AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुण्यातून सर्वात खळबळजनक बातमी, आमदार महेश लांडगे यांना जीवे मारण्याची धमकी

पुण्यात भाजप आमदार महेश लांडगे यांच्याकडे तब्बल 30 लाखांची खंडणी मागितली आहे. तसेच खंडणी दिली नाही तर जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. संबंधित प्रकार उघड झाल्यानंतर पिंपरी चिंचवड शहरात एकच खळबळ उडाली आहे.

पुण्यातून सर्वात खळबळजनक बातमी, आमदार महेश लांडगे यांना जीवे मारण्याची धमकी
| Edited By: | Updated on: Apr 05, 2023 | 10:30 PM
Share

पुणे : महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) खळबळ उडवून देणारी बातमी पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad) येथून आली आहे. भोसरी विधानसभेचे भाजप आमदार महेश लांडगे (Mahesh Landge) यांना चक्क जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. महेश लांडगे यांच्याकडे 30 लाखांची खंडणी मागत जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. पोलीस या प्रकरणी सविस्तर तपास करत आहेत. या प्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजपच्या सत्ताधारी आमदाराला अशा पद्धतीने धमकी देण्याची हिंमत नेमकी कुणाची झाली असेल? असा प्रश्न या निमित्ताने शहरात उपस्थित होतोय.

महेश लांडगे यांनी आपल्या मतदारसंघात सर्वसामान्यांच्या मदतीसाठी परिवर्तन हेल्पलाईन सुरु केली आहे. या हेल्पलाईनच्या माध्यमातून नागरीक आपली समस्या आमदारांपर्यंत पोहोचवतात. नागरीक संबंधित हेल्पलाईन नंबरवर व्हाट्सअॅपवर आपली तक्रार पाठवतात किंवा मदत मागतात. त्यानंतर महेश लांडगे यांची टीम आणि कार्यकर्ते नागरिकांच्या कामासाठी धावून जातात. पण याच हेल्पलाईन नंबरवर व्हाट्सअपच्या माध्यमातून खंडणी मागण्यात आली आहे. तसेच खंडणी दिली नाहीतर जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

आमदार महेश लांडगे यांना परिवर्तन हेल्पलाईनच्या मोबाईल क्रमांकावर अज्ञात मोबाईल क्रमांकावरून 30 लाखाची खंडणी दे अन्यथा जीवाला धोका आहे, अशा आशयाचा मेसेज पाठवण्यात आला आहे. त्या मॅसेजमध्ये बँक डिटेल देखील देण्यात आली आहे. संबंधित बँक खात्यात पैसे जमा करण्याची सूचना देण्यात आली आहे. तसेच इतर रक्कम ही एका ठिकाणी गाडीत ठेवण्यास सांगण्यात आलं आहे. संबंधित मेसेज आमदारांच्या सोशल मीडिया टीमला समजताच एकच खळबळ उडाली.

आरोपींना धमकीच्या मेसेजमध्ये नेमकं काय म्हटलंय?

30 लाख रुपयांची खंडणी द्या. अन्यथा पुढील परिणामाला तयार रहा. खंडणीचे 10 लाख रुपये बँक खात्यात जमा करा आणि उर्वरतित रक्कम एका ठिकाणी असलेल्या गाडीत ठेवा, असा व्हाट्सअप मेसेज परिवर्तन हेल्पलाईन नंबरवर पाठवण्यात आलाय. याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यानुसार अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

आरोपींनी पाठवलेल्या बँक खात्याच्या क्रमांकाची देखील चौकशी पोलीस करणार आहेत. आरोपी नेमके कोण आहेत, त्यांनी थिल्लरपणातून हा मेसेज पाठवलाय की त्यांचा खरंच काही अनपेक्षित प्रकार घडवण्याचा उद्देश आहे? याचा तपास पोलीस करत आहेत. विशेष म्हणजे लोकप्रतिनिधींना अशाप्रकारचे धमकी देण्याचा प्रकार हा नवा नाही. याआधी देखील अशाप्रकारची धमकी पुण्यात इतर लोकप्रतिनिधींना देण्यात आली आहे.

तोच पैसा, तेच आकडे अन् तशीच मशीन सेट...राऊतांचा महायुतीवर थेट निशाणा
तोच पैसा, तेच आकडे अन् तशीच मशीन सेट...राऊतांचा महायुतीवर थेट निशाणा.
कोकणात राणे बंधूंच्या लढतीत निलेश राणेंची सरशी तर चव्हाणांना धक्का
कोकणात राणे बंधूंच्या लढतीत निलेश राणेंची सरशी तर चव्हाणांना धक्का.
जिल्हा कोणाच्या मागे ते...दादांची नगर परिषदांच्या निकालावर प्रतिक्रिया
जिल्हा कोणाच्या मागे ते...दादांची नगर परिषदांच्या निकालावर प्रतिक्रिया.
BJP ची सेंच्युरी, सेनेची हाफ सेंच्युरी...शिंदेंची निकालावर प्रतिक्रिया
BJP ची सेंच्युरी, सेनेची हाफ सेंच्युरी...शिंदेंची निकालावर प्रतिक्रिया.
मोहळमध्ये शिंदे सेनेचा सर्वात कमी वयाचा उमेदवारानं फडकवला झेंडा
मोहळमध्ये शिंदे सेनेचा सर्वात कमी वयाचा उमेदवारानं फडकवला झेंडा.
देवाभाऊंची जादू कायम, स्थानिक निवडणुकीत भाजपचा विजय, महायुती 200 पार
देवाभाऊंची जादू कायम, स्थानिक निवडणुकीत भाजपचा विजय, महायुती 200 पार.
थोरात मामा-भाचे जोडीनं विजय खेचून आणला, संगमनेरमध्ये काँग्रेसची हवा
थोरात मामा-भाचे जोडीनं विजय खेचून आणला, संगमनेरमध्ये काँग्रेसची हवा.
महाडमध्ये गोगावलेंनी गड राखला, दादांच्या राष्ट्रवादीच्या तटकरेना धक्का
महाडमध्ये गोगावलेंनी गड राखला, दादांच्या राष्ट्रवादीच्या तटकरेना धक्का.
परळीच्या विजयावर धनंजय मुंडे म्हणाले, बदनाम करणाऱ्यांना जनतेने धडा...
परळीच्या विजयावर धनंजय मुंडे म्हणाले, बदनाम करणाऱ्यांना जनतेने धडा....
नितेश राणेंना धक्का, निलेश राणेंच्या पाठिंब्यानं स्थानिक आघाडीचा विजयी
नितेश राणेंना धक्का, निलेश राणेंच्या पाठिंब्यानं स्थानिक आघाडीचा विजयी.