55 वर्षीय महिलेवर चौघा जणांचा सामूहिक बलात्कार, जंगलात गाठून दुष्कृत्य

घटनेची माहिती मिळताच पीडितेला उपचारासाठी आणि वैद्यकीय कार्यवाहीसाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले. पीडितेची प्रकृती स्थिर आहे. इतर आरोपींबाबत तपास केला जात आहे.

55 वर्षीय महिलेवर चौघा जणांचा सामूहिक बलात्कार, जंगलात गाठून दुष्कृत्य
प्रातिनिधीक फोटो

लखनौ : उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडामधील जेवर पोलीस स्टेशन परिसरातील जंगलात एका 55 वर्षीय महिलेवर चौघा जणांनी सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप आहे. आरोपींच्या तावडीतून सुटल्यानंतर, महिलेने कसेबसे तिचे घर गाठले आणि कुटुंबीयांना ही घटना सांगितली. त्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली. सध्या पोलिसांनी चारही आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध सुरू केला आहे.

नेमकं काय घडलं?

महिलेवर तिच्या गावातील एका व्यक्तीने आपल्या साथीदारांसह बलात्कार केल्याचा आरोप आहे. डीसीपी (महिला सुरक्षा) वृंदा शुक्ला यांनी सांगितले की, जेवर परिसरात सामूहिक बलात्काराच्या घटनेची तक्रार मिळाल्यानंतर त्वरित गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गवत कापण्यासाठी गेलेल्या महिलेवर बलात्कार

ही घटना दोन दिवसांपूर्वी सकाळी 9 ते 10 वाजताच्या सुमारास घडल्याची माहिती आहे. पीडित महिला 55 वर्षांची आहे, अनेकदा ती या भागात गवत कापण्यासाठी जाते आणि घटनेच्या दिवशीही ती तिथे गेली होती. मुख्य आरोपी, जो पीडितेच्या गावातील आहे, तिथे त्याची गुरं चरण्यासाठी घेऊन गेला होता. तो या भागात गांजाचेही सेवन करत असल्याचा दावा केला जातो. त्याच्या आदेशानेच इतर तिघांनी महिलेवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. आरोपींच्या अटकेसाठी पोलिसांची पथके तयार करण्यात आली आहेत.

चौघा आरोपींचा शोध सुरु

पोलिसांनी पुढे सांगितले की, घटनेची माहिती मिळताच पीडितेला उपचारासाठी आणि वैद्यकीय कार्यवाहीसाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले. पीडितेची प्रकृती स्थिर आहे. इतर आरोपींबाबत तपास केला जात आहे. इतर आरोपींची ओळख मुख्य आरोपीच्या अटकेनंतरच स्पष्ट होईल.

अल्पवयीन तरुणांचा वृद्धेवर गँगरेप

दुसरीकडे, मध्य प्रदेशात काही महिन्यांपूर्वी वासनांधतेचा कळस पाहायला मिळाला होता. रेल्वे क्रॉसिंगवरुन घरी जाणाऱ्या वृद्ध महिलेवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आली होती. धक्कादायक म्हणजे 65 वर्षीय महिलेवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या पाच आरोपींपैकी चौघे जण अल्पवयीन होते

नेमकं काय घडलं होतं?

मध्य प्रदेशातील सिंगरौली भागात जयंत पोलिस चौकी अंतर्गत येणाऱ्या रेल्वे क्रॉसिंगवर रात्री हा घृणास्पद प्रकार घडला होता. पीडिता आपल्या बहिणीकडून घरी येत असताना सामूहिक बलात्काराची घटना घडली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी महिलेने पोलीस स्टेशन गाठून आपल्यावरील अत्याचाराला वाचा फोडली.

संशयास्पद अवस्थेत फिरताना दोघे ताब्यात

पोलिसांनी पाच जणांविरोधात सामूहिक बलात्काराची तक्रार दाखल केली. पीडितेने केलेल्या वर्णनाच्या आधारे आरोपींची शोधाशोध करण्यात आली. घटनास्थळाजवळ दोन अल्पवयीन आरोपींना संशयास्पद अवस्थेत काही जणांनी पाहिले. पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली. पीडितेने त्या दोघांची ओळख पटवली. त्यानंतर दोघांनी उर्वरित तीन आरोपींची नावं सांगितली.

घटनेच्या वेळी आरोपींकडून अंमली पदार्थांचं सेवन

पाचपैकी चार आरोपी अल्पवयीन आहेत, तर पाचवा 24 वर्षांचा आहे. सर्व जण रेल्वे क्रॉसिंग परिसरात राहत असून त्यांना अनेकदा तिथे फिरताना पाहिलं गेलंय. घटनेच्या वेळी आरोपींनी अंमली पदार्थांचं सेवन केलं होतं, असा दावा केला जातो.

संबंधित बातम्या :

62 वर्षीय भाजी विक्रेतीची बलात्कारानंतर हत्या, 30 वर्षीय आरोपीला अटक

Actress Molestation | इंटिरिअर डिझायनरकडून विनयभंग, मुंबईतील अभिनेत्रीचा आरोप

अल्पवयीन मुलीचा सासरी नांदण्यास नकार, कोल्हापुरात बापाने लेकीला नदीत ढकललं

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI