AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आंबेगावातील बैलगाडा शर्यतीला पोलिसांचा दणका, आयोजकासह शंभरहून अधिक जणांवर गुन्हा दाखल

बैलगाडा शर्यतीविरोधातील न्यायालयीन लढा सुरु असताना बैलगाडा मालकांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याची घोषणा 21 ऑगस्टला गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांनी करत पुन्हा शर्यती न भरविण्याचे आवाहन केलं होतं.

आंबेगावातील बैलगाडा शर्यतीला पोलिसांचा दणका, आयोजकासह शंभरहून अधिक जणांवर गुन्हा दाखल
आंबेगावातील बैलगाडा शर्यतीला पोलिसांचा दणका
| Edited By: | Updated on: Nov 06, 2021 | 5:20 PM
Share

पुणे : राज्यात बैलगाडा शर्यतबंदी असतानाही पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात बैलगाडा शर्यतीचा थरार दिवाळी पाडव्याच्या दिवशी रंगला आणि अखेर बैलगाडा शर्यतीवर पोलिसांनी कारवाईचा दणका दिलाय. आयोजकांसह शंभरहून अधिक जणांवर गुन्हेही दाखल झाले. आंबेगाव तालुक्यातील वडगाव काशिंबे आणि गिरवली गावात ही बैलगाडा शर्यत भरवली होती. बैलगाडा घाटात भंडाराची उधळण करत बैलगाडा मालकांसह तरुणाईची गर्दी उसळली होती.

बैल गाडा शर्यत म्हणजे शेतकऱ्याच्या जिव्हाळ्याचा विषय; बैलगाडा शर्यत हा ग्रामीण भागाच्या अर्थव्यवस्थेला उभारी देणारा खेळ..! मात्र मागील सात वर्षापासून बैलगाडा शर्यतीवर बंदी आली आणि बैलगाडा मालकांचा न्यायालयीन लढा सुरु झाला..! मात्र याचदरम्यान आता बैलांच्या सरावासाठी बैलगाडा शर्यतीचे आयोजन केलं जात होतं अशात अनेकांवर गुन्हेही दाखल झाले. बैलगाडा शर्यतीविरोधातील न्यायालयीन लढा सुरु असताना बैलगाडा मालकांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याची घोषणा 21 ऑगस्टला गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांनी करत पुन्हा शर्यती न भरविण्याचे आवाहन केलं होतं.

बैलगाडा शर्यत बंदीच्या विरोधात न्यायालयात याचिका

बैलगाडा शर्यत बंदीच्या विरोधात न्यायालयात याचिका सुरु आहे. ही बंदी उठविण्यासाठी आणि बैलांचा सराव सुरु व्हावा यासाठी नियम अटींवर सरावासाठी परवानगी देण्याची मागणी बैलगाडा संघटनांनी केली. बैल हा शेतकऱ्याचा सखासोबती. या बैलाचा पोटच्या मुलाप्रमाणे सांभाळ शेतकरी करतोय. या बैलाच्या चारा पाणी आणि रतीबाचा खर्च मोठा आहे. मात्र यातून शेतकऱ्याला फायदा काहीच नाही. बैलगाड्याची जुनी संस्कृती आणि परंपरेचे जतन करुन खिलार जातीचे संगोपन व्हावे. यासाठी या बैलगाडा मालकांची आटापिटा सुरुय. वर्षानुवर्ष बैलाचे संगोपन करुनही बैलगाडा शर्यतीवर बंदी असल्याने शेतकरी वर्गातून नाराजीचा सूर लक्षात घेऊन लवकरच शर्यती सुरु होणार या आशेने बैलगाडा मालकांनी नव्याने बैलांची खरेदी केली. मात्र या बैलांच्या सरावासाठी या शर्यती भरविल्या जात असल्याचे शेतकरी सांगतात.

माजी खासदार शिवाजी आढळराव पाटलांचा राज्य सरकारला इशारा

दरम्यान माजी खासदार शिवाजी आढळराव पाटलांनी बैलगाडा मालकांच्या बाजूने असल्याचे स्पष्ट करत गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांनी बैलगाडा मालकांना दिलेला शब्द पाळावा. अन्यथा बैलगाडा मालकांचा सय्यम सुटेल असं म्हणत राज्य सरकारलाच लक्ष केलंय. प्रत्येक निवडणुकीत बैलगाडा शर्यतीवरुन मतांच्या राजकारणाची गणितं आखली जातात मात्र प्रत्येक्षात बैलगाडा शर्यती सुरु करण्याची वेळ ज्यावेळी येते त्यावेळी कायद्याचे हत्यार बैलगाडा शर्यतीसमोर उभं राहतंय. बैलगाडा शर्यतीवरील बंदी आणि बैलगाडा मालकांनी सरावासाठी मागितलेली परवानगी आणि दाखल झालेले गुन्हे अशा अनेक संकटात सापडलेली बैलगाडा शर्यतबंदी कधी उठणार हे पाहणे पुढील काळात औचित्याचे ठरणार आहे. (Police file fir on bullfight in Ambegaon, more than 100 people including organizers)

इतर बातम्या

अवघ्या 17 दिवसांपूर्वीच लग्न, डोळ्यात संसाराची स्वप्न अन् संशयास्पद मृत्यू; नवविवाहितेसोबत नेमकं काय घडलं?

वसईत अंधश्रद्धेतून भोंदूबाबाकडून महिलेची लाखो रुपयांची फसवणूक, आरोपी अटकेत

छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.