5

सामूहिक बलात्कारानंतर अल्पवयीन मुलीची हत्या, ऊसाच्या शेतात मृतदेह फेकला, पोलिसांकडून प्रियकराला बेड्या

पीलीभीतमध्ये उसाच्या शेतात एका अल्पवयीन मुलीचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळल्याने खळबळ उडाली. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. त्यानंतर अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. तर दुसरीकडे पोलिसांनी तरुणीच्या प्रियकराला ताब्यात घेतले आहे.

सामूहिक बलात्कारानंतर अल्पवयीन मुलीची हत्या, ऊसाच्या शेतात मृतदेह फेकला, पोलिसांकडून प्रियकराला बेड्या
pilibhit teenager Girl murder
Follow us
| Updated on: Nov 14, 2021 | 2:19 PM

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील पिलीभीतमध्ये माणुसकीला काळीमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. पीलीभीतमध्ये उसाच्या शेतात एका अल्पवयीन मुलीचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळल्याने खळबळ उडाली. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. त्यानंतर अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. तर दुसरीकडे पोलिसांनी तरुणीच्या प्रियकराला ताब्यात घेतले आहे. पोलिस प्रेमप्रकरणाचा अँगल डोळ्यासमोर ठेऊन तपास करत आहेत.

ही काळीज पिळवटून टाकणारी घटना पीलीभीतमधील बारखेडा भागातील आहे. 16 वर्षांची मुलगी 13 नोव्हेंबर रोजी कोचिंग आणि कॉलेजला गेली होती. नेहमीप्रमाणे ती दुपारपर्यंत परत यायची. मात्र 13 नोव्हेंबर रोजी सायंकाळपर्यंत ती घरी परतली नाही, अशी माहिती मृत मुलीच्या वडिलांनी पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी पुढील तपास सुरु केला.

उसाच्या शेतात नग्रावस्थेत मृतदेह आढळला

अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी सांगितले की, त्यांनी मुलीचा शोध घेतला असता गावातील शेतात कपड्यांशिवाय मृतदेह आढळून आला. शरीरावर खोल जखमेच्या खुणा होत्या. घटनास्थळी मुलीची पुस्तके आणि बॅग पडून होती. तसेच चार रिकाम्या बिअरच्या बाटल्या होत्या. अशा स्थितीत अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे. आरोपीने बलात्कारानंतर खून केल्याच्या चर्चा परिसरात होत आहेत.

जिल्हा पोलिस अधिक्षक काय म्हणाले?

“अल्पवयीन मुलीचा मृतदेह ऊसाच्या शेतात सापडला. मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठविण्यात आला. कुटुंबीयांच्या तक्रारीवरून गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी चार टीम तयार करण्यात आल्या आहेत. या प्रकरणाचा लवकरच सविस्तर उलगडा होईल”, अशी माहिती पोलीस अधीक्षक दिनेश कुमार यांनी दिली.

हे ही वाचा :

नक्षलवाद्यांचा पुन्हा नंगानाच, बॉम्बने घर उडवलं, 4 लोकांची हत्या करुन मृतदेह लटकवले, बुद्धाच्या पवित्र गयेत काय घडलं?

शिल्पा शेट्टी राज कुंद्राच्या विरोधात मुंबईत गुन्हा दाखल, कोटींच्या फसवणुकीचा आरोप

कंगना विरोधात पुण्यात तक्रार ; बेकायदेशीर कृती प्रतिबंधक कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी

Non Stop LIVE Update
मुलुंडच्या त्या घटनेवरून चित्रा वाघ यांचा टोला, 'मराठी आमचा धंदा...
मुलुंडच्या त्या घटनेवरून चित्रा वाघ यांचा टोला, 'मराठी आमचा धंदा...
प्रकाश आंबेडकर यांची इच्छा असेल तर, सीताराम येचुरी यांचे मोठे विधान
प्रकाश आंबेडकर यांची इच्छा असेल तर, सीताराम येचुरी यांचे मोठे विधान
'त्यांची उतरती कळा, उतावळापणा योग्य नाही,' ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
'त्यांची उतरती कळा, उतावळापणा योग्य नाही,' ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
गौतमी पाटील शाळेत नाचली; शिक्षणमंत्री म्हणाले, 'नाचवलं तो घरी जाईल'
गौतमी पाटील शाळेत नाचली; शिक्षणमंत्री म्हणाले, 'नाचवलं तो घरी जाईल'
राष्ट्रवादीच्या 'या' नेत्याने मनसेला डिवचले, म्हणाले 'राजसाहेबांनी...
राष्ट्रवादीच्या 'या' नेत्याने मनसेला डिवचले, म्हणाले 'राजसाहेबांनी...
'घान्याऐवजी ठाण्याला जा अन्...', संजय शिरसाट यांनी कुणाला फटकारलं?
'घान्याऐवजी ठाण्याला जा अन्...', संजय शिरसाट यांनी कुणाला फटकारलं?
KDMC | खड्डे बुजवले नाहीतर अधिकाऱ्यांना खड्ड्यात टाकू, कुणी भरला दम?
KDMC | खड्डे बुजवले नाहीतर अधिकाऱ्यांना खड्ड्यात टाकू, कुणी भरला दम?
माधुरी दीक्षित लोकसभेची निवडणूक लढणार? भाजप खासदार स्पष्टच म्हणाले...
माधुरी दीक्षित लोकसभेची निवडणूक लढणार? भाजप खासदार स्पष्टच म्हणाले...
आदू बाळा... म्हणत भाजप नेत्यानं आदित्य ठाकरेंना फटकारलं, काय केली टीका
आदू बाळा... म्हणत भाजप नेत्यानं आदित्य ठाकरेंना फटकारलं, काय केली टीका
मोठी घोषणा, 20 दिवसांपासून सुरु असलेलं ओबीसी समाजाचे आंदोलन स्थगित
मोठी घोषणा, 20 दिवसांपासून सुरु असलेलं ओबीसी समाजाचे आंदोलन स्थगित