नोटांची मशीन घरातच टाकली, येऊ लागल्या पाचशेच्या करकरीत नोटा,पोलीसही हडबडले
पोलिसांच्या पथकाला गुप्त माहिती मिळाली होती. त्याआधारे त्या छोट्याशा घरात पोलिसांनी धाड टाकली. समोरील दृश्य पाहून पोलिसांच्या त्यांच्या डोळ्यांवर विश्वास बसेना. एका काळ्या रंगाच्या मशीनमधून नोटा छापून धडाधड बाहेर पडत होत्या

मध्यप्रदेशातील नीमच जिल्ह्यात नकली नोटांचे मोठे रॅकेटचे नेटवर्क उघडकीस आले आहे. पोलिसांनी जेव्हा आरोपीच्या घरी छापा टाकला तेव्हा काळ्या रंगाच्या मशीनीमधून छापलेल्या हिरव्या पाचशेच्या नोटांचा ढीग पाहिला तेव्हा सर्वांना धक्का बसला. हे प्रकरण मध्य प्रदेशातील मंदसौर जिल्ह्यात अलिकडेच पकडलेल्या केसनंतर उघडकीस आला आहे. त्यामुळे संपूर्ण क्षेत्रात तणावाचे वातावरण पसरले आहे. नीमच सिटी पोलीसांनी कारवाई करत लाखो रुपये मुल्याच्या नकली नोटा जप्त केल्या आहेत.
नकली नोटांचे नेटवर्क खूपच काळापासून सक्रीय आहे आणि बाजारात नकली नोट बाजारात पसरवण्याची तयारी करत होते. पोलिसांना सर्वात मोठा झटका असा होता की ही मशीन घरगुती सेटअपमध्ये देखील चालू होती.आरोपी या मशिनला सतत अपडेट करत होते.
नीमच जिल्ह्यातील सरजना गावात एका घरात ठेवलेल्या काळ्या रंगाच्या कॉम्पॅक्ट प्रिटींग मशीनचे युनिट पोलिसांना छापा टाकताना जप्त केले आहे. ४ डिसेंबर रोजी उपनिरीक्षक लक्ष्मण सिंग राठोड यांना एका गुप्त बातमीदाराने माहिती दिली. पोलिसांना या खबरीने माहिती देताना सांगितले की सरजना गावातील ईश्वर खारोल हा त्याच्या घरात नकली नोटा छापत आहे. तसेच हा इसम नोटा बाजारात पसरवण्याचा प्रयत्नात असल्याचीही माहितीही या गुप्त खबरीने पुरविली. त्यानंतर पोलीस ठाणे प्रभारी निरीक्षक पुष्पा सिंह चौहान यांच्या नेतृत्वाखाली एका टीमची स्थापना करण्यात आली. त्यानंतर या टीमने ईश्वर खारोल यांच्या घरावर धाड टाकली. तपासणीत पाचशे रुपयांच्या नकली नोटांचा साठा सापडला.
एक साथीदार फरार, पोलिसांचा शोध सुरु
चौकशीत आरोपीने सांगितले की तो हे नेटवर्क त्याचा एक मित्र सुनील बैरागी याच्या मदतीने चालवत होता. सुनील सध्या फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. या संपूर्ण प्रकरणाच्या खुलाशाने अधिकाऱ्यांना धक्का बसला. कारण हे नकली नोटांचे मॉड्युल अनेक आठवड्यांपासून सक्रीय असल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. पोलिसांनी सांगितले की या आर्थिक गुन्ह्यावर कठोर कारवाई केली जात आहे. नागरिकांना संशयित नोटांची तातडीने सूचना देण्याचे आवाहन केले आहे. पोलिसांचे पथक या संपूर्ण टोळीला जेरबंद करण्यासाठी प्रयत्न करीत आहे. सायबर पोलिस आणि सिटी पोलिस यांची संयुक्त टीम यासाठी स्थापन करण्यात आली आहे. डिजिटल एव्हीडन्स आणि फोनचे कॉल रेकॉर्ड तपासले जात आहेत. नकली नोटांचा संभावित बाजार आणि पॅटर्नचा शोध घेत तपासाची व्याप्ती वाढवली जात आहे.
