हनीमूनला नवरीने दिलं असं गिफ्ट, नवरदेव आडवाच झाला, दुसऱ्या दिवशी डोकं पकडून बसला; आता कुटुंब टेन्शनमध्ये
राजस्थानच्या श्रीगंगानगरमध्ये एका नववधूने लग्नाच्या नावाखाली फसवणूक केली आहे. तिने हनीमूनच्या रात्री आपल्या पतीला बेहोश करण्यासाठी गुंगी आणणारा पदार्थ दिला आणि त्यानंतर दागिने व रोख रक्कम चोरी करून पळ काढला. पतीने पोलिसात तक्रार दाखल केली असून, आरोपी वधू आणि तिच्या मदतनीसांचा शोध सुरू आहे.

लग्नाच्या नावावर असंख्य फ्रॉड होण्याच्या घटना घडत आहेत. कोणतंही राज्य असो, लुटारू नवरींकडून कांड केलं जातं. अमूक ठिकाणी नवरदेवाला फसवलं, तमूक ठिकाणी नवरी फरार झाली, अशा असंख्य बातम्या आपण वाचत असतो. आता राजस्थानमधूनही एक अशीच बातमी आली आहे. राजस्थानच्या श्रीगंगानगरमधील ही बातमी आहे. या ठिकाणी एका नवरीने नवरदेवाला हनीमूनच्या रात्री गुंगी आणणारा पदार्थ पाजला. त्यानंतर अंधाराचा फायदा घेऊन घरातील दागिने, पैसे घेऊन ती फरार झाली. त्यामुळे या कुटुंबावर कुठे बोंब मारावी अशी वेळ आली आहे.
मुण्डडिया हा मोठा परिसर आहे. इथे राहणाऱ्या एका व्यक्तीने दोन लाख रुपये खर्च करून लग्न केलं आणि बायको घरी घेऊन आला. तिच्यासोबत सुखी संसार करण्याची तो स्वप्न पाहत होता. पण हनीमूनच्या रात्री सर्व काही उलटंपालटं झालं. नवरीने त्याला गुंगी आणणारे औषध पाजलं आणि घरातून पळून गेले. बरं ती एकटीच पळाली नाही. सोबत सोनं-चांदीचे दागिने, एक लाख रुपये रोख आणि इतर मौल्यवान वस्तूही घेऊन गेली. पीडित व्यक्तीच्या माहितीवरून भादरा पोलिसांनी शुक्रवारी या घटनेबद्दल लग्नाच्या नावाखाली पैसे घेतलेल्या व्यक्ती आणि महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.




लग्नासाठी स्थळ शोधले
मिळालेल्या माहितीनुसार, 35 वर्षीय जयवीरने पोलिस ठाण्यात तक्रार दिली की, तो अविवाहित होता आणि त्याच्या कुटुंबीय त्याच्यासाठी स्थळ शोधत होते. 18 फेब्रुवारी 2025 रोजी सुरेश मील, पुत्र लादुराम जाट, निवासी चक सरदारपुराबास (मीलों का बास), तहसील नोहर, आपल्या सोबत जयप्रकाश, पुत्र गिरदावर मील, निवासी चक सरदारपुराबास (मीलों का बास), तहसील नोहर यांना घेऊन त्यांच्या घरी आला. आणि त्याच्या ओळखीतील एक मुलगी आहे. तिचं नाव संगीता कुमारी आहे. ती बिहारच्या अरजनपुराची आहे आणि तिच्याशी तुझं लग्न लावून देतो. मात्र, यासाठी तुम्हाला दोन लाख रुपये द्यावे लागतील, असं त्याने सांगितलं.
सुरेश मीलने त्यांना संगीता कुमारीचा फोटो आपल्या मोबाईलमध्ये दाखवला आणि तिच्या आधार कार्डची कॉपी व्हॉट्सअॅपवर पाठवली. नंतर जयवीर आणि संगीता कुमारीचे 5 मार्च 2025 रोजी लग्न झाले. 5 मार्च 2025 रोजी संगीता कुमारीने त्याला रात्री गुंगी आणणारा पदार्थ देऊन बेशुद्ध केलं. त्यानंतर तिने पोबारा केला, असं सुरेशने सांगितलं.