शहरातील त्या घरासमोर सारखे घुटमळायचे तरुण, छडा लागताच पोलिसांच्या पायखालची सरकली जमीन
Pali News : पाली पोलिसांनी शहरातील एका एकांतातील घरात सुरू असलेल्या कूर्माचा भांडाफोड केला. हंसराज शाह आणि कालू मेहरात या दोघांना पोलिसांनी अटक केली.

शहरातील एकांतात असलेल्या घरात देहविक्री व्यवसाय सुरू असल्याची कुणकुण पोलिसांनी लागली होती. पोलिसांनी या ठिकाणी त्यांचा पंटर पाठवला. त्याने इशारा करताच पोलिसांनी धाड घातली. त्यावेळी दोन तरुणी आणि 6 तरुणांना ताब्यात घेण्यात आले. त्यांना पोलीस ठाण्यात आणण्यात आले. पोलिसांनी या सेक्स रॅकेटचा भांडाफोड केला. पोलिसांनी आरोपींवर पीटा कायद्यातंर्गत गुन्हा दाखल केला. पोलिसांनी प्रकरणात मुंबईतील हंसराज शाह आणि त्याचा साथीदार कालू मेहरात या दोघांना अटक केली. व्हॉटस्ॲपवर हा सर्व व्यवहार चालत असल्याचे समोर आले आहे. प्रकरणात व्हॉटस्ॲपवरुन कोण कोण यांच्या संपर्कात होते, याचा तपास सुरू केला आहे. त्यामुळे अनेकांचे धाबे दणाणले आहे. पाली शहर औद्योगिक पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
पोलिसांना खबऱ्याची टीप
शहरातील एकांतातील घरात हे दोन तरुण, तरुणींकडून देहव्यापार करून घेत होते. त्यासाठी व्हॉटस्ॲपचा वापर करण्यात येत होता. ते ग्राहक घेऊन येत असत. हा प्रकार गेल्या एक वर्षांपासून सुरू होता. सकाळीच हे तरुण, तरुणीला घेऊन या घरात यायचे. त्यानंतर अनेक तरुणांचा या परिसरात वावर वाढला होता. त्यामुळे काहींनी हा काय प्रकार आहे, याची खोलात जाऊन चौकशी केली. खबऱ्याने पोलिसांना या देहव्यापाराची माहिती दिली. पोलिसांनी पंटर पाठवून अगोदर खातरजमा केली. त्याने इशारा करताच धाड घातली. त्यावेळी या घरात दोन तरुणी आणि 4 तरुण आणि हे दोघे आरोपी होते.
व्हॉटस्ॲप नेटवर्कचा वापर
हे तरुण गेल्या एक वर्षांपासून हा देह व्यापार करुन घेत असल्याचे तपासात उघड झाले आहे. त्यांनी एक व्हॉटस्ॲप ग्रुप तयार केला होता. या ग्रुपवर मुलींचे फोटो टाकण्यात येत असत. वेश्या व्यवसायासाठी इतर शहरातून तरुणी येथे येत होत्या. व्हॉटस्ॲपवरच रेट कार्ड टाकण्यात येत असे. व्यवहार झाल्यावर ग्राहकांना संबंधित ठिकाणावर नेण्यात येत असे. पोलिसांनी हे सेक्स रॅकेट उघड केले आहे. तर अनेकांना आता घाम फुटला आहे. पोलीस पुढील तपास करत आहे.
