आम्ही परमबीर सिंगांना लगेच अटक करणार नाही, ठाकरे सरकारची हायकोर्टाला हमी

परमबीर सिंग यांच्याविरोधात अ‍ॅट्रोसिटी प्रिव्हेन्शन अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. |Param Bir singh

  • Updated On - 11:56 am, Fri, 21 May 21 Edited By: Anish Bendre
आम्ही परमबीर सिंगांना लगेच अटक करणार नाही, ठाकरे सरकारची हायकोर्टाला हमी
परमबीर सिंग

मुंबई: राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर खंडणीखोरीचे आरोप केल्यानंतर चर्चेत असलेले मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (Param Bir singh )यांना गुरुवारी तात्पुरता  दिलासा मिळाला. राज्य सरकारने आम्ही 20 मेपर्यंत परमबीर सिंग यांना अटक करणार नाही, अशी हमी उच्च  न्यायालयात दिली. सरकारी वकील दरायस खंबाटा यांनी यासंदर्भातील माहिती दिली. (Param Bir singh get relief from HC get protection from arrest till 20 May)

आता याप्रकरणाची पुढील सुनावणी 20 मे रोजी होणार आहे. त्यामुळे आता तोपर्यंत परमबीर सिंग यांच्यावर कोणतीही कारवाई होणार नाही. परमबीर सिंग यांच्याविरोधात अ‍ॅट्रोसिटी प्रिव्हेन्शन अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा पोलीस निरीक्षक भीमराव घाडगे यांनी दाखल केला आहे. हा गुन्हा रद्द करण्यासाठी परमबीर सिंग यांनी मुंबई उच्च न्यायालायत याचिका दाखल केली आहे.

बुकी सोनू जालान ते पीआय डांगे, परमबीर सिंग यांच्यावरील तीन आरोपांची गोपनीय चौकशी

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (Param Bir Singh) यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. एसीबी म्हणजेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून तीन प्रकरणांची गोपनीय चौकशी (डिस्क्रीट इन्कवायरी) सुरु असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पोलीस निरीक्षक बी आर घाडगे, पोलीस निरीक्षक अनुप डांगे आणि बुकी सोनू जालान यांनी केलेल्या तक्रारीच्या आधारावर ही चौकशी सुरु असल्याची माहिती आहे.

ही प्राथमिक स्वरूपाची चौकशी असते जी तीन महिन्यांच्या कालावधीत पार पडते. त्यानंतर जे पुरावे प्राथमिक चौकशीत मिळतात त्यानुसार खुली चौकशी किंवा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया ठरते. सध्या तरी या तीनही प्रकरणामध्ये गोपनीय चौकशीला सुरुवात झाली असून लवकरच संबंधित तक्रारदारांना जबाबासाठी समन्स पाठवण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

पोलीस निरीक्षक बी आर घाडगे यांनी परमबीर सिंग यांच्यावर कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला आहे. शिवाय अनुप डांगे यांनीही सिंग यांच्यावर भ्रष्टाचार केल्याचे आरोप केलेत. तर सोनू जालान याने परमबीर यांनी आपल्याकडून बेकायदेशीर पैसे उकळल्याचा आरोप केला आहे.

संबंधित बातम्या:

Anil Deshmukh | माजी गृहमंत्री अनिल देशमुखांवरील आरोपांचा ईडी तपास सुरु, ECIR दाखल

परमबीर सिंगांनी टाळलं, चित्रपट निर्माते भरत शाहांचा नातू यश मेहतावर दीड वर्षांनी आरोपपत्र

अनिल देशमुखांच्या चौकशीसाठी चांदिवाल समिती, कोणाकोणाची वर्णी? मानधन किती?

(Param Bir singh get relief from HC get protection from arrest till 20 May)