AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Salman Khan : सलमान खानचा ‘या’ ठिकाणी गेम करण्याचा प्लान होता; आरोपपत्रातील स्फोटक माहिती समोर

बिश्नोई गँगने राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांची हत्या केली. अभिनेता सलमान खानला मदत करत असल्याच्या कारणाने बिश्नोईने बाबा सिद्दीकी यांची हत्या केल्याचं सांगितलं जात आहे. यापूर्वी बिश्नोई गँगने सलमानच्या वांद्रे येथील घराबाहेर गोळीबार केला होता. तसेच पनवेल येथील सलमानच्या फार्म हाऊसची रेकी केली होती. या केससचं आरोपपत्र आज कोर्टात दाखल करण्यात आलं आहे.

Salman Khan : सलमान खानचा 'या' ठिकाणी गेम करण्याचा प्लान होता; आरोपपत्रातील स्फोटक माहिती समोर
सलमान खानImage Credit source: instagram
| Updated on: Oct 18, 2024 | 2:59 PM
Share

राष्ट्रवादीचे आमदार बाबा सिद्दीकी यांची हत्या केल्यानंतर पुन्हा एकदा बिश्नोई गँगची चर्चा सुरू झाली आहे. बिश्नोई गँगने या हत्येची जबाबदारी घेतली आहे. काही महिन्यांपूर्वी बिश्नोई गँगने सलमना खानच्या घराबाहेरही गोळीबार केला होता. त्याचीही चर्चा सुरू झाली आहे. नवी मुंबई पोलिसांनी आज या प्रकरणी आरोपपत्र दाखल केलं आहे. त्यात अनेक धक्कादायक खुलासे करण्यात आले आहेत. बिश्नोई गँगला सलमान खानची हत्या कुठे करायची होती याचा खुलासा या आरोपपत्रात करण्यात आला आहे. आरोपपत्रात अनेक स्फोटक माहिती देण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.

बिश्नोई गँगला सलमान खानचा गेम चित्रीकरणाच्यावेळी किंवा पनवेलचा फार्महाऊस सोडताना करायचा होता. त्यासाठी 25 लाखांची सुपारी देण्यात आली होती, अशी धक्कादायक माहिती या आरोपपत्रात देण्यात आली आहे. पनवेलच्या फार्म हाऊसमधून सलमान बाहेर पडत असतानाच त्याच्यावर गोळ्या झाडायच्या होत्या. त्यामुळेच या फार्म हाऊसची रेकी करण्यात आली होती. सलमान कुठे जातो, कसा जातो? त्याचं डेली रुटीन काय आहे, यावर आरोपी लक्ष ठेवून असल्याचं समोर आलं आहे.

डोगरच्या संपर्कात

फेब्रुवारीत ही रेकी झाली होती. पण सलमान खानच्या वांद्रे येथील घराबाहेर गोळीबार झाल्यानंतर पोलिसांनी जोरदार कारवाई सुरू केली होती. पोलिसांनी हरियाणातून एका व्यक्तीला अटक केली होती. त्यानंतर पोलिसांनी या आरोपीची कसून चौकशी केली असता त्याचं नाव सुखबीर बलबीर सिंग ऊर्फ सुखा असल्याचं समोर आलं. सलमान खानच्या मारेकऱ्यांना तो शस्त्र पुरवत होता. विशेष म्हणजे हा सुखा पाकिस्तानातील डोगर नावाच्या व्यक्तीच्या संपर्कात होता. त्याच्याकडूनच सुखा हत्यारे घेत असल्याचं आरोपपत्रात नमूद करण्यात आलं आहे.

लूक बदलून फिरायचा

सुखा हा दाढी आणि केस वाढवून फिरत होता. त्याने आपला लूक बदलला होता. पानिपतमधील एका हॉटेलात तो लपला होता. पण पोलिसाांनी त्याच्या मुसक्या आवळल्या. त्याला 4 जून रोजी अटक करण्यात आली होती. त्याच्या चौकशीतून सलमानच्या फार्म हाऊसची एक दोन नव्हे तर तब्बल 16 ते 17 जणांनी रेकी केल्याचं आढळून आलं आहे. म्हणजे आरोपींनी सलमानला उडवण्याचा फुल्ल प्लानच केल्याचं तपासात स्पष्ट झालं आहे.

सुखा पाकिस्तानचा

सुखा हा मूळचा पाकिस्तानचा आहे. तो आणि पाकिस्तानातील डोगर नावाचा व्यक्ती सोबत काम करतात. दोघेही शस्त्रास्त्र पुरवण्याचं काम करत असल्याचं पोलीस तपासात उघड झालं आहे. या आरोपपत्रात अनेक धक्कादायक खुलासे करण्यात आले आहेत. त्यानुसार आरोपींची धरपकडही सुरू करण्यात आली आहे. या प्रकरणी आता खटल्याची सुनावणी सुरू झाल्यावर अनेक गोष्टी बाहेर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.