पिंपरी चिंचवडमध्ये तृतीयपंथीयच्या हत्येप्रकरणी दोघांना अटक, घटनास्थळावर कंडोम, देहव्यवसायातून खूनी खेळ?

ज्या ठिकाणी मृतदेह आढळून आला त्या ठिकाणी तृतीयपंथी देहविक्रीचा व्यवसाय करीत असल्याचे उघड झाले. त्यानुसार पोलिसांनी पुढील तपास केला असता दोन तृतीय पंथियांनी बसवराज इटकल याचा गळा दाबून हत्या केल्याचे निष्पन्न झाले.

पिंपरी चिंचवडमध्ये तृतीयपंथीयच्या हत्येप्रकरणी दोघांना अटक, घटनास्थळावर कंडोम, देहव्यवसायातून खूनी खेळ?
पिंपरी चिंचवडमध्ये तृतीयपंथीच्या हत्ये प्रकरणी दोघांना अटक


पिंपरी-चिंचवड : पैशाच्या वादातून एका तृतीयपंथियाची हत्या झाल्याची धक्कादायक घटना पिंपरी चिंचवडमध्ये घडली आहे. बसवराज इटकल असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी निगडी पोलिसांनी दोन तृतीयपंथियांना अटक केली आहे. काल दुपारच्या सुमारास प्रीमियर कंपनी शेजारी मोकळ्या जागेत मयत बसवराज इटकल ह्याचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली होती. (Two arrested in Pimpri-Chinchwad in kinner murder case)

बसवराज याचा मृतदेह आढळून आल्यानंतर प्रथम दर्शनी पोलिसांना आकस्मित मृत्यू असल्याचे वाटले होते. मात्र याप्रकरणी अधिक तपास केला असता घटनास्थळी पोलिसांना कंडोम आढळून आले. यावरुन पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. ज्या ठिकाणी मृतदेह आढळून आला त्या ठिकाणी तृतीयपंथी देहविक्रीचा व्यवसाय करीत असल्याचे उघड झाले. त्यानुसार पोलिसांनी पुढील तपास केला असता दोन तृतीय पंथियांनी बसवराज इटकल याचा गळा दाबून हत्या केल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी पोलिसांनी दोन तृतीयपंथियांना अटक केली आहे. अंजली बाळू जाधव, अनिता शिवाजी माने असे अटक करण्यात आलेल्या दोन तृतीयपंथियांची नावे आहेत.

नेमके प्रकरण काय?

सोमवारी सकाळी एक व्यक्ती काळभोरनगर, आकुर्डी येथे प्रीमियर कंपनीच्या जवळ असलेल्या मोकळ्या जागेत बेशुद्ध अवस्थेत आढळून आली होती. त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. प्राथमिक अंदाजे हा प्रकार अकस्मात असल्याचं निदर्शनास आलं. मात्र प्रकरणाचा अधिक तपास सुरू असताना मृतदेह जेथे आढळून आला तेथे कंडोम सापडल्याने प्रकरणाला वेगळी कलाटणी मिळाली. तृतीयपंथी देहविक्री करीत असल्याचे पोलीस तपासात समोर आले. घटनास्थळी दोन तृतीयपंथी रात्रीच्या वेळी थांबत असल्याचे पोलिसांना समजले. त्यानंतर पोलिसांनी अंजली आणि अनिता या दोन तृतीयपंथीयांना ताब्यात घेतले. सुरुवातीला त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र त्यांची ही लपवाछपवी जास्त काळ टिकली नाही. पोलिसांनी या प्रकरणी दोघांना अटक करीत त्यांच्याकडे कसून चौकशी केली. हा खून पैशांच्या कारणावरून केला असल्याचे आरोपी तृतीयपंथियांनी पोलीस चौकशीत सांगितले.

पिंपरीत रेल्वेत नोकरीच्या आमिषाने चौघांना गंडा

पिंपरी चिंचवडमध्ये रेल्वेत नोकरी लावण्याच्या आमिषाने फसवणूक करणाऱ्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. आरोपीने चौघा जणांची 26 लाख रुपयांना फसवणूक केल्याचा आरोप आहे. पुणे जिल्ह्यात देहू रोड परिसरात राहणाऱ्या तक्रारदारांना रेल्वेमध्ये नोकरी लावतो असे आमिष आरोपीने दाखवले होते. तब्बल 26 लाख रुपये रोख स्वरुपात घेत भारतीय रेल्वेची बनावट कागदपत्रे तयार करत त्याने चौघांची फसवणूक केल्याचा आरोप केला जात आहे. (Two arrested in Pimpri-Chinchwad in kinner murder case)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI