परपुरुषाच्या बॉडीवर फिदा झाली प्रविणची पत्नी, तांत्रिकाच्या एण्ट्रीमुळे भयानक कांड… नेमकं काय घडलं?
पत्नी पळून गेल्यामुळे पती आणि ४ आरोपींनी एका तांत्रिकाची हत्या केली. खरं तर पत्नीला दुसऱ्या एका पुरुषाची बॉडी आवडली होती. त्यासाठी तिने एका तांत्रिकाची मदत घेतली. पण जेव्हा पतीला कळाले तेव्हा त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. नेमकं काय झालं जाणून घ्या...

दिवसेंदिवस पती आणि पत्नीच्या नात्यात फूट पडलेली प्रकरण सतत समोर येत आहेत. कोणी दुसऱ्या महिलेच्या प्रेमा्त पडत आहे तर कोणी पर पुरुषाच्या गोड बोलण्याच्या प्रभावाखासी येत आहेत. असेच काहीसे उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडामध्ये घडले आहे. येथून एक खळबळजनक प्रकरण समोर आले आहे. येथे राहत असलेल्या एका व्यक्तीच्या पत्नीचे मन बॉडीबिल्डरवर जडले. मग काय, ती त्या व्यक्तीसोबत पळून गेली. पण, हा धक्का तिच्या पतीला सहन झाला नाही. नंतर त्याने जे पाऊल उचलले त्याने सर्वजण थक्क झाले. आता नेमकं प्रकरण काय चला जाणून घेऊया…
नेमकं प्रकरण काय?
प्रविण नावाच्या व्यक्तीची बायको एका बॉडिबिल्डर मुलाच्या प्रेमात पडली. एक दिवसच अचानक ती त्याच्यासोबत पळून गेली. त्याला वाटले की त्याच्या पत्नीला पळवून नेण्यामागे तांत्रिकाचा हात आहे. त्याने तांत्रिकाचा बदला घेण्यासाठी इतका भयानक कट रचला की तो आता तुरुंगाच्या सळ्यांमागे पोहोचला आहे. प्रकरण बिसरख परिसरातील रोझा जलालपूर गावातील आहे. येथील रहिवासी असलेल्या तांत्रिक नरेश प्रजापतीच्या हत्येच्या प्रकरणात पोलिसांनी शुक्रवारी ५ आरोपींना अटक केली.
पोलिसांच्या मते, हत्येमागचे कारण अंधश्रद्धा होती. ५ पैकी एका आरोपीला संशय होता की तांत्रिकाच्या ‘अलौकिक शक्तीं’मुळे त्याची पत्नी दुसऱ्या व्यक्तीसोबत पळून गेली. याच कारणामुळे त्याने तीन महिन्यांपूर्वी हत्येचा कट रचायला सुरुवात केली होती. मृत नरेश प्रजापती ४५ वर्षांचा होता आणि २ ऑगस्ट रोजी तो बेपत्ता झाला होता. ३ ऑगस्ट रोजी त्याचा मृतदेह बुलंदशहरच्या एका नाल्यात सापडला. नातेवाइकांच्या तक्रारीवरून तपास सुरू झाला आणि पोलिसांनी इलेक्ट्रॉनिक सर्व्हेक्षणाच्या माध्यमातून पाच आरोपी – नीरज कुमार (हापूर), सुनील कुमार (दुजाना, ग्रेटर नोएडा), सौरभ कुमार आणि प्रवीन मावी (दोघेही बुलंदशहर रहिवासी) आणि प्रवीन शर्मा (रोझा जलालपूर, बिसरख) यांना अटक केली.
पत्नीच्या पळून जाण्यास तांत्रिकाला जबाबदार ठरवले
तपासात समोर आले की, प्रविण शर्माची पत्नी २०२२ मध्ये दुसऱ्या व्यक्तीसोबत घर सोडून गेली होती. शर्माला वाटत होते की, नरेश प्रजापती, जो त्यांच्या घरी नेहमी येत होता, त्याने तांत्रिक विधींद्वारे त्याच्या पत्नीवर प्रभाव टाकला आणि तिला पळवून नेले. याच गोष्टीमुळे तो सूडाच्या आगीत जळत होता. एसीपी दीक्षा सिंह यांनी सांगितले की, प्रवीन शर्माने आपल्या चार साथीदारांना या हत्येत सामील होण्यासाठी १०० गज जमीन आणि लक्झरी वाहन देण्याचे आमिष दाखवले. यापैकी एक आरोपी प्रवीन मावी याने बुलंदशहर येथील आपल्या घराजवळ मृतदेह ठिकाणी लावण्यास मदत केली.
अशा प्रकारे गुन्हा घडवला
आरोपींनी प्रजापतीला तांत्रिक विधी करण्याच्या बहाण्याने बोलावले. २ ऑगस्ट रोजी त्यांनी प्रजापतीला मारुती सुझुकी स्विफ्ट कारमध्ये बसवले आणि त्याच्याच ओठणीने गळा दाबण्याचा प्रयत्न केला. जेव्हा तो बेशुद्ध झाला, तेव्हा त्याला बुलंदशहरला नेऊन धारदार शस्त्राने डोक्यावर अनेक वार करून त्याची हत्या केली. नंतर त्याचा मृतदेह कालव्यात फेकण्यात आला. पोलिसांनी सर्व आरोपींना अटक करून तुरुंगात पाठवले आहे.
