AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कर्नाटकातही ‘श्रद्धा’कांड, आधी वडिलांची हत्या केली मग 30 तुकडे केले !

सुरवातीला पोलीस चौकशीत विठ्ठल आपण निर्दोष असल्याचे पोलिसांना सांगत होता. मात्र पोलिसी खाक्या दाखवताच त्याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. यानंतर पोलिसांनी परशुरामचा मृतदेह टाकलेल्या ठिकाणी खोदकाम करुन मृतदेह ताब्यात घेतला.

कर्नाटकातही 'श्रद्धा'कांड, आधी वडिलांची हत्या केली मग 30 तुकडे केले !
पैशावरुन झालेल्या वादातून दादरमध्ये तरुणाची हत्या
| Updated on: Dec 13, 2022 | 8:39 PM
Share

बागलकोट : ‘श्रद्धाकांड’ने देशभर खळबळ माजवली असतानाच आता कर्नाटकात असेच एक हत्याकांड उघडकीस आले आहे. वडिलांची हत्या करुन मृतदेहाचे 30 तुकडे केल्याची घटना कर्नाटकातील बागलकोट जिल्ह्यात घडली आहे. मृतदेहाचे हे तुकडे मुलाने बोअरवेलच्या खड्ड्यात फेकले. या घटनेमुळे परिसरात चांगलीच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी आरोपी मुलाला ताब्यात घेतले आहे. आरोपीची चौकशी सुरु आहे. विठ्ठल असे 20 वर्षीय आरोपी मुलाचे नाव आहे.

दारुच्या मारहाण करायचा पिता

मयत परशुराम याला दारुचे व्यसन होते. दारुच्या नशेत तो नेहमी मुलाला मारहाण करायचा. नेहमीप्रमाणे 6 डिसेंबर रोजी परशुराम दारुच्या नशेत घरी आला. घरी आल्यानंतर तो विठ्ठलला मारहाण करु लागला.

मारहाणीला कंटाळून केलेल्या मारहाणीत वडिलांचा मृत्यू

वडिलांच्या मारहाणीमुळे संतापलेल्या विठ्ठलने वडिलांना रॉडने मारहाण केली. या मारहाणीत परशुरामचा मृत्यू झाला. वडिलांच्या मृत्यूनंतर विठ्ठल घाबरला. त्यानंतर त्याने मृतदेह शेतातील बोअरवेलमध्ये टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र मृतदेह बोअरवेलमध्ये ढकलू शकलना नाही.

हत्येनंतर मृतदेहाचे 30 तुकडे केले

मग विठ्ठल आयडिया सुचली. त्याने धारदार हत्यार आणले आणि परशुरामच्या मृतदेहाचे तुकडे केले. मोठ्या मुश्किलीने त्याने वडिलांच्या मृतदेहाचे 30 तुकडे केले. मग मृतदेहाचे तुकडे शेतातील बोअरवेलमध्ये फेकले.

मृतदेहाची विल्हेवाट लावल्यानंतर विठ्ठलने काही वेळ आराम केला आणि त्यानंतर फरार झाला. त्यानंतर शनिवारी तो घरी परतला. घरच्यांनी त्याच्याकडे वडिलांची चौकशी केली असता त्याने आपल्याला माहित नसल्याचे सांगितले.

परशुराम गायब असल्याने कुटुंबीयांनी पोलिसात तक्रार केली

घरच्यांनी पोलिसांना परशुराम गायब असल्याची माहिती दिली. यानंतर पोलिसांनी परशुरामचा शोध सुरु केला. मात्र त्याचा कुठेच पत्ता लागत नव्हता. तपासादरम्यान पोलिसांना परशुरामचा मुलगा विठ्ठलवर संशय येऊ लागला. यामुळे पोलिसांनी सोमवारी विठ्ठलला चौकशीसाठी ताब्यात घेतले.

पोलिसी खाक्या दाखवताच आरोपीकडून गुन्ह्याची कबुली

सुरवातीला पोलीस चौकशीत विठ्ठल आपण निर्दोष असल्याचे पोलिसांना सांगत होता. मात्र पोलिसी खाक्या दाखवताच त्याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. यानंतर पोलिसांनी परशुरामचा मृतदेह टाकलेल्या ठिकाणी खोदकाम करुन मृतदेह ताब्यात घेतला. यानंतर पोलिसांनी तात्काळ विठ्ठलला अटक केली.

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.