Pune CCTV | कारला धडकून लक्झरी बस पलटी, हॉटेलमध्ये घुसून 25 प्रवासी जखमी, पुण्यातील अपघाताची भीषण दृश्यं

लक्झरी बस ही पुण्याकडून नगरच्या दिशेने जात होती. यावेळी स्विफ्ट कार चालकाच्या चुकीमुळे अपघात झाल्याचा दावा केला जात आहे. बस महामार्गावर पलटी होऊन थेट हॉटेलमध्ये जाऊन घुसली.

Pune CCTV | कारला धडकून लक्झरी बस पलटी, हॉटेलमध्ये घुसून 25 प्रवासी जखमी, पुण्यातील अपघाताची भीषण दृश्यं
पुण्यातील अपघाताची दृश्यं सीसीटीव्हीत कैद
Image Credit source: टीव्ही9
अश्विनी सातव डोके

| Edited By: अनिश बेंद्रे

Apr 11, 2022 | 9:34 AM

पुणे : पुणे-अहमदनगर महामार्गावर (Pune Ahmednagar Highway) लक्झरी बस आणि स्विफ्ट कार यांचा भीषण अपघात झाला होता. या अपघाताची भयावह दृश्यं सीसीटीव्ही कॅमेरामध्ये (CCTV Camera) कैद झाली आहेत. शिक्रापूर येथे मध्यरात्रीच्या सुमारास दोन वाहनांचा (Bus and Car Accident) अपघात झाला होता. अपघातात कार चालकाचा जागीच मृत्यू झाला, तर बसमधील पंचवीस प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. लक्झरी बस आणि स्विफ्ट कार यांच्यात जोरदार धडक होऊन हा भीषण अपघात झाला आहे. बस महामार्गावर पलटी होऊन थेट हॉटेलमध्ये जाऊन घुसली.

नेमकं काय घडलं?

लक्झरी बस ही पुण्याकडून नगरच्या दिशेने जात होती. यावेळी स्विफ्ट कार चालकाच्या चुकीमुळे अपघात झाल्याचा दावा केला जात आहे. बस महामार्गावर पलटी होऊन थेट हॉटेलमध्ये जाऊन घुसली.

कार चालकाचा जागीच मृत्यू

अपघातात बस चालक, क्लिनर यांच्यासह पंचवीस प्रवासी जखमी झाले आहेत. तर स्विफ्ट चालक विशाल सासवडे याचा या अपघातात जागीच मृत्यू झाला आहे. अपघाताचा हा सर्व थरार हॉटेलमधील सीसीटीव्ही कॅमेरात चित्रित झाला आहे.

पाहा व्हिडीओ :

संबंधित बातम्या :

गावाकडे निघालेल्या मित्रांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाची धडक, दोघांचाही जागीच मृत्यू

बघता-बघता टँकर थेट बसमध्ये घुसला, पुणे-यवतमाळ ट्रॅव्हल्सच्या अपघाताची भयंकर सीसीटीव्ही दृश्यं

पुण्याहून निघालेल्या खाजगी ट्रॅव्हल्सची टँकरला भीषण धडक, दोन्ही ड्रायव्हरसह तिघांचा जागीच मृत्यू

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें