नाशिकात दिवसभर नुसता जाळ आणि धूर, आगीच्या तब्बल तीन घटना

पहिली आगीची घटना ही टीपी टायरच्या गोडाऊनला लागलेली आहे. दुसरीकडे नाशिक (Nashik) जवळच्या ओढा गावाजवळ मंगळवारी दुपारी बर्निंग कारचा (Burning car) थरार पाहायला मिळाला.

नाशिकात दिवसभर नुसता जाळ आणि धूर, आगीच्या तब्बल तीन घटना
नाशिकमध्ये आगीच्या अनेक घटनाImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Mar 29, 2022 | 9:46 PM

नाशिक : राज्यात आज दिवसभरात आगीच्या अनेक घटना घडल्या आहेत. त्यात नाशिकमधील तीन आगींच्या (Fire) घटनांनी सर्वाचं लक्ष वेधून घेतले. पहिली आगीची घटना ही टीपी टायरच्या गोडाऊनला लागलेली आहे. दुसरीकडे नाशिक (Nashik) जवळच्या ओढा गावाजवळ मंगळवारी दुपारी बर्निंग कारचा (Burning car) थरार पाहायला मिळाला. या दोन्ही आगींच्या घटनेत मोठं नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे. लासलगाव येथे टायर गोडाऊनला लागलेल्या आगीत माशानेरी व टायर जळून खाक झाल्याने अंदाजे एक कोटी रुपयांचं नुकसान झालंय. तर कांदा गोडाऊनला लागलेल्या आगीत दोन ते तीन लाख रुपयांचे नुकसान झाले असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आलाय. त्यामुळे या आगीची दाहकता लक्षात येते. गॅरेजला लागलेली आग ही अत्यंत वेगाने पसरली होती.

परिसरात धुराचे मोठे लोट

लासलगाव येथील बडोदा बँकेच्या समोर असलेल्या शिव रस्त्यावर टीपी टायरच्या गोडाऊनला आज दुपारी साडेचार वाजेच्या दरम्यान अचानक भीषण आग लागली.आगीचे लोळ इतके प्रचंड होते की या टायरच्या गोडाऊन मधून प्रचंड आगीच्या ज्वाला आणि धुराचे लोट दिसत होते.आणि आसपासच्या परिसरात आगीची धग जाणवत होती. त्यामुळे शेजारील कांद्याच्या गोडाऊन देखील ठिकठिकाणी आग लागल्यामुळे कांद्याच्या गोडाऊन चे सुद्धा मोठे नुकसान झाले.आग विझवण्याच्या कामात धुरामुळे अडथळे येत होते.या ठिकाणी बघ्यांची प्रचंड गर्दी उसळल्यामुळे रेल्वे स्टेशन मार्गावरही रहदारी खोळंबली होती. त्यामुळेही आग विझवण्यात अडचणी येत होत्या.

अग्निशमन दलाची एकही गाडी नाही

लासलगावला अग्निशमन दलाची गाडी नसल्यामुळे आग विझवण्यासाठी मोठी अडचण निर्माण झाली.पिंपळगाव बसवंत,चांदवड,मनमाड व येवला येथून तातडीने अग्निशमन दलाच्या पाच गाड्या पाचारण करण्यात आल्या. सुरवातीला लासलगाव ग्रामपंचायतच्या कर्मचाऱ्यांनी व स्थानिक युवकांनी देखील पाण्याचे टँकर सह आग विझवण्यासाठी प्रयत्न केले .आगीचे लोळ इतके प्रचंड असल्यामुळे आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीने प्रयत्न करण्यात येत होते. आगीचे कारण अस्पष्ट जरी असले तरी ही आग लागली कशी याबाबत उलटसुलट चर्चा बघावयास मिळाली. तिसरी आगीची घटना शॉर्टसर्कीट होऊन झाल्याचे निदर्शनास आले आहे.

Wardha Suicide : प्रेम केलं, पण संघर्षाला मुकले; प्रेमी युगुलाची विहिरीत उडी घेत आत्महत्या

लायटरच्या जीवावर चोर मांगे More! लायटरसारखी बंदूक ताणून लुटमार करणाऱ्यांना कल्याणमध्ये अटक

Sangli Crime : सांगलीत चित्तथरारक पाठलाग करत पोलिसांनी पकडला चोरीला गेलेला ट्रॅक्टर

Non Stop LIVE Update
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.