Pune crime : अल्पवयीन दिव्यांग मुलीवर दारू पाजून अत्याचार; पुणे शहर पोलिसांत गुन्हा दाखल, नराधमांचा शोध सुरू

बराच वेळ मुलगी घरी परतली नाही, तेव्हा तिची आई तिला शोधत बाहेर गेली आणि तिला समजले, की दोन जण तिला मोटारसायकलवरून घेऊन गेले. त्यानंतर मुलीच्या आईने स्थानिक पोलिसांना याविषयी माहिती दिली.

Pune crime : अल्पवयीन दिव्यांग मुलीवर दारू पाजून अत्याचार; पुणे शहर पोलिसांत गुन्हा दाखल, नराधमांचा शोध सुरू
Image Credit source: tv9
प्रदीप गरड

|

May 24, 2022 | 10:29 AM

पुणे : एका मूकबधिर दिव्यांग मुलीवर अत्याचार करणाऱ्या दोन नराधमांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या दोन नराधमांनी या दहावर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार (Physical abuse) केले होते. मागील आठवड्यात  वानवडी परिसरात ही घटना घडली होती. दोन नराधमांनी या मुलीचे प्रथम अपहरण करून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. मुलीच्या आईने रविवारी यासंबंधी एफआयआर (FIR) नोंदवल्यानंतर पोलिसांनी दोन अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 20 मे रोजी रात्री 9.30 वाजण्याच्या सुमारास ही मुलगी घराजवळ खेळत असताना दोघांनी तिचे अपहरण केले. त्यांनी कथितपणे तिला त्यांच्या मोटारसायकलवरून एका निर्जन ठिकाणी नेले, तिला दारू (Liquor) पाजली आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केले, असे पोलिसांनी सांगितले आहे.

मुलीला राहत्या घराजवळ सोडून काढला पळ

बराच वेळ मुलगी घरी परतली नाही, तेव्हा तिची आई तिला शोधत बाहेर गेली आणि तिला समजले, की दोन जण तिला मोटारसायकलवरून घेऊन गेले. त्यानंतर मुलीच्या आईने स्थानिक पोलिसांना याविषयी माहिती दिली. काही तासांनंतर आरोपीने मुलीला तिच्या राहत्या घराजवळ सोडून पळ काढला. घडलेली घटना मुलीने सांकेतिक भाषेत सांगितली. त्यानंतर आईने तत्काळ पोलिसांत धाव घेत एफआयआर दाखल केला.

हे सुद्धा वाचा

विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल

पोलिसांनी या दोन आरोपींवर कलम 354 महिलेवर तिचा विनयभंग करण्याच्या हेतूने हल्ला किंवा फौजदारी बळाचा वापर करणे आणि संबंधित कलमे, कलम 328 दुखापत करणे आणि कलम 34 सामूहिक कृत्य याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. भारतीय दंड संहिता आणि लैंगिक गुन्ह्यांपासून लहान मुलांचे प्रतिबंध (POCSO) कायद्याच्या विविध कलमे या गुन्ह्यात लावण्यात आली आहेत.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें