कारवाईदरम्यान अधिकाऱ्यांवर हल्ला करणे भोवले, हत्यारबंद ड्रग पेडलरविरोधात गुन्हा दाखल, एनसीबी अ‌ॅक्शन मोडमध्ये

ड्रग्ज पेडलर्सवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या एनसीबीच्या पथकावर हल्ला केल्याची घटना 13 ऑगस्ट रोजी घडली होती. या हल्ल्यानंतर एनसीबी तसेच पोलीस अ‌ॅक्शन मोडमध्ये आले आहेत.

कारवाईदरम्यान अधिकाऱ्यांवर हल्ला करणे भोवले, हत्यारबंद ड्रग पेडलरविरोधात गुन्हा दाखल,  एनसीबी अ‌ॅक्शन मोडमध्ये
सांकेतिक फोटो
Follow us
| Updated on: Aug 14, 2021 | 8:05 PM

मुंबई : ड्रग्ज पेडलर्सवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या एनसीबीच्या पथकावर हल्ला केल्याची घटना 13 ऑगस्ट रोजी घडली होती. या हल्ल्यानंतर एनसीबी तसेच पोलीस अ‌ॅक्शन मोडमध्ये आले आहेत. एनसीबीने दिलेल्या तक्रारीनुसार मानखुर्द पोलीस ठाण्यात एका परदेशी ड्रग्ज पेडलरविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एनसीबीचे अधिकारी श्रीकांत राऊत यांनी ही तक्रार दिली आहे. (NCB file case in Mankhurd Police Station against drug peddlers who attacked NCB officers)

मोठ्या प्रमाणात सुरु होता ड्रग्जचा व्यवसाय 

एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांना मानखुर्द परिसरात मोठ्या प्रमाणात ड्रग्जचा व्यवसाय सुरू असल्याची खबर मिळाली होती. यामध्ये हार्बर लाईनवरील मानखुर्द आणि वाशी रेल्वे स्थानकादरम्यान रेल्वे रुळाच्या बाजूला खाडीचा मोठा भाग आहे. या भागात चार ते पाच परदेशी नागरिक ड्रग्जचा व्यवसाय करत असल्याची माहिती वानखेडे यांना समजली होती.

एनसीबीचे अधिकारी श्रीकांत राऊत गंभीर जखमी 

रोज संध्याकाळी 7 ते 10 या वेळेत त्यांचा धंदा चालत आहे. त्यानुसार वानखडे यांनी आपल्या पथकासह काल (13 ऑगस्ट) संध्याकाळी धाड टाकली. यावेळी हत्यारबंद ड्रग पेडलर्सनी एनसीबीच्या अधिकाऱ्यांवर हल्ला केला. या हल्ल्यात एनसीबीचे अधिकारी श्रीकांत राऊत गंभीर जखमी झाले होते. तसेच अमोल मोरे, प्रमोद मोरे, किरण रेवलकर, समीर साळेकर हे कर्मचारी काही प्रमाणात जमखी झाले होते.

मानखुर्द पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

श्रीकांत यांच्या डोक्याला मोठी दुखापत झाली आहे. या कारवाईत एनसीबी अधिकाऱ्यांनी सुमारे एक कोटी रुपयांचा ड्रग्स जप्त केला होता. दरम्यान, या कारवाईमध्ये अधिकाऱ्यांवर झालेल्या हल्ल्याची गंभीर दखल घेण्यात आली. हल्ल्यानंतर एनसीबीचे अधिकारी श्रीकांत राऊत यांच्या तक्रारीवरून मानखुर्द पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भादविमधील 353, 332, 143, 147 आणि 149 या कलमांनुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

इतर बातम्या :

नाशिक शिक्षणाधिकारी लाच प्रकरण, वैशाली झनकर यांचा जामीन अर्ज फेटाळला, आणखी 2 दिवसांची पोलीस कोठडी

रत्नागिरीमध्ये चुकीच्या पद्धतीने आंतरराष्ट्रीय कॉलिंग, मुंबई एटीएसला सुगावा लागताच दोघांना बेड्या

Video: गजानन काळेंच्या पत्नीवर सेटलमेंटसाठी दबाव? चित्रा वाघ म्हणतात, हे काय चाललंय राज्यात?

(NCB file case in Mankhurd Police Station against drug peddlers who attacked NCB officers)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.