीएसपी अमित कुमार यांनी सांगितले की, ही घटना 5 ऑक्टोबर 2021 रोजी घडली. 20 वर्षीय अज्ञात तरुणीचा मृतदेह खुंटी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील नेयलडीह जंगलात सापडला होता. मृतदेह सापडल्यानंतर 6 ऑक्टोबर रोजी खुंटी पोलीस स्टेशनमध्ये एफआयआर दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल झाल्यानंतर तपासादरम्यान मुलीची ओळख पटली. तुपुडाणा पोलीस स्टेशन परिसरातील दुंदू दारहटोली येथे राहणाऱ्या तरुणीचे नाव अंजली तिरकी असे होते.

गावकऱ्यांचे तरुणाला सतत टोमणे

डीएसपींनी सांगितल्यानुसार अजितने आपल्या प्रेयसीची हत्या केली, कारण ती लग्नासाठी त्याच्यावर दबाव आणत होती. तर गावकरी सतत अंजलीच्या कमी उंचीवरुन अजितला टोमणे मारत होते. तू कमी उंचीच्या मुलीसोबत लग्न करणार का, असं म्हणून त्याला चिडवत होते. त्यामुळे प्रियकर अजित अनेक दिवसांपासून काय करावे याबद्दल संभ्रमात होता.

नेमकं काय घडलं?

एक दिवस अजितने अंजलीला खुंटी गावातील जंगलात भेटायला बोलावले. तिथे दोघे बरेच दिवस एकत्र होते. यानंतर अजितने तिच्या बॅगमध्ये ठेवलेले सर्व कपडे बाहेर काढले आणि जाळले. अंजलीने याबद्दल विचारल्यानंतर अजित म्हणाला की तो तिला नवीन कपडे खरेदी करुन देईल. यानंतर अजितने तिच्यावर कुऱ्हाडीने हल्ला केला आणि तिचा गळा धारदार शस्त्राने कापून अजित जंगलातून पळून गेला.

पोलीस ठाण्यात तक्रार आल्यानंतर खुंटी पोलिसांनी एक टीम तयार केली आणि छापेमारीची कारवाई सुरू केली. अंजलीचा प्रियकर अजित गाडी याला त्याच्या दुंडू दारहटोली गावातून अटक करण्यात आली. खुनामध्ये वापरलेली कुऱ्हाड, अंजलीचा मोबाईल आणि आरोपी अजितचा मोबाईलही पोलिसांनी त्याच्या घरुन जप्त केला आहे. खुंटी पोलीस ठाण्याचे प्रभारी जयदीप टोप्पो, विश्वजित ठाकूर आणि खुंटी पोलीस ठाण्याचे सशस्त्र दल या छापाच्या कारवाईत सहभागी होते.

संबंधित बातम्या :

वाईन शॉपीवर दारु खरेदी करताना चाकूहल्ला, औरंगाबादमध्ये तरुणाचा मृत्यू

जातपंचायत जाचाला कंटाळून आत्महत्या प्रकरणी आणखी 7 आरोपींना अटक

पोलीस अधीक्षक कार्यालयासमोरच धारदार शस्त्राने हल्ला, बीडमध्ये कायदा, सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI