मंदिरात साधूची हत्या, आरोपी म्हणतो वीस वर्षांपूर्वी झालेल्या माझ्या वडिलांच्या खूनाचा सूड घेतला

आरोपीने साधू किरपाल सिंह यांची कुऱ्हाडीने वार करुन निर्घृण हत्या केली आणि घटनास्थळावरून पळून गेल्याचा आरोप आहे. गावातील लोक सकाळी मंदिरात प्रार्थना करण्यासाठी गेले असता साधूचा मृतदेह मंदिराच्या आवारात पडलेला आढळला.

मंदिरात साधूची हत्या, आरोपी म्हणतो वीस वर्षांपूर्वी झालेल्या माझ्या वडिलांच्या खूनाचा सूड घेतला
प्रातिनिधीक फोटो

लखनौ : उत्तर प्रदेशातील एटा जिल्ह्यातील मंदिराच्या छतावर झोपलेल्या साधूची कुऱ्हाडीने वार करुन निर्घृण हत्या करण्यात आली. मंदिरात साधूची हत्या झाल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. साधूच्या मान आणि चेहऱ्यावर कुऱ्हाडीने वार केल्याचं वृत्त आहे. पोलिसांनी साधूचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवला आहे. आरोपीला अटक करण्यात आली असून या प्रकरणाचा तपास सुरु आहे.

काय आहे प्रकरण?

ही संपूर्ण घटना उत्तर प्रदेशातील एटा जिल्ह्यातील कोतवाली ग्रामीण भागातील नागला जगरुप गावाची आहे. गढी तालुक्यातील रहिवासी असलेले 52 वर्षीय साधू किरपाल सिंह हे एका महिन्यापूर्वीच मंदिरात राहायला आले होते. काल रात्री आरोपी तरुण त्यांच्याकडे आला आणि त्याने त्यांच्यासोबत जेवण केले.

कुऱ्हाडीने वार करुन निर्घृण हत्या

आरोपीने साधू किरपाल सिंह यांची कुऱ्हाडीने वार करुन निर्घृण हत्या केली आणि घटनास्थळावरून पळून गेल्याचा आरोप आहे. गावातील लोक सकाळी मंदिरात प्रार्थना करण्यासाठी गेले असता साधूचा मृतदेह मंदिराच्या आवारात पडलेला आढळला.

आरोपीकडून हत्येची कबुली

साधूच्या हत्येची बातमी मिळतातच पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचले. वरिष्ठ पोलीस अधीक्षक उदय शंकर सिंह हे मोठ्या पोलीस बंदोबस्तासह घटनास्थळी आले. त्यानंतर आरोपीला अटक करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक केलेल्या आरोपीने साधूची हत्या केल्याची कबुली दिली आहे.

वीस वर्षांपासून संधीची प्रतीक्षा

20 वर्षांपूर्वी साधू किरपाल सिंह यांनी आपल्या वडिलांचा खून केला होता, ज्याचा बदला घेण्यासाठी मी गेल्या 20 वर्षांपासून वाट पाहत होतो, असा दावा आरोपीने केला आहे. जेव्हा मला एका साधूच्या वेशात मंदिरात राहणाऱ्या किरपालबद्दल कळले तेव्हा त्याच्याशी मैत्री करुन संधी मिळताच मी त्याचा खून केला, असा दावाही त्याने केला.

बुलडाण्यात डोंगर पायथ्याशी तरुणाचा मृतदेह

दरम्यान, बुलडाण्यात डोंगराच्या पायथ्याशी एका तरुणाचा मृतदेह काही दिवसांपूर्वी संशयास्पदरित्या आढळला होता. बुलडाणा जिल्ह्यातील खामगांव तालुक्यातील गारडगाव शिवारातील डोंगराच्या पायथ्याशी 32 वर्षीय व्यक्तीचा मृतदेह गावातील नागरिकांना आढळून आला. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली.

संतोष टवरे (रा. एकलारा बानोदा, तालुका संग्रामपूर) असे मृत तरुणाचे नाव असल्याचे त्याच्याजवळ मिळालेल्या आधार कार्डावरुन समजले होते. मृतदेहाजवळ दारुची छोटी बॉटल, एक गुलाबाचे फूल, ब्लाऊज आणि एक अगरबत्तीचा पुडाही आढळून आल्याने ही घटना घातपात असल्याची शंका व्यक्त केली जात आहे.

संबंधित बातम्या :

उल्हासनगरात वालधुनी नदीत अज्ञात मृतदेह, परिसरात खळबळ, हत्या की आत्महत्या, गूढ कसं उलगडणार?

मुलाच्या काळजीमुळे अचानक यूटर्न, दोघांचा बळी घेणाऱ्या अपघातानंतर कार चालकाचा दावा

लग्नाच्या आमिषाने विवाहित पोलीस उपनिरीक्षकाकडून बलात्कार, कोथरुड पोलिसात तक्रार

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI