नवरा-बायकोचं कडाक्याचं भांडण, आईने मुलांना पाण्यात फेकून दिलं, लहानग्यांचा बुडून मृत्यू

पत्नी आणि मुले खदानीत पडल्याचे पाहताच अतुल सुर्यवंशी यांनीही खदानीत उडी टाकली. | Husband Wife

नवरा-बायकोचं कडाक्याचं भांडण, आईने मुलांना पाण्यात फेकून दिलं, लहानग्यांचा बुडून मृत्यू
Follow us
| Updated on: May 29, 2021 | 12:05 PM

बारामती: बारामतीमध्ये पती-पत्नीच्या वादात दोन लहानग्यांचा नाहक बळी गेल्याची घटना समोर आली आहे. पती आणि पत्नीमध्ये कडाक्याचे भांडण झाले आणि याच रागातून पत्नीने मुलांना पाण्याने भरलेल्या खदानीत फेकून दिले.  यामध्ये दोन्ही मुलांचा बुडून मृत्यू झाला. (Kids died due to husband and wife dispute)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना बारामातीच्या पिंपळी गावात घडली. अंजली सुर्यवंशी आणि अतुल सुर्यवंशी या दाम्पत्यामध्ये गुरुवारी रात्री कडाक्याचे भांडण झाले. त्यामुळे अंजली सुर्यवंशी यांच्या संतापाचा पारा चढला. याच रागाच्या भरात अंजली सुर्यवंशी यांनी आपल्या पोटच्या मुलांना जवळच्या एका खदानीत फेकून दिले. त्यानंतर स्वत:ही खदानीत उडी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला.

पत्नी आणि मुले खदानीत पडल्याचे पाहताच अतुल सुर्यवंशी यांनीही खदानीत उडी टाकली. त्यांनी आपल्या पत्नीला खदानीच्या बाहेर काढले. मात्र, आपल्या दिव्या आणि शौर्य या दोन लहान मुलांचा जीव वाचवण्यात ते अपयशी ठरले.

पत्नीसोबतचा वाद विकोपाला, आधी दीड वर्षाच्या चिमुकल्याला गळफास, नंतर बापाची आत्महत्या

पत्नीशी झालेल्या वादातून पतीने दीड वर्षीय मुलासह गळफास घेऊन आत्महत्या केल्या धक्कादायक घटना समोर आली आहे. दिनेश पुंडलिक वानखडे (26)असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. बुलडाण्यातील संग्रामपूर तालुक्यात ही घटना घडली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

बुलडाण्यातील संग्रामपूर तालुक्यात कुंदेगाव आहे. या ठिकाणी दिनेश पुंडलिक वानखडे हे राहतात. दिनेश वानख़डे यांचे काल पत्नीशी जोरदार भांडण झाले. यानंतर दिनेश हा दीड वर्षाच्या चिमुकला रोशनला घेऊन कुंदेगाव शिवारातील एका लिंबाच्या झाडाजवळ आला. त्यानंतर त्याने एका ओढणीच्या मदतीने रोशनला गळफास दिला. त्यानंतर स्वत: दोरीच्या सहाय्याने आत्महत्या केली. पती-पत्नीच्या वादातून त्याने हे टोकाचे पाऊल उचलले असावा, असा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे.

संबंधित बातम्या :

VIDEO: गंभीर गुन्ह्यातील महिला आरोपी पळण्याच्या प्रयत्नात रेल्वे ट्रॅकवर पडली, पोलीस अधिकाऱ्याने वाचवला जीव

सोलापुरात राडा, दारूच्या अड्ड्यावर कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांवर जमावाचा हल्ला, पोलीस निरीक्षक गंभीर जखमी

तीन महिन्यांपूर्वी लव्ह मॅरेज, पत्नीने शिवी दिल्याचा राग आला, पतीने गळा दाबून खेळच संपवला

(Kids died due to husband and wife dispute)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.