pune crime | दोघे मित्र दारू पिण्यासाठी बसले, मग तो असे काही बोलला की ‘तेरी मेरी यारी’ विसरत त्याने काढला काटा

pune mumbai expressway | पुणे शहरातील दोघे मित्र. दोघ मित्रांमध्ये पक्की यारी होती. मग ते दारु पिण्यासाठी बसले. परंतु त्यावेळी असे काही तो बोलून गेली की त्याने त्याचा कायमचा काटा काढला. सहा महिन्यांनी या प्रकरणाचा खुलासा झाला आहे.

pune crime | दोघे मित्र दारू पिण्यासाठी बसले, मग तो असे काही बोलला की 'तेरी मेरी यारी' विसरत त्याने काढला काटा
Follow us
| Updated on: Sep 18, 2023 | 9:44 AM

पुणे | 18 सप्टेंबर 2023 : पुणे शहरातील सहा महिन्यांपूर्वी घडलेल्या प्रकरणाचा खुलासा पोलिसांकडून झाला आहे. सहा महिन्यांपासून बेपत्ता असलेल्या त्या व्यक्तीचे काय झाले, हे आता समजले आहे. या प्रकरणात मित्रानेच मित्राचा घात केल्याचा प्रकार समोर आला आहे. अखेर आरोपीने कितीही हुशारी दाखवली तरी पोलीस त्याचा पुढेच असतात, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. या प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आले आहे. आरोपीने घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला आहे.

नेमके काय घडले

पुणे येथील दिनेश दशरथ कांबळे हा सहा महिन्यांपासून बेपत्ता होता. त्याच्या आईने वाकड पोलीस ठाण्यात यासंदर्भात तक्रार दिली होती. त्यानंतर पोलिसांनी तो हरवला असल्याची नोंद केली. पोलिसांनी त्याची माहिती काढण्यास सुरुवात केली. त्यावेळी दिनेश हा अनेक दिवस घरी येत नसल्याचे समजले. एकदा तो वडिलांची सोन्याची चैन चोरून गेला होता. त्यामुळे त्याला घरच्या मंडळींना चांगलेच झापून काढले. तेव्हा सोन्याची चैन परत घेऊन येतो म्हणून घरा बाहेर पडला परंतु आलाच नाही.

मग असा घडला प्रकार

पोलिसांकडे तक्रार आल्यावर तपास सुरू झाला. दिनेशच्या मित्राकडे चौकशी केली. त्यावेळी १५ मार्च २०२३ रोजी तो मित्र सिद्धांत आणि प्रतीक सरवदे यांच्यासोबत दारू पीत बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी त्या दोघांची चौकशी सुरु केली. तेव्हा झालेला प्रकार समजला. दिनेशने दारूच्या नशेत प्रतीक सरवदे याच्या पत्नीबद्दल अश्लील शब्द वापरला. त्यामुळे प्रतीकने दिनेशच्या डोक्यात दगडाने वार केला. त्यात तो जखमी झाला. यानंतर प्रतीक आणि सिद्धांत यांनी दिनेशला दुचाकीवरून नाशिक फाटा येथील पुलावर नेले आणि खाली फेकून दिले. यामुळे दिनेशचा मृत्यू झाला.

हे सुद्धा वाचा

पोलीस खाक्या दाखवताच कबुली

वरिष्ठ पोलिस निरीक्षक गणेश जवादवाड यांच्या नेतृत्वाखील पोलिसांनी या घटनेचा तपास केला. प्रतीक आणि सिद्धांत यांना पोलिसी खाक्या दाखवल्या. त्यानंतर दोघांनीही त्या खुनाची कबूल दिली. यामुळे तब्बल सहा महिन्यानंतर खुनाचा हा उघडक झाला. वाकड पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे.

साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिका डॉ. तारा भवाळकर
साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिका डॉ. तारा भवाळकर.
अलर्ट राहा, कधीही ब्रेकिंग मिळू शकेल, नीलम गोऱ्हेंचं सूचक वक्तव्य
अलर्ट राहा, कधीही ब्रेकिंग मिळू शकेल, नीलम गोऱ्हेंचं सूचक वक्तव्य.
शिंदेंना धक्का, माजी नगरसेवकांसह शेकडो कार्यकर्त्यांच्या हाती 'मशाल'
शिंदेंना धक्का, माजी नगरसेवकांसह शेकडो कार्यकर्त्यांच्या हाती 'मशाल'.
राऊतांचा गुलाबराव पाटलांवर निशाणा, 'रेडे गुवाहाटीलाच मारले, डुक्कर..'
राऊतांचा गुलाबराव पाटलांवर निशाणा, 'रेडे गुवाहाटीलाच मारले, डुक्कर..'.
तुम्ही खुनी; कोणत्या तोंडाने मतं मागणार? सुळेंचा कोणावर हल्लाबोल?
तुम्ही खुनी; कोणत्या तोंडाने मतं मागणार? सुळेंचा कोणावर हल्लाबोल?.
शिवरायांचं स्मारक पाहण्यास मुंबईत संभाजीराजे अन् पोलिसांकडून धरपकड
शिवरायांचं स्मारक पाहण्यास मुंबईत संभाजीराजे अन् पोलिसांकडून धरपकड.
'त्यांची दादागिरी संपली', बच्चू कडू यांचा अजित पवारांवर निशाणा
'त्यांची दादागिरी संपली', बच्चू कडू यांचा अजित पवारांवर निशाणा.
शिंदेंच्या मंत्र्यानं वाटलेल्या साड्यांची संतप्त महिलांनी केली होळी
शिंदेंच्या मंत्र्यानं वाटलेल्या साड्यांची संतप्त महिलांनी केली होळी.
'... तर मी 2 वेळेचं जेवले असते', लाडकी बहीण'चं आशा भोसलेंकडून कौतुक
'... तर मी 2 वेळेचं जेवले असते', लाडकी बहीण'चं आशा भोसलेंकडून कौतुक.
नवनीत राणांचा तुफान गरबा, तरुणींसोबत लुटला गरबा खेळण्याचा आनंद
नवनीत राणांचा तुफान गरबा, तरुणींसोबत लुटला गरबा खेळण्याचा आनंद.