Love Affaris | दोघांच ठरलेलं, ट्रेनचा वेग पाहून तिची पावल मागे वळली, त्याने मात्र पाळला शब्द
Love Affaris | मनाला चटका लावणारी एक घटना समोर आलीय. राजू आणि रवीना एकाच गावात राहतात. मागच्या वर्षभरापासून ते रिलेशनशिपमध्ये आहेत. परिस्थितीमुळे दोघांच लग्न होण शक्य नव्हतं.

जयपूर : त्या दोघांच परस्परांवर जीवापाड प्रेम होतं. पण आपल्या प्रेमाच पुढे काही होऊ शकत नाही, हे दोघांना कळलेलं. समाज आपल्या नात्याला कधीही स्वीकारणार नाही हे त्यांना माहित होतं. कारण तो 34 वर्षांचा विवाहित. त्याला दोन मुलं होती. ती 20 वर्षाची अविवाहित तरुणी. कुटुंबीय आपल्या नात्याला कधी स्वीकारणार नाही, हे त्यांना ठाऊक होतं. त्यामुळे त्या दोघांनी आयुष्याचा शेवट करण्याच ठरवलं. एकत्र जीवन संपवायच म्हणून दोघे राजस्थान रेल्वे स्टेशनवर गेले होते. समोरुन धडाडत ट्रेन येत होती. ठरल्याप्रमाणे त्या पुरुषाने धावत्या ट्रेनसमोर उडी मारली. ट्रेन खाली चिरडून त्याचा जागीच मृत्यू झाला. पण अखेरच्या क्षणी मुलीने मन बदललं.
गुरुवारी रात्री राजस्थानच्या बालोत्रा जिल्ह्यात पाचपाद्रा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. राजू भट अस मृत व्यक्तीच नाव आहे. भट दैनंदिन मजूर म्हणून काम करत होता. त्याला पत्नी आणि दोन मुलं आहेत. राजूच्या कुटुंबाने मुलगी रवीना (20) आणि तिच्या कुटुंबावर हत्येचा आरोप केला आहे. त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणात चौकशी सुरु केलीय. राजू आणि रवीना एकाच गावात राहतात. मागच्या वर्षभरापासून ते रिलेशनशिपमध्ये आहेत. परिस्थितीमुळे दोघांच लग्न होण शक्य नव्हतं.
रेल्वे रुळाजवळ दोघे पोहोचले
गुरुवारी राजू आणि रवीना यांच्यात जोरदार वादावादी झाली. त्यानंतर दोघांनी जीवन संपवण्याचा निर्णय घेतला. खेड गावातील रेल्वे रुळाजवळ दोघे पोहोचले. धडाडत येणाऱ्या ट्रेनचा वेग पाहून रवीनाची पावल मागे वळली. पण त्याने मात्र धावत्या ट्रेनसमोर उडी मारली. ट्रेनचा गार्ड आणि अन्य स्टेशन स्टाफने राजूचा मृतदेह बालोत्रा स्टेशनवर आणला. पोलिस तिथे आले, त्यांनी राजूचा मृतदेह रुग्णालयाच्या शवागरात पाठवला.
कुटुंबीयांच म्हणण काय?
राजूच्या कुटुंबाने मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. दोषींवर कारवाई करण्याची त्यांनी मागणी केली. राजूला याआधी हत्येची धमकी मिळाली होती, असं त्याच्या भावाने सांगितलं. रवीनाच्या कुटुंबाने राजूची हत्या केली व आत्महत्या वाटावी यासाठी त्याचा मृतदेह रेल्वे रुळावर टाकला असा वीरामारमने सांगितलं. कुटुंबातील सदस्याने सांगितलं की, राजूच 15 वर्षांपूर्वी लग्न झालं होतं. त्याला आठ आणि पाच वर्षांचा मुलगा आहे.
