ना दागिने, ना पैसे, चोरट्यांनी चोरुन नेले चक्क खेकडे ! रत्नागिरीतील चित्रविचित्र चोरी, चर्चांना उधाण

रत्नागिरीत एक चित्रविचित्र चोरीची घटना समोर आली आहे. चोरांनी दागिने किंवा पैसे लंपास केलेले नाहीत. तर त्यांनी थेट खेकडा संवर्धन केंद्रावरच डल्ला मारला आहे.

ना दागिने, ना पैसे, चोरट्यांनी चोरुन नेले चक्क खेकडे ! रत्नागिरीतील चित्रविचित्र चोरी, चर्चांना उधाण
रत्नागिरीतील चित्रविचित्र चोरी
Follow us
| Updated on: Aug 03, 2021 | 8:53 PM

रत्नागिरी : चोरी करणं हा गुन्हा आहेच यासोबत ही एक वृत्तीदेखील आहे. चोरटे कधी काय चोरुन नेतील याचा कधीच कुणाला भरोसा नाही. मात्र, रत्नागिरीत एक चित्रविचित्र चोरीची घटना समोर आली आहे. चोरांनी दागिने किंवा पैसे लंपास केलेले नाहीत. तर त्यांनी थेट खेकडा संवर्धन केंद्रावरच डल्ला मारला आहे. या केंद्रातील तब्बल 12 हजारांचे खेकडे चोरांनी पळवून नेले आहेत. त्यामुळे या चोरीची आता संपूर्ण जिल्ह्यात चर्चा होऊ लागली आहे. विशेष म्हणजे या खेकडा चोरांना पकडायचं कसं? हे पोलिसांपुढील देखील मोठं आव्हान आहे.

काही खवय्यांनी डल्ला मारल्याची चर्चा

चेन्नईच्या केंद्रीय निमखारे मत्स्य संवर्धन संस्थेअंतर्गत असलेल्या परटवणे येथील युनिटमध्ये ही चोरी झाली. अज्ञात चोरट्याने पूर्ण तयार झालेले 12 हजार किंमतीचे 300 ते 500 ग्रॅम वजणाचे 15 किलो खेकडे चोरुन नेले आहेत. दरम्यान, आकाडीचा पार्श्वभूमीवर खवय्यांनी या खेकडा संवर्धन केंद्रावर डल्ला मारल्याची चर्चा आहे. शहर पोलीस ठाण्यासह शहरात या चोरीची जोरदार चर्चा सुरु आहे.

पोलीस ठाण्यात तक्रार

शहरातील परटवणे येथे चेन्नईच्या केंद्रीय निमखारे मत्स्य संवर्धन संस्थेअंतर्गत खेकडा संवर्धन केंद्र आहे. या तलावातून 25 ते 26 जुलै दरम्यान अज्ञात इसमाने या खेकड्यांची चोरी केल्याचा संशय आहे. खेकडे पूर्ण तयार झाले असून 300 ते 500 ग्रॅम वजनाचे होते. एकूण 15 किलो खेकडे अज्ञातांनी पळविले आहेत. याबाबत केंद्राचे व्यवस्थापक स्वेता पाटील यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.

चोरीची घटना कशी उघड झाली?

बॉक्समध्ये ठेवण्यात येणाऱ्या खेकड्यांना रोज खाद्य घालण्यात येते. 26 जुलै खाद्य पदार्थ देत असताना हा प्रकार लक्षात आला. या अजब चोरीचीमध्ये तब्बल 12 हजार रुपये किंमतीचे खेकडे चोरीला गेल्याचं तक्रारीत म्हटलं आहे. येत्या रविवारपासून श्रावण महिना सुरु होत आहे. त्यामुळे आकाडी साजरी करण्यासाठी बुधवार, शुक्रवार आणि रविवार हे तीन दिवस असल्याने काही खवय्यांनी ही चोरी केल्याचा पोलिसांचा संशय आहे.

खरंतर कोकणात अशी शेती वाढावी आणि इथल्या जनतेला याचा फायदा व्हावा म्हणून हा प्रकल्प या ठिकाणी सुरू करण्यात आला आहे. मात्र संशोधन पूर्ण होण्याआधीच इथल्या खेकड्यांअवर चोरट्यांनी डल्ला मारला आहे.

हेही वाचा :

जगावेगळी चोरी! तलावातून चोरले तब्बल 5 लाखांचे मासे, चौघांविरोधात तक्रार, पोलीसही चक्रावले

फेसबुक, व्हाट्सअ‍ॅप, इन्स्टाग्रामवर हातात हत्यारं असलेले फोटो, पुण्यात 19 जणांना बेड्या, पोलिसांची मोठी कारवाई

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.