AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune Crime : मोबाईल वापरण्याऐवजी अभ्यास कर जरा… ओरडा मिळाल्यावर तिने थेट टोकाचं पाऊल उचललं

याप्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांचे पथक तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. एवढ्याशा मुलीने एवढं टोकाचं पाऊल उचलण्याची परिस्थिती का आली याचा पोलीस अधिक तपास करत आहेत.

Pune Crime : मोबाईल वापरण्याऐवजी अभ्यास कर जरा... ओरडा मिळाल्यावर तिने थेट टोकाचं पाऊल उचललं
| Updated on: Oct 13, 2023 | 2:30 PM
Share

पिंपरी | 13 ऑक्टोबर 2023 : मोबाईलचा ( use of mobile) वाढता वापर हा सध्याचा मोठा प्रॉब्लेम आहे. लहान – मोठे कोणीही असो, सतत मोबाईलमध्ये डोक घालून बसलेले असतात. मात्र त्याच्या वेडामुळे अनेक समस्याही निर्माण होत आहेत. लहान मुलल मोबाईलवर सतत गेम खेळतात, त्यांचा बाहेर जाणं कमी झालं आहे. अभ्यासाकडेही दुर्लक्ष होतं. त्यावरून आई-वडील रागावले की मग कधीतरी असं टोकाचं पाऊल उचलतात की संपूर्ण (crime case) आयुष्य नासतं.

मोबाईल वेडापायी अशीच एक दुर्घटना पिंपरी-चिंचवडमध्ये घडल्याचे समोर आले. तेथे एका १० वीत शिकणाऱ्या मुलीने स्वत:चं आयुष्य संपवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. मोबाईलवर वेळ घालवण्यापेक्षा अभ्यासाकडे लक्ष दे, असं तिला सांगण्यात आलं होतं. बास… याच मुद्यावररून ती भडकली आणि गळफास लावून घेतला. मृत मुलगी देहू गावातील एका इमारतीत रहात होती. बुधवारी रात्री १० च्या सुमारास हा दुर्दैवी प्रकार घडला.

या घटनेची माहिती मिळताच पिंपरी चिंचवड पोलिसांचे पथक तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. या प्रकरणी देहू रोड पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून.एवढ्याशा मुलीने एवढं टोकाचं पाऊल उचलण्याची परिस्थिती का आली, त्यामागची पूर्ण परिस्थिती जाणून घेण्यासाठी तपास सुरू करण्यात आला आहे. मात्र, कोणतीही सुसाइड नोट सापडली नाही.

“प्राथमिक तपासात ही मुलगी 10वीची विद्यार्थिनी असल्याचे समोर आले आहे. मोबाईल फोनचा वापर कमी कर आणि त्याऐवजी अभ्यासाकडे जास्त लक्ष दे, असा ओरडा तिला मिळाला होता. मात्र याचा तिला खूपच राग आला आणि तिने स्वत:च्याच हाताने स्वत:चं आयुष्य संपवलं, असं पोलिसांनी सांगितलं.

मोबाईलवरून आई मुलीला ओरडली, पण तिला कल्पनाही नव्हती असं काही होईल..

अशीच एक दुर्दैवी घटना लखनऊमध्ये देखील घडली होती. सतत मोबाईलवर बोलत असल्याने आई ओरडली म्हणून एक मुलीने तिचं आयुष्यचं संपवलं. उत्तर प्रदेशच्या जालौन येथे एका अल्पवयीने मुलीने हे टोकाचं पाऊल उचललं. गळफास लावून घेत तिने जीवन संपवलं. मात्र तिच्या या कृत्यामुळे कुटुंबियांना, विशेषत: तिच्या आईला प्रचंड मोठा धक्का बसला. या दुर्दैवी घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि मृतदेह ताब्यात घेऊन तो पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. मिळालेल्या माहितीनुसार, प्रेमप्रकरणातून तरुणीने आत्महत्या केली आहे. घरच्यांनी तिला अनेकदा समजावून सांगितले मात्र ती रात्री उशिरापर्यंत फोनवर बोलत होती. याप्रकरणी तिच्या आईने तिला खडसावलं होतं. पण याच गोष्टीचा तिला खूप राग आला. आणि त्याच रागाच्या भरात तिने पुढचा-मागचा काहीच विचार केला नाही, आणि खोलीत जाऊन आयुष्य संपवलं.

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.