AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लग्नानंतर दोनच दिवसात नवविवाहितेवर गँगरेप, पतीसह दोन दीरांकडून अत्याचार

पीडितेच्या आरोपानुसार सासरी सहा ते सात जणांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. बलात्काऱ्यांमध्ये तिचा पती आणि दोघा मोठ्या दीरांचा समावेश होता. धक्कादायक म्हणजे गँगरेप करायला तिच्या दोन नणंदा आणि जावाही प्रोत्साहन देत होत्या.

लग्नानंतर दोनच दिवसात नवविवाहितेवर गँगरेप, पतीसह दोन दीरांकडून अत्याचार
फोटो : प्रतिकात्मक
| Edited By: | Updated on: Jun 26, 2021 | 3:21 PM
Share

लखनौ : लग्नानंतर दोनच दिवसात नवविवाहितेवर सामूहिक बलात्कार करण्यात आला. धक्कादायक म्हणजे गँगरेप करणारे दुसरे-तिसरे कोणी नसून तिचा पती, दोन दीर आणि इतर नातेवाईकच होते. अत्याचाराचा कळस म्हणजे तिच्या लैंगिक अवयवांना गरम चटके देऊन काठीही घालण्यात आली. पीडितेच्या गंभीर आरोपांनी उत्तर प्रदेशातील बदायूं जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. (Uttar Pradesh Newly Married Girl allegedly Gang Raped by Husband and in laws)

हुंडा न मिळाल्याने छळ

पीडितेच्या लग्नाला जेमतेम दोन दिवस झाले होते. नवऱ्यासोबत सुखी संसाराची स्वप्नं ती रंगवत होती. मात्र तिचा स्वप्नभंग करणारे राक्षस तिच्याच सासरी दीरांच्या रुपात लपून बसले होते. उत्तर प्रदेशातील बदायूं जिल्ह्यात जरीफनगर भागात ही घटना घडली. उस्मानपूरमध्ये राहणाऱ्या युवकासोबत 22 जूनला तरुणीचा विवाह झाला होता. मात्र मनाजोगता हुंडा न मिळाल्याने सासरची मंडळी नाराज होती.

दीरांकडून अत्याचार, नणंद-जावाही सामील

पीडितेच्या आरोपानुसार सासरी सहा ते सात जणांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. बलात्काऱ्यांमध्ये तिचा पती आणि दोघा मोठ्या दीरांचा समावेश होता. धक्कादायक म्हणजे गँगरेप करायला तिच्या दोन नणंदा आणि जावाही प्रोत्साहन देत होत्या. सासरच्या मंडळींचं मन न भरल्यामुळे त्यांनी तिच्या गुप्तांगात काठी घालून गरम चटकेही दिले

पीडितेच्या वडिलांनी सासरच्या मंडळींवर हुंड्यासाठी छळ आणि सामूहिक बलात्काराची तक्रार दिली आहे. पीडितेच्या पतीला पोलिसांनी अटक केली असून अधिक तपास सुरु आहे.

मध्य प्रदेशात विवाहितेवर बलात्कार

दरम्यान, मध्य प्रदेशात विवाहितेवर घरात घुसून बलात्कार झाल्याची घटना काही दिवसांपूर्वी उघडकीस आली होती. धक्कादायक म्हणजे घटना घडली, त्यावेळी महिला पती आणि मुलांसोबत घरात झोपली होती. रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत आरोपी घरात शिरला, आणि महिला त्याला पती समजल्यामुळे भलताच प्रकार घडला. महिलेला आपली चूक समजताच तिने आरडाओरड केली, त्यावेळी आरोपी पसार झाला.

संबंधित बातम्या :

बांद्रा बँडस्टँडला 20 वर्षीय तरुणीवर गँगरेप, बॉयफ्रेण्डसह तिघा जणांना अटक

फेसबुकवर प्रपोज, आई-वडिलांना भेटवण्याच्या बहाण्याने घरी बोलावलं, 25 मित्रांकडून गँगरेप

(Uttar Pradesh Newly Married Girl allegedly Gang Raped by Husband and in laws)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.