AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोण आहे अडल्ट स्टार आरोही उर्फ रिया बर्डे?, मित्रामुळे थेट तुरुंगात…

उल्हासनगरमधून बांगलादेशी अडल्ट फिल्म स्टार आरोही बर्डेला अटक करण्यात आली आहे. तिच्या कुटुंबिांवरही अनेक आरोप लावण्यात आले आहेत. ती नक्की कोण आहे आणि तिला अटक नेमकी कशासाठी झाली, कोणामुळे झाली हे जाणून घेऊया.

कोण आहे अडल्ट स्टार आरोही उर्फ रिया बर्डे?, मित्रामुळे थेट तुरुंगात...
रिया बर्डे कोण आहे ?
| Updated on: Sep 27, 2024 | 1:01 PM
Share

आरोही की बन्ना शेख…? अडल्ट फिल्ममध्ये हे नाव बरंच प्रसिद्ध आहे. ही दोन्ही नावं एकाच अभिनेत्रीची आहेत, जिला उल्हासनगरमधून पोलिसांनी अटक केली. तिचं नाव आहे रिया बर्डे. रिया ही मूळची बांग्लादेशची रहिवासी आहे. मात्र रिया आणि तिचेकुटुंबिय हे बनावट कागदपत्रांचा वापर करून अवैधरित्या भारतात आले. भारत सरकारला फसवून हे कुटुंब बऱ्याच काळापासून भारतात आरामात राहत होतं, पण खोटं कधी ना कधी पकडलं जातंच ना. तसंच काहीस रिया उर्फ आरोही सोबतही झालं.

रियाच्या एका मित्रामुळेचं तिचं खोटं बोलणं, बनाव उघडकीस आला. त्यामुळे आता रिया आणि तिच्या संपूर्ण कुटुंबाविरोधातच कारवाई करण्यात येणार आहे.रिया ही तिची आई, बहीण आणि भावसोबत उल्हासनगरमध्ये रहात होती. हे सर्व जण बनावच कागदपत्रांचा वापर करून स्वत:ला हिंदू भासवत बऱ्याच काळापासून भारतात रहात होते. मिळालेल्या माहितीनुसार, रियाच्या आईने भारतीय कागदपत्रे तयार करण्यासाठी अमरावती येथील एका व्यक्तीशी लग्न देखील केलं होते. सध्या पोलिसांनी या प्रकरणात रियाशिवाय तिची आई अंजली बर्डे उर्फ ​​रुबी शेख, वडील अरविंद बर्डे, भाऊ रवींद्र उर्फ ​​रियाझ शेख आणि बहीण रितू उर्फ ​​मोनी शेख यांचीही नावे आरोपी म्हणून नोंदवली आहेत.

कतारमध्ये आहेत रियाचे पालक

आपण पश्चिम बंगालमधील असल्याचे रियाची आई सांगत असे. तिने अमरावतीमधील अरविंग बर्डे या इसमाशी लग्न केलं. त्यानंतर तिने स्वत:चं आणि मुलांचे खोटे जन्म प्रमाणपत्र आणि इतर बनावट कागदपत्रे बनवून भारतीय पासपोर्ट मिळवला. त्याद्वारे भारतीय नागिरक म्हणून ओळख सिद्ध करता येऊल असा तिचा हेतू होता. आरोही उर्फ रियाचे आई आणि वडील दोघेही सध्या कतारमध्ये राहत असल्याचं पलिसांना आढळलं.

यापूर्वीही झाली होती अटक

रिया उर्फ आरोही हिला यापूर्वी अटक करण्यात आली होती. मुंबई पोलिसांनी रियाला वेश्या व्यवसायाच्या एका प्रकरणात अटक केली होती. रियाचा मित्र प्रशांत मिश्रा याने पोलिसांना रिया बांगलादेशी असल्याची माहिती दिली. ती बांगलादेशी असल्याचं त्याला नुकतंच समजलं होतं. त्यानंतर त्याने पोलिसांना माहिती दिली, त्या अनुषंगाने पोलिसांनी तपास सुरू केला आणि तिला अटक केली.

अनिल पाटील अजितदादांच्या भेटीला, गळ्यात क्रीडा मंत्रिपदाची माळ पडणार
अनिल पाटील अजितदादांच्या भेटीला, गळ्यात क्रीडा मंत्रिपदाची माळ पडणार.
मुनगंटीवारांच्या विधानानं चंद्रपूरवरून भाजपमध्ये अंतर्गत संघर्ष उफाळला
मुनगंटीवारांच्या विधानानं चंद्रपूरवरून भाजपमध्ये अंतर्गत संघर्ष उफाळला.
CCI केंद्रावरील कर्मचाऱ्याला खोतकरांनी झापलं, शेतकऱ्यांना इंग्रजीत msg
CCI केंद्रावरील कर्मचाऱ्याला खोतकरांनी झापलं, शेतकऱ्यांना इंग्रजीत msg.
ठाकरे बंधूंचं ठरलं! युतीची उद्या घोषणा, 'या' 7 पालिकांसाठी एकत्र लढणार
ठाकरे बंधूंचं ठरलं! युतीची उद्या घोषणा, 'या' 7 पालिकांसाठी एकत्र लढणार.
महायुतीचं जागावाटप अंतिम टप्प्यात, भाजप-शिवसेनेचं 180 जागांवर एकमत
महायुतीचं जागावाटप अंतिम टप्प्यात, भाजप-शिवसेनेचं 180 जागांवर एकमत.
अखेर ठरलं ! दोन्ही NCP एकत्र, निवडणुकीबाबत मोठी अपडेट; इतिहास घडणार?
अखेर ठरलं ! दोन्ही NCP एकत्र, निवडणुकीबाबत मोठी अपडेट; इतिहास घडणार?.
जगतापांच्या राजीनाम्याचा सस्पेन्स वाढला, सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?
जगतापांच्या राजीनाम्याचा सस्पेन्स वाढला, सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?.
धमक अन् ताकद नाही... दानवेंनी थोपटले दंड, शिरसाटांना खुलं आव्हान
धमक अन् ताकद नाही... दानवेंनी थोपटले दंड, शिरसाटांना खुलं आव्हान.
ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होणार! संजय राऊत यांच्या ट्विटनं चर्चा
ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होणार! संजय राऊत यांच्या ट्विटनं चर्चा.
बिबट्यासाठी जंगलात बोकड सोडणार ही योजना...शेट्टींचा गणेश नाईकांचा टोला
बिबट्यासाठी जंगलात बोकड सोडणार ही योजना...शेट्टींचा गणेश नाईकांचा टोला.