लिफ्ट देण्याचा बहाणा, निर्जनस्थळी नेत महिलांची लूट, पुण्यातील भामटा अखेर जेरबंद

ऑफिसला वेळेत पोहोचण्याच्या आशेने गडबडीत अनेक महिला आरोपीच्या दुचाकीवरुन येण्यास तयार होत असत. लिफ्ट घेतल्यानंतर त्यांना कंपनीपर्यंत सोडण्याच्या बहाण्याने भामटा बाईकवर बसवलेल्या महिलेला निर्जनस्थळी घेऊन जात असे.

लिफ्ट देण्याचा बहाणा, निर्जनस्थळी नेत महिलांची लूट, पुण्यातील भामटा अखेर जेरबंद
संग्रहित छायाचित्र.

पुणे : लिफ्ट देण्याच्या बहाण्याने महिलांना लुटणारा भामटा जेरबंद झाला आहे. पुणे जिल्ह्यातील चाकण ओद्योगिक वसाहतीत हा प्रकार घडत होता. आरोपीने अनेक नोकरदार महिलांची लूट केल्याचा आरोप आहे.

लिफ्ट देण्याच्या बहाण्याने दुचाकीवर बसवून भामट्याने अनेक महिलांना लुटल्याचं समोर आलं आहे. पुण्यातील चाकण पोलिसांनी या प्रकरणी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.

काय आहे प्रकरण?

चाकण औद्योगिक वसाहत अर्थात एमआयडीसी भागात अनेक महिला विविध कंपन्यांमध्ये काम करत आहेत. सकाळी घाई गडबडीच्या वेळी महिला कार्यालयात जात असताना आरोपी लिफ्ट देण्याच्या बहाण्याने त्यांना थांबवत असे.

ऑफिसला वेळेत पोहोचण्याच्या आशेने गडबडीत अनेक महिला आरोपीच्या दुचाकीवरुन येण्यास तयार होत असत. लिफ्ट घेतल्यानंतर त्यांना कंपनीपर्यंत सोडण्याच्या बहाण्याने भामटा बाईकवर बसवलेल्या महिलेला निर्जनस्थळी घेऊन जात असे.

निर्जनस्थळी नेऊन महिलांची लूट

आजूबाजूला कोणी नसल्याचे पाहून आरोपी महिलांना लुटत असे. दिवसेंदिंवस अशा प्रकारच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचं निदर्शनास आलं होतं. या तक्रारी वाढलत असताना या प्रकरणाची पोलिसांनी गांभीर्याने दखल घेतली होती. त्यानंतर मोठ्या शिताफीने अशाप्रकारे लुटणाऱ्या भामट्यास चाकण पोलिसांनी अटक केली आहे.

परदेशी महिलेवर बलात्कार

दरम्यान, युगांडा देशाची नागरिक असलेल्या 28 वर्षीय महिलेला मोटरसायकलवर लिफ्ट देणाऱ्या दोघांनी बलात्कार केल्याची घटना दोन वर्षांपूर्वी पुण्यात उघडकीस आली होती. रात्री उशिरा बारा वाजण्याच्या सुमारास मोटारसायकलवरून आलेल्या एका व्यक्तीने कोरेगाव पार्क परिसरातील एका रेस्टॉरंटच्या बाहेर उभ्या असलेल्या महिलेला गाठले. तिला इप्सित स्थळी नेण्याचं आमिष दाखवत बाईकवर मध्ये बसवले. त्यानंतर निर्जनस्थळी नेऊन बाईकस्वार आणि त्याच्यासोबत असलेल्या त्याच्या मित्राने परदेशी महिलेवर सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप झाला होता.

 

संबंधित बातम्या :

अपघातात पाय गेले, मेकॅनिकने लावला दुचाकी चोरण्याचा सपाटा, 6 महिन्यात 13 वाहने चोरली

‘लिव्ह इन’ मध्ये राहणाऱ्या प्रेयसीला शेअर मार्केटचे अमिष, 22 लाखांचा गंडा!

मृतदेह नेणारी गाडी ट्रकवर आदळली, भीषण अपघातात 17 जणांचा मृत्यू, अनेक जण गंभीर

Published On - 12:18 pm, Sun, 28 November 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI