VIDEO | सोलापूर-पुणे हायवर टेम्पोचा अपघात, कोंबड्या पळवण्यासाठी स्थानिकांची झुंबड

सोलापूर पुणे महामार्गावरील बाळे येथे रविवारी पहाटेच्याच्या सुमारास एका टेम्पोचा अपघात झाला. पुण्यावरुन सोलापूरकडे हा आयशर टेम्पो येत होता. या टेम्पोमधून कोंबड्यांची वाहतूक केली जात होती.

VIDEO | सोलापूर-पुणे हायवर टेम्पोचा अपघात, कोंबड्या पळवण्यासाठी स्थानिकांची झुंबड
सोलापूर-पुणे महामार्गावर टेम्पोला अपघात
Follow us
| Updated on: Oct 24, 2021 | 9:44 AM

सोलापूर : अपघातग्रस्त टेम्पोमधील कोंबड्या घेऊन जाण्यासाठी स्थानिकांची झुंबड उडाल्याचं पाहायला मिळालं. सोलापूर पुणे महामार्गावर कोंबड्यांची वाहतूक करणाऱ्या टेम्पोला अपघात झाला. त्यानंतर मदत करण्याऐवजी परिसरातील नागरिकांनी कोंबड्या पळवण्यासाठी गर्दी केली. ही घटना कॅमेरामध्ये कैद झाली आहे.

कोंबड्यांपासून मद्यापर्यंत खाण्या-पिण्याच्या वस्तूंची वाहतूक करणाऱ्या ट्रकचे अपघात झाल्यानंतर त्यांची पळवापळवी होत असल्याचं आधीही अनेकदा दिसलं आहे.

काय आहे प्रकरण?

सोलापूर पुणे महामार्गावरील बाळे येथे रविवारी पहाटेच्याच्या सुमारास एका टेम्पोचा अपघात झाला. पुण्यावरुन सोलापूरकडे हा आयशर टेम्पो येत होता. या टेम्पोमधून कोंबड्यांची वाहतूक केली जात होती.

नेमकं काय घडलं?

अपघात झाल्यानंतर परिसरातील नागरिकांनी गर्दी केली. मात्र पीडितांना मदत करण्याऐवजी अपघातग्रस्त टेम्पोमधील कोंबड्या घेऊन जाण्यात त्यांनी धन्यता मानली. हा प्रकार मोबाईल कॅमेरामध्ये कैद झाला आहे. पहाटेच्या सुमारास अपघात झाल्यानंतर टेम्पो बराच काळ बाळे परिसरातच थांबून होता.

पाहा व्हिडीओ :

पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर टेम्पोवर ट्रक धडकला, 100 कोंबड्या दगावल्या

याआधी, जून महिन्यात पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर कोंबड्यांची वाहतूक करणाऱ्या टेम्पोला अपघात झाला होता. टेम्पोने अचानक ब्रेक दाबल्यानंतर ट्रकने मागून धडक दिल्यामुळे हा अपघात झाला होता. या अपघातात टेम्पोमधील 100 कोंबड्या दगावल्याचं वृत्त समोर आलं होतं. खंडाळा परिसरात पहाटेच्या सुमारास ही घटना घडली होती.

उस्मानाबादेत ट्रक उलटून विद्युत उपकरणं चोरीला

उस्मानाबादमध्ये ट्रक उलटल्यानंतर त्यातील इलेक्ट्रिक उपकरणांची लूट झाल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच समोर आला होता. पादचारी आणि गावकऱ्यांनी तब्बल 70 लाख रुपये किमतीचा ऐवज चोरुन नेल्याचा दावा केला जात आहे. ही उपकरणं परत मिळवण्यासाठी पोलिसांना पाचारण करण्यात आलं होतं.

सोलापूर-औरंगाबाद हायवेवर ट्रक उलटला

पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास सोलापूर-औरंगाबाद हायवेवर उस्मानाबादजवळ हा अपघात झाला होता. “ट्रकमध्ये मोबाईल फोन, कॉम्प्युटर, एलईडी टीव्ही, खेळणी अशी विद्युत उपकरणे होती. अपघातानंतर ती रस्त्यावर पडली, तेव्हा गावकऱ्यांची त्या वस्तू उचलण्यासाठी झुंबड उडाली. काही जणांनी कंटेनरचा दरवाजा उघडून वस्तू लांबवल्या. स्थानिक पोलीस आणि दंगल नियंत्रण पथकाला बोलवावं लागलं.” अशी माहिती ट्रक चालकाने दिली होती.

संबंधित बातम्या :

कोंबड्यांचा ट्रक उलटला, पळवापळवीसाठी नागरिकांची झुंबड, 300 कोंबड्यांची लूट

साताऱ्यात कोंबड्यांना घेऊन जाणाऱ्या टेम्पोचा अपघात, तब्बल 600 कोबड्यांचा मृत्यू

उस्मानाबादेत ट्रक उलटला, 70 लाखांचे एलईडी, मोबाईल गावकऱ्यांनी पळवल्याचा दावा

पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर टेम्पोवर ट्रक धडकला, 100 कोंबड्या दगावल्याचा दावा

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.