Pune Crime | गावगुंडाचा हैदोस : पुण्यात ‘फुकट बिर्याणी न दिल्याच्या रागातून हॉटेल मॅनेजरवर केला कोयत्यानं हल्ला

तीन तरुण आले व त्यांनी हॉटेल मॅनेजरकडे बिर्याणीची मागणी केली. बिर्याणीच्या बिलाबाबत विचारताच. आरोपी तरुणांनी आम्हाला फुकट बिर्याणी हवी, असं म्हटलं. मात्र तुम्हा पैसे दिले तरच बिर्याणी मिळेल अशी माहिती मॅनेजरने दिली. मात्र फुकट बिर्याणी देण्यासाठी आरोपी तरुणांनी मॅनेजर सोबत वाद घालण्यास सुरुवात केली. अन त्यानंतर कोयत्याने मॅनेजरवर हल्ला केला.

Pune Crime | गावगुंडाचा हैदोस : पुण्यात 'फुकट बिर्याणी न दिल्याच्या रागातून हॉटेल मॅनेजरवर केला कोयत्यानं हल्ला
प्रातिनिधिक छायाचित्र

पुणे – हॉटेलमध्ये गेल्यानंतर फुकट बिर्याणी खायला न दिल्याच्या रागातून तीन तरुणांनी हॉटेल मॅनेजरवर कोयत्याने हल्ला केल्याची घटना उघडकीस आली आहे. तरुणांनी हॉटेलमध्ये गोंधळ घालत तोडफोडही केली आहे. ही घटना हिंगणे खुर्द येथील रिबेल्स फूड प्रा. लि. येथे घडली आहे. याप्रकरणी लक्ष्मण मरीबा सोनावणे(२६ , कोथरुड वस्ती) यांनी तक्रार दाखल केली आहे.

घटनेदरम्यान फिर्यादी लक्ष्मण सोनावणे हॉटेलच्या बाहेर थांबले होते. त्याचवेळी तिथे तीन तरुण आले व त्यांनी हॉटेल मॅनेजरकडे बिर्याणीची मागणी केली. बिर्याणीच्या बिलाबाबत विचारताच. आरोपी तरुणांनी आम्हाला फुकट बिर्याणी हवी, असं म्हटलं. मात्र तुम्हा पैसे दिले तरच बिर्याणी मिळेल अशी माहिती मॅनेजरने दिली. मात्र फुकट बिर्याणी देण्यासाठी आरोपी तरुणांनी मॅनेजर सोबत वाद घालण्यास सुरुवात केली. अन त्यानंतर कोयत्याने मॅनेजरवर हल्ला केला.

मॅनेजरच्या हाताला गंभीर दुखापत या हल्ल्यात मॅनेजर बिरास्वर दास च्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे. तसेच हॉटेलमधील फ्रीजवर वार करत फ्रीजचंही मोठा नुकसान तरुणांनी केलं आहे. इतकचं नव्हेतर घटने दरम्यान गल्ल्यात हात घालत गल्ल्यातील रक्कमही तरुण घेऊन गेले. तर हॉटेलचेही मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. पोलिसांनी बाळा, तेजा, सत्या वानखेडेच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. पोलीस तपास करत आहेत.

गावगुंडांचा त्रास वाढतोय यापूर्वीही सिंहगड रोडवरील धायरी येथेही गारवा बिर्याणी हॉटेलमध्ये फुकट बिर्याणी न दिल्याच्या रागातून मॅनेजरसह इतर कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याची घटना घडली होती. यावेळी आरोपींनी हॉटेल मालकाला शिवीगाळ करत हॉटेलमधील सामानाची मोठ्याप्रमाणात तोडफोड केली होती. शहराच्य काही भागात वाढत असलेल्या मारहाणीच्या घटनांचा हॉटेल मालकांना मनस्ताप सहन करावा लागत आहेत. गावगुंडांकडून धारदार शास्त्रांचा धाक दाखवत हॉटेल मालकांना सातत्याने त्रास सहन करावा लागत आहे.

संबंधित बातम्या

मोठी बातमी | ST संपाच्या शिष्टाईसाठी पवारांचा पुढाकार; अनिल परब आणि अजित पवारांसोबत गुप्त बैठक सुरू, तोडग्याची आशा

विश्वासघातानं गेलेलं सरकार मेहनतीनं आणता येतं, चंद्रकांतदादांना विश्वास; अमल महाडिकांच्या विजयाचाही दावा

घरचं झालं थोडं…म्हणे विनाहेल्मेट दुचाकीचालकांची 10 गुणांची परीक्षा; नाशिक पोलिसांचा निर्णय

Published On - 1:31 pm, Mon, 22 November 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI