राष्ट्रवादीच्या युवती प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर यांना धमकी, आरोपीला अटक

गोपीचंद पडळकर म्हणजे धनगर समाज नाही, असं प्रत्युत्तर राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या सक्षणा सलगर यांनी दिलं होतं. त्यानंतर "तुझी इज्जत लुटतो" अशी धमकी देणारा फोन सलगर यांना आला होता.

राष्ट्रवादीच्या युवती प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर यांना धमकी, आरोपीला अटक
Sakshana Salgar

उस्मानाबाद : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या युवती प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर (Sakshna Salgar) यांना धमकवणाऱ्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील ढोकी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीने आपण भाजप आमदार गोपीचंद पडळकर (BJP MLC Gopichand Padalkar) यांचा कार्यकर्ता असल्याचं सांगितल्याचा दावा सलगर यांनी केला होता. (NCP Leader Sakshna Salgar threaten on Phone Call one arrested from Osmanabad)

गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर सोलापुरात चार दिवसांपूर्वी हल्ला झाला होता. त्यावरुन पडळकरांनी राष्ट्रवादीवर टीका केली होती. याविषयी बोलताना गोपीचंद पडळकर म्हणजे धनगर समाज नाही, असं प्रत्युत्तर सक्षणा सलगर यांनी दिलं होतं. त्यानंतर “तुझी इज्जत लुटतो” अशी धमकी देणारा फोन सलगर यांना आला होता.

कोण आहेत सक्षणा सलगर?

  • सक्षणा सलगर या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या युवती प्रदेशाध्यक्षा
  • राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्या
  • उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या त्या सदस्याही आहेत.
  • उत्तम वक्त्या म्हणून सक्षणा सलगर यांची ओळख

काय होता धमकीचा फोन?

सलगर यांनी धमकी देणाऱ्याचा फोन नंबर सोशल मीडियावर शेअर करत शनिवारी त्याविषयी माहिती दिली होती. “मला आज सायंकाळी 06:14 वा. 9922300038 या नंबरवरुन फोनवरुन कॉल आला होता. ही व्यक्ती माझी इज्जत लुटण्याची भाषा करत होती. आ. गोपीचंद पडळकर यांचा तो कार्यकर्ता आहे असे तो सांगत होता.” असं ट्वीट सलगर यांनी केलं होतं. उस्मानाबाद पोलिस यासंबंधी तपास करत आहेत.

चित्रा वाघ सक्षणा यांच्या पाठीशी

सक्षणा सलगर यांनी केलेल्या ट्वीटनंतर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी आपण सक्षणा यांच्या पाठीशी असल्याचं म्हटलंय. “सक्षणा, तो कोणीही असो त्याला शिक्षा ही व्हायलाचं हवी. पोलिसात लेखी तक्रार ही कर मी तुझ्या सोबत आहे. अशा पद्धतीत कुणीही महिला/मुलीला धमकावू शकत नाही आणि जो हे करेल त्याला आम्ही सोडणार नाही. हा राजकीय नाही तर आमच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे त्यासाठी एकत्रित येऊन विकृतांना ठेचू”, अशा शब्दात चित्रा वाघ यांनी सक्षणा यांना पाठिंबा दर्शवला होता.

पाहा व्हिडीओ 

संबंधित बातम्या :

राष्ट्रवादीच्या युवा नेत्या सक्षणा सलगर यांना धमकीचा फोन, भाजप नेत्या चित्रा वाघ सक्षणा यांच्या पाठीशी

पडळकर म्हणाले, रात गेली हिशोबात, पोरगं नाही नशिबात, आता रोहित पवारांचं जशास तसं उत्तर

(NCP Leader Sakshna Salgar threaten on Phone Call one arrested from Osmanabad)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI