तीन लाख देऊन ‘लग्नाळू’ तरुण बोहल्यावर, दहाच दिवसात वधू म्हणाली, “सोडा.. मला आधीच दोन…”

राजस्थानमातील बाडमेर जिल्ह्यात राहणाऱ्या संबंधित पीडित तरुणाचे लग्न जमत नव्हते. यावेळी त्याची ओळख जुझाराम नावाची व्यक्तीशी झाली. जुझारामने तरुणाला बोहल्यावर चढवण्याचे आमिष दाखवले. मात्र यासाठी तरुणाला तीन लाख रुपये मोजावे लागतील, अशी अट घातली.

तीन लाख देऊन 'लग्नाळू' तरुण बोहल्यावर, दहाच दिवसात वधू म्हणाली, "सोडा.. मला आधीच दोन..."
प्रातिनिधिक फोटो

जयपूर : राजस्थानमध्ये (Rajasthan) बाडमेर पोलिसांनी (Barmer Police) नववधू (Bride) आणि तिच्या साथीदाराला अटक केली आहे. दलालाने वरपक्षाकडून तीन लाख रुपये उकळले होते. त्यानंतर वधूशी खोटे लग्न लावून दिल्याचा आरोप केला जात आहे. धक्कादायक  बाब तर पुढे आहे, ती म्हणजे वधू आधीच विवाहित होती, आणि ती दोन मुलांची आईही आहे. याचा खुलासा खुद्द महिलेने विवाहानंतर केला. लग्न झाल्यावर वधूला पंजाबमधील आपल्या मूळगावी परत नेण्यासाठी प्रयत्न सुरु होते. मात्र कुटुंबीयांच्या सतर्कतेमुळे हा प्रकार उघडकीस आला आणि त्यांचा प्लॅन फसला. लग्नाच्या खोट्या बेड्या घालणाऱ्या नववधूला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. अशा प्रकारच्या रॅकेटने आणखी किती जणांची फसवणूक केली आहे, याचा तपास आता बाडमेर पोलीस करत आहेत.

काय आहे प्रकरण?

राजस्थानमातील बाडमेर जिल्ह्यात राहणाऱ्या संबंधित पीडित तरुणाचे लग्न जमत नव्हते. यावेळी त्याची ओळख जुझाराम नावाची व्यक्तीशी झाली. जुझारामने तरुणाला बोहल्यावर चढवण्याचे आमिष दाखवले. मात्र यासाठी तरुणाला तीन लाख रुपये मोजावे लागतील, अशी अट घातली. लग्न करण्यासाठी इच्छुक असलेल्या तरुणाने आपल्या भावाशी यासंदर्भात चर्चा केली. पैसे देण्याची तयारी दोघांनी दर्शवली. कुटुंबीयांच्या होकारानंतर सर्व काही ठरलं आणि 27 डिसेंबर रोजी बाडमेर न्यायालयात तरुणाचं एका महिलेशी लग्न लागलं.

संशयकल्लोळ कुठून सुरु झाला

नववधूचं नाव कोडाबाई असे असून ती मूळची पंजाबची रहिवासी आहे. लग्नानंतर 10 दिवस दोघांमध्ये सर्व काही सुरळीत चालले होते, त्यानंतर दलाल वराच्या घरच्यांना फोन करुन सांगू लागला, की वधूच्या माहेरी एका नातेवाईकाचे लग्न आहे. त्यामुळे तिला काही दिवसांसाठी पंजाबला पाठवा. मात्र वधू किंवा तिच्या माहेरच्या मंडळींऐवजी दलालाने फोन केल्यामुळे पीडिताच्या कुटुंबीयांना संशय आला.

जेव्हा कुटुंबाने वधूची खोदून-खोदून चौकशी सुरु केली, तेव्हा तिने सगळी गुपितं उघड केली. ‘मी आधीच विवाहित आहे, मला दोन मुलं आहेत, मला जाऊ द्या’ अशा विनवण्या ती वारंवार करु लागली. यानंतर वराचा भाऊ हा वधू आणि तिच्या मैत्रिणीला कोतवाली पोलिस ठाण्यात घेऊन गेला. या प्रकरणी तीन दलाल आणि नववधूवर फसवणुकीसह अनेक कलमांच्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून नववधूला तिच्या मैत्रिणीसह अटक केली आहे. त्याचबरोबर इतर दलालांना पकडण्यासाठी अनेक पथके तयार करण्यात आली आहेत.

संबंधित बातम्या :

प्रवाशांनी कॅब चालकाला लुटले, मारहाणीत चालक जखमी, पोलिसांनी आरोपींना ‘अशा’ ठोकल्या बेड्या

तो आधी महिलांना एकांतात गाठायचा, त्यांचे हातपाय बांधायचा! मग त्यांच्या अंगावरील…

भाच्याचा मामीवर बलात्कार, शूटिंग करुन पुन्हा रुमवर येण्यासाठी ब्लॅकमेल, व्हिडीओ पाहून मामाने…

Published On - 8:00 am, Thu, 13 January 22

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI