AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune Crime News : महाराष्ट्र हादरला: दोन अल्पवयीन मुलींना ड्रग्सचे इंजेक्शन दिले, दारु पाजली अन् अत्याचार केला

Pune Crime news: महाविद्यालयातील दोन अल्पवयीन मुलींना आरोपींनी ड्रग्स दिल्यावर त्यांना मद्य पाजले. त्यानंतर त्यांना लॉजवर नेले. आरोपींना अमानुषपणे त्या मुलींवर अत्याचार केला. रात्रभर त्या मुलींवर अत्याचार झाला. १४ मे रोजी घडलेल्या या प्रकारानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी मुली घरी आल्यावर पालक हादरले.

Pune Crime News : महाराष्ट्र हादरला: दोन अल्पवयीन मुलींना ड्रग्सचे इंजेक्शन दिले, दारु पाजली अन् अत्याचार केला
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: May 18, 2024 | 7:08 AM
Share

लोकसभा निवडणुकीचा अंतिम टप्पा महाराष्ट्रात सुरु असताना पुणे जिल्ह्यात धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगरमध्ये दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार झाला आहे. अत्याचार करण्यापूर्वी आरोपींनी त्या मुलींना ड्रग्सचे इंजेक्शन दिले. त्यानंतर त्यांना दारू पाजली. मग त्या मुलींना लॉजवर नेले. त्या ठिकाणी अत्याचार केला. अत्याचार झालेल्या दोन्ही मुली अल्पवयीन आहे. मुली घरी पोहचल्यावर हा प्रकार उघड झाला. या प्रकरणात ड्रग्स पुरवठा करणारा आणि अत्याचार करणाऱ्या दोघांवर राजगुरुनगर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणातील तिसरा आरोपी फरार झाला आहे.

राजगुरुनगरमध्ये घडली घटना

पुणे शहरात गोळीबार, कोयता वार असे गुन्हे वारंवार घडत आहे. प्रेम प्रकरणातून मुलीवर कोयत्याने वार झाल्याचा प्रकार पुण्यातील पेरु गेट पोलीस चौकीजवळ काही महिन्यांपूर्वी घडला होता. पुण्यातील गुन्हेगारी वाढली असताना आता त्याचे लोण परिसरात पोहचले आहे. पुण्याच्या राजगुरुनगर शहरात दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार झाल्याची घटना उघड झाली आहे. त्या मुलींना ड्रग्सचे इंजेक्शन देऊन आरोपींनी अत्याचार केला आहे.

रात्रभर केला अत्याचार

महाविद्यालयातील दोन अल्पवयीन मुलींना आरोपींनी ड्रग्स दिल्यावर त्यांना मद्य पाजले. त्यानंतर त्यांना लॉजवर नेले. आरोपींना अमानुषपणे त्या मुलींवर अत्याचार केला. रात्रभर त्या मुलींवर अत्याचार झाला. १४ मे रोजी घडलेल्या या प्रकारानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी मुली घरी आल्यावर पालक हादरले. त्यांनी मुलींची अवस्था पाहून त्यांना विश्वासात घेऊन विचारणा केली. त्यानंतर पोलीस ठाणे गाठत तक्रार दिली.

खेड पोलीस ठाण्यात पालकांनी तक्रार दिल्यावर पोलिसांनी पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी तातडीने पावले उचलत तपासाची चक्रे फिरवली. या प्रकरणात दोन जणांना ताब्यात घेतले. त्यात एक जण अल्पवयीन आहे. तिसरा आरोपी मुख्य सूत्रधार आहे. तो फरार झाला आहे. या प्रकरणात ड्रग्स पुरवठा करणारा आणि अत्याचार करणाऱ्या आरोपींवर गुन्हा दाखल झाला आहे.

Follow Us
महायुतीत पुन्हा धुसफूस! भाजपकडून डावलले जात असल्याने शिंदे गट नाराज;
महायुतीत पुन्हा धुसफूस! भाजपकडून डावलले जात असल्याने शिंदे गट नाराज; एकनाथ शिंदेंकडे मांडली कैफियत
दोन्ही राष्ट्रवादी विलिनीकरणाबाबत CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
दोन्ही राष्ट्रवादी विलिनीकरणाबाबत CM देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
सयाजी शिंदे संतापले! 'झाडामध्ये देव आहे, त्याला विकणार का?' म्हणत...
सयाजी शिंदे संतापले! 'झाडामध्ये देव आहे, त्याला विकणार का?' म्हणत वृक्षतोडीला विरोध
गोकुळ दुध संघाबाबत मोठी अपडेट समोर! सरकारच्या 'त्या' निर्णयाला...
गोकुळ दुध संघाबाबत मोठी अपडेट समोर! सरकारच्या 'त्या' निर्णयाला राज्यपाल जिष्णू देव वर्मांची मंजुरी
सर, माझा जीव वाचवा' म्हणणाऱ्या वैभव चव्हाणच्या कुटुंबीयांची मनोज...
सर, माझा जीव वाचवा' म्हणणाऱ्या वैभव चव्हाणच्या कुटुंबीयांची मनोज जरांगेंनी घेतली भेट; प्रकरणाला नवे वळण!
संजय राऊतांनी आधी उबाठा गट काँग्रेसमध्ये विलीन करावा; नवनाथ बन यांचा..
संजय राऊतांनी आधी उबाठा गट काँग्रेसमध्ये विलीन करावा; नवनाथ बन यांचा खोचक टोला!
आनंदाचा शिधा घेण्यासाठी महिलांची तुफान गर्दी; खासदार संजय देशमुख....
Washim : आनंदाचा शिधा घेण्यासाठी महिलांची तुफान गर्दी; खासदार संजय देशमुख यांच्या कार्यालयाबाहेर मोठी झुंबड
दिवाळीच्या फटाक्यांनी मुंबईची हवा बिघडवली; BKC मध्ये AQI 170 वर....
Mumbai Air Pollution : दिवाळीच्या फटाक्यांनी मुंबईची हवा बिघडवली; BKC मध्ये AQI 170 वर, निर्बंध झुगारून आतषबाजी सुरूच
युतीतच डावललं जात असेल तर फायदा काय? शिंदे गटाच्या नेत्यांची एकनाथ....
Shinde Group Vs BJP : युतीतच डावललं जात असेल तर फायदा काय? शिंदे गटाच्या नेत्यांची एकनाथ शिंदेंकडे भाजपविरोधात तक्रार, नेमकं काय घडतंय?
E20 पेट्रोलमध्ये इथेनॉलचं प्रमाण 30 टक्क्यांपार? कर्नाटकच्या अहवालाने
Rahul Gandhi : E20 Petrol : E20 पेट्रोलमध्ये इथेनॉलचं प्रमाण 30 टक्क्यांपार? कर्नाटकच्या अहवालाने खळबळ; राहुल गांधींचा केंद्र सरकारवर निशाणा