AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rekha Jare Murder | तीन महिन्यांनंतरही बाळ बोठे फरार, रेखा जरेंचा मुलगा आमरण उपोषणाला

अहमदनगर पोलिसांनी तातडीने तपास करत रेखा जरेंच्या मारेकऱ्यासह 5 आरोपींना अटक केली. मात्र, या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार बाळासाहेब बोठे अद्यापही फरार आहे (Rekha Jare son Hunger Strike)

Rekha Jare Murder | तीन महिन्यांनंतरही बाळ बोठे फरार, रेखा जरेंचा मुलगा आमरण उपोषणाला
रेखा जरेंचा मुलगा रुणाल जरे आमरण उपोषणाला
| Updated on: Mar 05, 2021 | 12:52 PM
Share

अहमदनगर : यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे हत्याकांड (Rekha Jare Murder ) होऊन 3 महिने उलटले तरी अद्याप यातील मुख्य आरोपी बाळ बोठेचा (Bal Bothe) काहीही पत्ता लागलेला नाही. त्यामुळेच आता रेखा जरे यांच्या मुलाने उपोषणाचं हत्यार उपसलं आहे. रुणाल जरे याने पोलिसांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह निर्माण करत, अहमदनगरच्या पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरु केलं आहे. बाळ बोठेला तातडीने अटक करा अशी मागणी रुणाल जरे याने केली आहे. (Rekha Jare son Runal Jare on Hunger Strike for Bal Bothe Arrest)

काय होती घटना?

यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांची गाडी अहमदनगर जवळील जातेगावच्या घाटात अडवून धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली होती. 30 नोव्हेंबर रोजी नगर-पुणे महामार्गावर ही घटना घडली होती. यावेळी गाडीत बसलेल्या रुणाल याने मारेकऱ्यांना पाहिलं होतं. त्याच्याच मदतीने पोलिसांनी तातडीने 5 आरोपींना गजाआड केलं. मात्र, जेव्हा या आरोपींची चौकशी करण्यात आली, तेव्हा या हत्याकांडात शहरातील पत्रकार बाळ बोठे असल्याचं समोर आलं. बाळ बोठेने सुपारी देऊन हे हत्याकांड घडवून आणल्याचा जबाब या आरोपींनी दिला.

5 आरोपी गजाआड, मात्र बाळ बोठे फरार

अहमदनगर पोलिसांनी तातडीने तपास करत रेखा जरेंच्या मारेकऱ्यासह 5 आरोपींना अटक केली. मात्र, या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार बाळासाहेब बोठे अद्यापही फरार आहे. रेखा जरे यांची हत्या होऊन 3 महिने उलटले तरीही बाळ बोठेला पकडण्यात पोलिसांना अपयश आले आहे. बाळ बोठेला राजकीय किंवा शासकीय यंत्रणा पाठीशी घालत असल्याचा आरोप रुणाल जरे याने केला आहे. जोपर्यंत बाळ बोठेला अटक केली जात नाही, तोपर्यंत सहकुटुंब आमरण उपोषण करणार असल्याचं रुणाल जरे याने म्हटलंय. (Rekha Jare son Runal Jare on Hunger Strike for Bal Bothe Arrest)

बाळ बोठेच्या अडचणीत वाढ

यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांच्या हत्येकांडातील प्रमुख आरोपी पत्रकार बाळ बोठे याच्या अडचणीत वाढ झालीय. बाळ बोठेला पोलिसांनी फरार घोषित केलं आहे. शिवाय बोठेचा स्टॅंडिंग वॉरंट विरोधातील अर्ज पारनेरच्या सत्र न्यायालयाने फेटाळला आहे. त्यामुळे बाळ बोठे याच्याविरोधात पुढील कारवाई करण्याचा पोलिसांचा मार्ग मोकळा झालाय.

न्यायालयात काय घडलं?

22 फेब्रुवारीला पारनेर न्यायालयात सुनावणी झाली. बोठे सापडत नसल्याने पोलिसांनी त्याच्या विरोधात स्टँडिंग वॉरंट काढण्यासाठी पारनेर येथील न्यायालयात अर्ज केला होता. त्याच्यावर सुनावणी होऊन पोलिसांचा अर्ज न्यायालयाने मंजूर केला. त्यानुसार आता पुढील प्रक्रियेत बोठे याला फरार घोषित करण्यात येऊ शकते. याची कल्पना आल्याने बोठे याने स्टँडिंग वॉरंट ऑर्डरच्या विरोधात जिल्हा आणि सत्र न्यायालयात आव्हान देत अर्ज दाखल केला होता. याप्रकरणी आतापर्यंत 2 वेळेस न्यायालयात सुनावणी झाली. सरकारी वकिलांनी यावेळी न्यायालयासमोर पोलिसांचे म्हणणे लेखी स्वरूपात मांडले. त्यानुसार जिल्हा न्यायाधीश श्रीकांत आणेकर यांनी हा अर्ज फेटाळून लावला.

संबंधित बातम्या :

रेखा जरे हत्येप्रकरणी बाळ बोठेला फरार घोषित करण्यासाठी न्यायालयात अर्ज

बाळ बोठेच्या अटकेसाठी रेखा जरेंचा मुलगा आक्रमक, सहकुटुंब आमरण उपोषणाचा पोलिसांना इशारा

(Rekha Jare son Runal Jare on Hunger Strike for Bal Bothe Arrest)

जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित.
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?.
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया.
भाजप कार्यकर्त्यांचा विरोध तरीही मनसेचे दिनकर पाटील भाजपात अन्..
भाजप कार्यकर्त्यांचा विरोध तरीही मनसेचे दिनकर पाटील भाजपात अन्...
कोणतीही तडजोड नाही, वंचितकडून काँग्रेसला मोठा प्रस्ताव अन् राज्यात...
कोणतीही तडजोड नाही, वंचितकडून काँग्रेसला मोठा प्रस्ताव अन् राज्यात....
जगताप यांच्या काँग्रेस प्रवेशावरून पुणे शहर काँग्रेसमध्ये नाराजी?
जगताप यांच्या काँग्रेस प्रवेशावरून पुणे शहर काँग्रेसमध्ये नाराजी?.
भाजपचा एकाचवेळी काँग्रेस, ठाकरे सेनेला जोर का धक्का! BJPची ताकद वाढणार
भाजपचा एकाचवेळी काँग्रेस, ठाकरे सेनेला जोर का धक्का! BJPची ताकद वाढणार.
..तो भी पिटोगे, मराठी भाषेच्या अपमानावरून संदीप देशपांडेंचा थेट इशारा
..तो भी पिटोगे, मराठी भाषेच्या अपमानावरून संदीप देशपांडेंचा थेट इशारा.
ठाकरेंच्या सेनेतून विनायक पांडे, यतिन वाघ यांची हकालपट्टी, राऊतांनी...
ठाकरेंच्या सेनेतून विनायक पांडे, यतिन वाघ यांची हकालपट्टी, राऊतांनी....
देवयानी फरांदे यांची भाजप पक्षप्रवेशांवरून नाराजी, FB पोस्टनं खळबळ
देवयानी फरांदे यांची भाजप पक्षप्रवेशांवरून नाराजी, FB पोस्टनं खळबळ.