AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जिच्या हत्येपायी 7 वर्ष तुरुंगात काढली, ती जिवंत निघाली! पोलीसही चक्रावले

जिचं अपहरण करुन हत्या केल्याप्रकरणी 7 वर्षांपासून जेलमध्ये तो शिक्षा भोगतोय, ती जिवंत कशी?

जिच्या हत्येपायी 7 वर्ष तुरुंगात काढली, ती जिवंत निघाली! पोलीसही चक्रावले
हीच ती जिवंत मुलगी, जिच्या हत्येची त्याने 7 वर्ष शिक्षा भोगली!Image Credit source: TV9 Marathi
| Updated on: Dec 06, 2022 | 10:56 AM
Share

उत्तर प्रदेश : अलीगड इथं एक विचित्र प्रकार समोर आला आहे. तब्बल 7 वर्षानंतर हत्या झालेली मुलगी जिवंत सापडली आहे. हत्या झालेली व्यक्ती जिवंत कशी काय असू शकेल, असा प्रश्न तुम्हालाही पडला असेलच. नेमका असाच प्रश्न पोलिसांनाही पडला. अखेर ज्या मुलीची हत्या करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला होता, तिला जिवंत पाहून सगळेच चक्रावले. धक्कादायक बाब म्हणजे सात वर्षांपूर्वी या मुलीच्या अपहरण आणि हत्येप्रकरणी एका तरुणाला अटकही करण्यात आली होती.

या तरुणाची आई सात वर्षांपासून आपल्या मुलाला खोट्या प्रकरणात गोवण्यात आल्याबाबत लढा देत राहिली. पण सात वर्षांचा मोठा आणि ऐन उमेदीचा काळ या तरुणाला जेलमध्ये घालवावा लागला आहे. हे सगळं प्रकरण नेमकं काय आहे, हे सविस्तर जाणून घेऊयात. एखाद्या मर्डर मिस्ट्री सिनेमालाही लाजवेल, असा अजब प्रकार समोर आला आहे.

नेमकं काय प्रकरण?

तो दिवस होत 7 फेब्रुवारी 2015. दहावीत शिकणारी एक विद्यार्थीनी बेपत्ता झाली. अनेक महिने मुलीचा शोध सुरु होता, पण मुलीचा काही थांगपत्ता लागला नाही. अखेर सप्टेंबर महिन्यात एका संशयास्पद मृतदेह पोलिसांना आढळून आला.

हा मृतदेह ओळखूही येत नव्हता. या मृतदेहावर असलेल्या कपड्यांच्या आधारे तिची ओळख पटवण्यात आली होती. हा मृतदेह आपल्याच मुलीचा आहे, असं हरवलेल्या मुलीच्या वडिलांनी पोलिसांना सांगितलं. त्यानंतर विष्णू नावाच्या एका तरुणावर त्यांनी मुलीची हत्या केल्याचा आरोप केला.

विष्णू हा एक विधवा महिलेचा एकुलता एक मुलगा. विष्णूने आपल्या मुलीचं फूस लावून तिचं अपहरण केलं आणि नंतर तिची हत्या केली, असा आरोप करण्यात आला. या आरोपांनुसार पोलिसांनी चार्जशीट तयार केली. 25 सप्टेंबर रोजी आरोपपत्र दाखल करत पोलिसांनी विष्णूला तुरुंगात धाडलं.

..आणि ते हादरले!

आपल्या मुलाला फसवून त्याला जेलमध्ये अडकवण्यात आलं आहे, असं त्याच्या आईने म्हटलं. विष्णूच्या आईचं नाव सुनिता. सुनिता यांनी पोलिसांनी वारंवार याबाबत सांगितलं. पण अखेर त्यांनाच हरवलेल्या मुलीची हत्या झाली नसून ती जिवंत आहे, हे कळलं. त्यांनी मुलीचा शोध घेतला. यावेळी जे सत्य समोर आलं, त्याने सुनिता हादरुनच गेल्या.

ज्या मुलीचं अपहरण करुन हत्या झाल्याप्रकरणी सुनिता यांचा मुलगा तुरुंगात सात वर्षांपासून जेलमध्ये शिक्षा भोगत होता, ती मुलगी तर लग्न करुन पत्नी आणि दोन मुलांसह आनंदाने संसार करतेय, हे समोर आलं. ही बाब पोलिसांना सुनिया यांनी सांगितली. अखेर पोलिसांनीही सुनिता यांचं म्हणणं ऐकून चौकशी केली आणि वास्तव समोर आलं.

आता पोलिसांनी या मुलीला अटक केली आहे. तसंच तिला कोर्टासमोर हजर केल्यानंतर लवकरच तिची रवानगी तुरुंगात केली जाईल, असं पोलिसांनी म्हटलंय. नेमकी आता या मुलीला काय शिक्षा होते, हे पाहणं महत्ताचंय.

खरंतर विष्णू जेलमध्ये असताना जामीनावर बाहेरही आला. पण कोर्टात सुरु असलेल्या खटल्यादरम्यान, त्याला पुन्हा एकदा जेलमध्ये जावं लागलं. याच दरम्यान, विष्णूच्या कुटुंबीयांनी हरवलेल्या मुलीचा शोध घेण्यास सुरुवात केली. तेव्हा ही मुलगी जिवंत असल्याचं त्यांचा निदर्शनास आलं. विशेष म्हणजे ही बाब त्या मुलीच्या घरातल्यांनाही माहीत होती. पण मुलीच्या घरातले हे प्रकरण मिटवण्यासाठी विष्णूच्या आईवर दबाव टाकत होते.

गूढ वाढलं!

आता हा सगळा अजब प्रकार समोर आल्यानंतर पोलिसांसमोर अजब आव्हान उभं ठाकलंय. ज्या मृतदेहाची ओळख आपली मुलगी असल्याचं आता सापडलेल्या मुलीच्या वडिलांनी सांगितलं होतं, ती मुलगी नेमकी कोण? तिच्यासोबत काय झालं होतं, या प्रश्नाचंही गूढ कायम आहे. त्याचाही तपास पोलिसांना करावा लागणार आहे. शिवाय आता जिवंत सापडलेल्या मुलीच्या चौकशीतूनही नेमकं घडलं काय होतं, या प्रश्नांचाही खुलासा करावा लागणार आहे.

दरम्यान, आता कोर्टातील सुनावणीनंतर गेल्या 7 वर्षांपासून जिवंत मुलीच्या हत्येप्रकरणी तुरुंगात असलेल्या विष्णूची लवकरच सुटका होण्याची शक्यता आहे. याप्रकरणी आता पुढे नेमकं काय घडेल, याकडेही सगळ्याचं लक्ष लागलंय.

मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही.
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं.
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते.
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं.
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा.
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू.
कुऱ्हाडीचा दांडा आपलीच लोक होत आहेत, उद्धव ठाकरे भावूक होत म्हणाले...
कुऱ्हाडीचा दांडा आपलीच लोक होत आहेत, उद्धव ठाकरे भावूक होत म्हणाले....
माझ्या डॉक्टरने पक्ष बदलला की काय ? राज यांच्या वक्तव्याने एकच हशा....
माझ्या डॉक्टरने पक्ष बदलला की काय ? राज यांच्या वक्तव्याने एकच हशा.....
'माझ्यासाठी ते पक्ष सोडणं नव्हतं, माझ्यासाठी...,'काय म्हणाले राज ठाकरे
'माझ्यासाठी ते पक्ष सोडणं नव्हतं, माझ्यासाठी...,'काय म्हणाले राज ठाकरे.
छगन भुजबळांना मोठा दिलासा; 'या' घोटाळा प्रकरणात ईडीकडून क्लीन चिट
छगन भुजबळांना मोठा दिलासा; 'या' घोटाळा प्रकरणात ईडीकडून क्लीन चिट.