AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अभिनेता समीर कोचर आणि अभिनेत्री करिश्मा तन्नाच्या पतीची कोट्यवधींची फसवणूक, गुन्हा दाखल

अभिनेता समीर कोचर, अभिनेत्री करिश्मा तन्ना आणि तिचा पती वरूण बंगेरा यांची एक कोटी रुपयांची फसवणूक झाली असून त्यांनी अंधेरी पोलिसांकडे तक्रार दाखल केली. वांद्रे येथे फ्लॅट देण्याच्या नावाखाली फसवणूक करण्यात आल्याचा आरोप आहे.

अभिनेता समीर कोचर आणि अभिनेत्री करिश्मा तन्नाच्या पतीची कोट्यवधींची फसवणूक, गुन्हा दाखल
| Updated on: Nov 22, 2023 | 11:53 AM
Share

मुंबई | 22 नोव्हेंबर 2023 : प्रसिद्ध टीव्ही अभिनेता आणि अँकर समीर कोच्चर तसेच प्रसिद्ध अभिनेत्री करिश्मा तन्ना हिचा पती वरूण बंगेरा यांना मोठा धक्का बसला आहे. त्या दोघांचीही मोठी फसवणूक झाल्याची माहिती समोर आली आहे. वांद्रे येथे फ्लॅट घेण्याच्या नावाखाली त्यांना फसवण्यात आले आहे. यानंतर समीर कोचर आणि बंगेरा या दोघांनीही अंधेरी पोलिसांत धाव घेत दोन जणांविरोधात तक्रार नोंदवली आहे. त्याआधारे अंधेरी पोलिसांनी बांधकाम व्यावसायिक दाम्पत्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

वांद्रे येथे फ्लॅट देण्याच्या नावाखाली फसवणूक

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी प्रोनित नाथ व त्यांची पत्नी अमिषा यांच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वांद्रे येथील त्यांच्या बांधकाम साइटवर फ्लॅट विकण्याच्या नावाखाली समीर आणि वरूण बंगेरा यांची 1.03 कोटींची फसवणूक केल्याचे आरोपही त्यांच्यावर आहे. एफआयनुसार, हे प्रकरण डिसेंबर 2020 मधील आहे. समीर कोचर आणि त्याची पत्नी राधिका तसेच त्यांचा मित्र वरूण बंगेरा हे डिसेंबर 2020 मध्ये घर शोधत होते. आरोपी प्रणित नाथ आणि अमिषा हे दोघे वांद्रे पश्चिम येथील पाली गावात चार मजली इमारत बांधून नंतर ती विकण्याचा विचार करत असल्याचे त्यांना समजले.

त्यानंतर समीर कोचर आणि वरुण बंगेरा यांनी त्या वेळी त्या साईटला भेट दिली आणि प्रणित नाथ यांची भेट घेतली. प्रणित नाथ यांनी त्यांना एक इमारत बांधून ती विकणार असल्याचे सांगितले आणि त्यांना इमारतीचा नकाशा दाखवला. कोचर दाम्पत्याने तिसऱ्या मजल्यावरील 660 स्क्वेअर फूटच्या फ्लॅट खरेदी करण्याचा निर्णय घेतला. तर बंगेरा यांनी चौथ्या मजल्यावरील 750 स्क्वेअर फूटचा फ्लॅट खरेदी करण्याचा निर्णय घेतला.

जमिनीवर कर्ज नसल्याचा प्रोनितने केला दावा

त्यानंतर, कोचर, बंगेरा आणि प्रोनित यांची मीटिंग झाली. या जमिनीवर कोणतेही कर्ज नसल्याचे प्रोनितने नमूद केले. कोचर यांच्या फ्लॅटची किंमत ₹1.95 कोटी निश्चित करण्यात आली होती, ज्याची टोकन रक्कम ₹11 लाख होती. कोचर यांनी 9 डिसेंबर 2020 रोजी त्याच रकमेसाठी HDFC बँकेकडून चेक जारी केला. तर बंगेरांनी मध्ये टोकन रक्कम म्हणून ₹19.85 लाखांचा धनादेश दिला होता.

मात्र नंतर या मालमत्तेवर कर्ज असल्याचे समीर कोचर आणि वरूण बंगेरा यांना समजले. तसेच प्रोनित याने ही जमीन एका फायनॅन्शिअल कंपनीकडे गहाण ठेवण्याची माहितीदेखील त्यांना मिळाली. त्या दोघांनी तातडीने प्रोनित याची भेट घेऊन जाब विचारला. मात्र गहाण ठेवलेली जमीन सोडवून घेतल्यानंतर त्यांचे फ्लॅट त्यांना विकण्यात येतील असे आश्वासन प्रोनितने समीर आणि वरूण यांना दिले. तसेच एका सामंजस्य करारावर (एमओयू) स्वाक्षरी करण्याची विनंती केली. 30 मार्च 2021 रोजी या सह्या करण्यात आल्या. त्या सामंजस्य करारानुसार, 30% रक्कम ताबडतोब अदा केली जाईल आणि उर्वरित रक्कम टायटल क्लिअर केल्यानंतर दिली जाईल.

कोचर यांनी 4 एप्रिल 2021 रोजी चेकद्वारे ₹18.25 लाख दिले आणि बंगेरा यांनी त्याच तारखेला ₹12.40 लाखांचा चेक दिला. त्यानंतर कोचर आणि बंगेरा यांनी इमारतीचं बांधकाम कुठवर आलं याबाबत प्रोनितकडे वारंवार चौकशी केली. हे बांधकाम तीन महिन्यात पूर्ण होईल आणि ऑक्युपेशन सर्टीफिरेट मिळेल, असे आरोपीने त्यांना 3 जून 2022 मध्ये सांगितले.

आमचे पैसे वापरून कर्ज फेडले

अचानक, 23 जून 2023 रोजी नाथ यांनी कोचर आणि बंगेरा यांना मेसेज केला आणि आपल्याला ही प्रॉपर्टी विकायची नसल्याचे कळवले. हे ऐकून दोघांनाही धक्का बसला. प्रोनित नाथ यांने आमच्या पैशांचा वापर कर्जासाठी केला आणि त्यांची फसवणूक केली, असा दावा समीर कोचर आणि बंगेरा यांनी तक्रारीत केला आहे. याप्रकरणी कोचर यांनी नाथ यांच्याकडे चौकशीही केली मात्र मे 2023मध्ये नाथ यांनी त्यांना कायदेशीर नोटीस पाठवली. कोचर यांनीही उत्तर दिले, परंतु नाथ यांनी पुढे उत्तर दिले नाही.

त्यानंतर कोचर आणि बंगेरा यांनी पोलिसांत धाव घेत फसवणूक झाल्याची तक्रार नोंदवली. याप्रकरणी अंधेरी पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा
कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा.
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर.
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान.
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा.
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक.
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:.
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज.
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा.
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.