दुकान बंद करुन घरी चाललेल्या ज्वेलर्स मालकाची हत्या, हत्येचे कारण अद्याप अस्पष्ट

राजपूत हे शनिवारी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास नेहमीप्रमाणे दुकान बंद करून आपल्या मोटारसायकलवरून कशेळे-नेरळ या राज्य मार्गावरून आपल्या डोंबिवली ठाकुर्ली येथील राहत्या घरी जाण्यासाठी निघाले होते.

दुकान बंद करुन घरी चाललेल्या ज्वेलर्स मालकाची हत्या, हत्येचे कारण अद्याप अस्पष्ट
नेरळ राज्यमार्गावर ज्वेलर्स मालकाची हत्याImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Dec 05, 2022 | 8:57 PM

कर्जत : नेहमीप्रमाणे दुकान बंद करुन घरी चाललेल्या ज्वेलर्स मालकाची धारदार शस्त्रांनी वार करुन हत्या केल्याची धक्कादाक घटना नेरळ-कशेळे राज्य मार्गावर घडली आहे. कर्जत तालुक्यातील मौजे कशेळे येथील ज्वेलर्स हरिश राजपूत यांची नेरळ-कशेळे राज्य मार्गावरील पूजा रिसॉर्टजवळ हत्या करण्यात आली आहे. अज्ञात आरोपींनी राजपूत यांच्या शरीरावर धारदार शस्त्राने 8 ठिकाणी वार करून खून करून आरोपी घटनास्थळावरुन फरार झाले आहेत. याप्रकरणी नेरळ पोलीस आणि गुन्हे शाखा यांनी तपास सुरु केला आहे.

मोटारसायकलवरुन डोंबिवलीतील घरी चालले होते

कर्जत तालुक्यातील कशळे येथील बाजारपेठेतील मुख्य नाक्यावर राजपूत यांचे राजेंद्र ज्वेलर्स नामक दुकान आहे. राजपूत हे शनिवारी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास नेहमीप्रमाणे दुकान बंद करून आपल्या मोटारसायकलवरून कशेळे-नेरळ या राज्य मार्गावरून आपल्या डोंबिवली ठाकुर्ली येथील राहत्या घरी जाण्यासाठी निघाले होते.

रात्री उशिरापर्यंत घरी न पोहचल्याने कुटुंबीयांची पोलिसात धाव

हरिश राजपूत हे त्या रात्री घरी परतले नसल्याने त्यांच्या कुटुंबानी नेरळ पोलीस ठाण्यात रात्री फोन करून नेरळ पोलीस ठाणे गाठले. यावेळी नेरळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र तेंडुलकर आणि त्यांच्या पथकाने राजपूत यांच्या येण्याच्या मार्गावर शोध घेतला.

हे सुद्धा वाचा

यावेळी नेरळ-कशेळे राज्य मार्गावरील जिते ग्रामपंचायत हद्दीतील पूजा रिसॉर्ट जवळील परिसरात पोलिसांना रस्त्याच्या कडेला गवत वाकलेल्या अवस्थेत दिसून आले. तसेच या ठिकाणी राजपूत यांची मोटारसायकल ही मोडकळलेल्या अवस्थेत पडलेली दिसली.

जिते ग्रामपंचायत हद्दीत मृतावस्थेत आढळले

हरिश राजपूत यांचा शोध घेतला असता ते खोल खड्ड्याच्या बाजूला मृत अवस्थेत पडलेले आढळून आले. यावेळी राजपूत यांच्या शरीरावर धारदार शस्त्राने आठ ठिकाणी वार केल्याचे दिसून आले. घटनेचे गांभीर्य ओळखून कर्जत उपविभागीय पोलीस अधिकारी विजय लगारे हे घटनास्थळी हजर झाले.

तसेच स्थानिक पोलीस गुन्हे अन्वेषण शाखा LCB ची टीम, श्वान पथक तसेच कर्जत पोलीस ठाणे, खालापूर पोलीस ठाणे, रसायनी पोलीस ठाण्याचे पोलीसही घटनास्थळी दाखल झाले.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.