Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्रियकरासोबत बायको पळाली, गर्भवती पत्नीला निर्वस्त्र करून मारहाण …; बिनडोक पतीच्या कृत्याने देश हादरला…

पत्नी प्रियकरासोबत पळून गेल्यानंतर पती व त्याच्या कुटुंबियांनी पाठलाग करून तिला परत आणले. त्यानंतर तिची निर्वस्त्र अवस्थेत... या कृत्याने मणिपूरच्या आठवणी ताज्या झाल्या असून संपूर्ण देश पुन्हा हादरला आहे.

प्रियकरासोबत बायको पळाली, गर्भवती पत्नीला निर्वस्त्र करून मारहाण ...; बिनडोक पतीच्या कृत्याने देश हादरला...
Follow us
| Updated on: Sep 02, 2023 | 10:42 AM

जयपूर | 2 सप्टेंबर 2023 : देशभरात गुन्ह्यांच्या घटना वाढतच चालल्या असून राजस्थानमध्ये मानवतेला काळिमा (crime) फासणारा एक प्रकार घडला आहे. गर्भवती महिलेला निर्वस्त्र करून फिरवल्याची धक्कादायक घटना घडली असून यानंतर विरोधकांनी गहलोत सरकावर निशाणा साधण्यास सुरूवात केली आहे. भाजपचे नेते सतीश पुनिया यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट लिहून मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्याकडून उत्तर मागितले आहे. दरम्यान महिलेसोबत हे हीन कृत्य करणारा दुसरा तिसरा कोणीच नसून, तिचाच पती आहे. पोलिसांनी आरोपी पती काना मीना याला ताब्यात घेतले आहे.

विरोधकांनी गहलोत सरकारला प्रश्न विचारले आहेत. त्यासंदर्भात सोशल मीडयावर पोस्टही टाकण्यात आली आहे. ‘ प्रतापगड येथे आदिवासी महिलेसोबत झालेले गैरवर्तन पाहून काळजाचा थरकाप उडाला आहे. गुन्हेगारांचे मनोधैर्य इतके उंचावले आहे की ते खुलेआम अशा गुन्ह्यांचे व्हिडिओही बनवत आहेत. हा गैरव्यवहार म्हणजे समाजाचा आणि लोकशाही मूल्यांचा पराभव आहे. या गुन्हेगारांना इतकी कठोर शिक्षा द्यावी की यापुढे ते असा गुन्हा करणेच काय त्याचा मनातही विचार आणणार नाहीत’ अशी मागणी सरकारकडे करण्यात आली आहे.

ती रडत होती…

प्रतापगड जिल्ह्यातील एका गावात २१ वर्षीय महिलेला विवस्त्र केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. येथे गरोदर महिलेला विवस्त्र करून गावभर फिरवण्यात आले. त्या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला असून, त्यामध्ये दुर्दैवी महिला, रडत विव्हळत असल्याचे दिसत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, त्या महिलेचा पती आणि कुटुंबीयांनीच तिला विवस्त्र करून मारहाण केली. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले आहे.

चार दिवसांपूर्वी प्रियकरासोबत पळून गेली होती

रिपोर्ट्सनुसार, हा प्रकार प्रतापगड जिल्ह्यातील धारियावाड शहरातील पहाडा गावात घडला. हा व्हिडीओ तीन-चार दिवसांपूर्वीचा आहे. पीडत महिलेचे वर्षभरापूर्वी लग्न झाले होते. मात्र तिचे दुसऱ्या तरूणावर प्रेम होते. आणि ती गर्भवतीदेखील आहे. चार-पाच दिवसांपूर्वी पीडित महिला तिच्या प्रियकरासोबत पळून गेली होती. मात्र तिच्या घरच्यांना हे कळताच त्यांनी तिचा पाठलाग करून तिला पकडले आणि गावी आणले. महिलेचा पती आणि कुटुंबिय संतापले होते, रागाच्या भरात त्यांनी हे हीन कृत्य केले. पतीने त्याच्या पत्नीला निर्वस्त्र केले. आणि तशाच अवस्थेत तिला मारहाण करत गावभर फिरवले. धक्कादायक गोष्ट म्हणजे यामध्ये पतीच्या आई-वडिलांचाही समावेश होता.

'तुम्ही कितीही तारीफ करा.. तो फक्त वाट पाहातोय', शिरसाटांचा दावा काय?
'तुम्ही कितीही तारीफ करा.. तो फक्त वाट पाहातोय', शिरसाटांचा दावा काय?.
...असं बोललो नाही, भास्कर जाधवांच्या मनात काय? आधी नाराजी मग सारवासारव
...असं बोललो नाही, भास्कर जाधवांच्या मनात काय? आधी नाराजी मग सारवासारव.
चॉपरने केक कापणं बर्थडे बॉयच्या अंगाशी, व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल
चॉपरने केक कापणं बर्थडे बॉयच्या अंगाशी, व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल.
'संजय राऊत सध्या जोकरच्या भूमिकेत'; भाजपच्या बड्या मंत्र्याची टीका
'संजय राऊत सध्या जोकरच्या भूमिकेत'; भाजपच्या बड्या मंत्र्याची टीका.
'शिवसेना अन् ठाकरेंचा संबंध नाही, एक दिवस असा असेल मातोश्रीत फक्त...'
'शिवसेना अन् ठाकरेंचा संबंध नाही, एक दिवस असा असेल मातोश्रीत फक्त...'.
VIDEO : 'बोललं की माझं तोंड दिसतं', अजितदादांनी बांधकाम विभागाला झापलं
VIDEO : 'बोललं की माझं तोंड दिसतं', अजितदादांनी बांधकाम विभागाला झापलं.
सरपंच हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळेची संपत्ती जप्त होणार?
सरपंच हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळेची संपत्ती जप्त होणार?.
नाराजीच्या चर्चांनंतर भास्कर जाधव म्हणाले, 'पण ही वस्तुस्थिती...'
नाराजीच्या चर्चांनंतर भास्कर जाधव म्हणाले, 'पण ही वस्तुस्थिती...'.
मुंडेंविरोधात सुरेश धस पुन्हा आक्रमक, कृषी विभागाच्या सचिवाला थेट पत्र
मुंडेंविरोधात सुरेश धस पुन्हा आक्रमक, कृषी विभागाच्या सचिवाला थेट पत्र.
बापरे... भरधाव शिवशाही बसचं पुढचं टायर निघालं, 50 हून अधिक प्रवासी...
बापरे... भरधाव शिवशाही बसचं पुढचं टायर निघालं, 50 हून अधिक प्रवासी....