ओसाड जंगल, जळालेला बॉडी अन् हेडमास्तर बायकोचं प्लॅनिंग; पतीच्या खुनाचा कांड कसा उघडा पडला?
यवतमाळ : गत पाच दिवसांपूर्वी चौसाळा टेकडीजवळ अर्धवट जळालेला मृतदेह आढळून आला होता. हा मृतदेह नेमका कुणाचा, याबाबत साशंकता होती. ओळख पटविणे पोलिसांसाठी अत्यंत अवघड होते. तरीदेखील स्थानिक गुन्हेशाखेतील पोलीस पथकाने ‘सूता’वरून स्वर्ग गाठत या जळीत हत्याकांडाचा पर्दाफाश केला. या बहुचर्चित हत्याकांडात मुख्य सूत्रधार पत्नी असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले असून या संपूर्ण हत्याकांडाला अनैतिकतेची […]

यवतमाळ : गत पाच दिवसांपूर्वी चौसाळा टेकडीजवळ अर्धवट जळालेला मृतदेह आढळून आला होता. हा मृतदेह नेमका कुणाचा, याबाबत साशंकता होती. ओळख पटविणे पोलिसांसाठी अत्यंत अवघड होते. तरीदेखील स्थानिक गुन्हेशाखेतील पोलीस पथकाने ‘सूता’वरून स्वर्ग गाठत या जळीत हत्याकांडाचा पर्दाफाश केला. या बहुचर्चित हत्याकांडात मुख्य सूत्रधार पत्नी असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले असून या संपूर्ण हत्याकांडाला अनैतिकतेची किनार असल्याचे उघड झाले आहे. विशेष म्हणजे कोचिंग क्लासमध्ये येणाऱ्या विधीसंघर्षग्रस्त विद्यार्थ्यांचा ‘यूज’करून अत्यंत थंड डोक्याने (कोल्ड मर्डर) जळीत हत्याकांड घडविल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.
मृतदेह जळालाले, ओळख पटत नव्हती
शंतनू देशमुख (32) रा. सुयोगनगर, लोहारा (यवतमाळ) असे मृत पतीचे नाव आहे. याच प्रकरणात त्याची पत्नी निधी (23) हिला पोलिसांनी प्रारंभी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. यवतमाळ ते किटाकापरा या मार्गावरील चौसाळा शेतशिवारात 15 मे रोजी जळालेला पुरुषी मृतदेह गुराख्याच्या निदर्शनास आला. त्यानंतर ही वार्ता वाऱ्यासारखी पसरून हा प्रकार लोहारा पोलिसांपुढे पोहोचला. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांच्या मार्गदर्शनाखाली लोहारा पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पथक घटनास्थळी पोहोचले. जळालेला मृतदेह असल्याने त्याची ओळख पटविणे हे मोठे आव्हान पोलिसांपुढे उभे ठाकले होते. परंतु स्थानिक गुन्हे शाखेत कार्यरत साहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मनवर यांनी ‘खबरी’ नेटवर्क आणि तपासी प्रक्रिया यातून या जळीत हत्याकांडाचा अवघ्या पाच दिवसात पर्दाफाश केला.
पोलिसांना लागत नव्हता मारेकऱ्याचा शोध
प्रारंभी पोलिसांनी या प्रकरणात ‘मिसिंग’चा आधार घेतला. मात्र या संदर्भात जिल्हाभरातच नव्हे तर इतरत्र ठिकाणी कुठलाही आधार मिळाला नव्हता. तपास प्रक्रियेचा पहिला भाग म्हणून मृत शंतनू देशमुख याची पत्नी आरोपी निधी हिला चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतले. ‘हैद्राबाद कस्टडी’ या माध्यमातून तिची सखोल चौकशी केली गेली. परंतु तपासाचा धागा नेमका शोधून काढण्यात पोलिसांना चार दिवस लागले.
गुललवर सर्च केलं कसं मारायचं
त्यानंतर मात्र या बहुचर्चित हत्याकांडाचे बिंग फुटले. पत्नीनेच अनैतिक संबंध आणि मद्यप्राशनातून विद्यार्थ्यांसमोर होणारी सततची मारहाण यातून ‘गुगल’वर सर्च करून अत्यंत थंड डोक्याने हे हत्याकांड घडवून आणल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. शंतनू देशमुख याची पत्नी निधी हिला पोलिसांनी अटक केली आहे.
विद्यार्थ्यांना घेतलं हाताशी, मग…
विशेष म्हणजे या बहुचर्चित हत्याकांडात आरोपी निधी देशमुख हिच्याकडे शिकवणीला येणाऱ्या 15 वर्षीय तीन विधीसंघर्षग्रस्त विद्यार्थ्यांनी हत्येनंतर मृतदेहाची विल्हेवाट लावली. 13 मे रोजी मध्यरात्री विष प्रयोग झाल्यानंतर शंतनू मृत पावला. त्यानंतर विधीसंघर्षग्रस्त विद्यार्थ्यांनी ही ‘बॉडी’ चौसाळानजीक दुचाकीवर नेऊन टाकून दिली. मात्र दुसऱ्याच दिवशी या हत्याकांडाचे बिंग फुटू नये म्हणून पत्नी आरोपी निधीने सदर तीनही विद्यार्थ्यांना परत त्याठिकाणी पाठविले. त्यांनी पेट्रोल ओतून शंतनूचा मृतदेह जाळून पुरावा नष्ट करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. या हत्याकांडाला मुर्तरूप देण्यासाठी मारेकरी पत्नीने इंटरनेटसह गुगलचा वापर केल्याचे पोलिसांच्या तपासात आणि जबाबात उघड झाले आहे.
पाच दिवसांत लावला शोध
वास्तविक मृतकाच्या ओळख पटविण्यासह या हत्याकांडाचा धागा उलगडणे पोलिसांसाठी एक मोठे आव्हान ठरले होते. परंतु या गुंतागुंतीच्या प्रकरणात साहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मनवर यांनी ‘खबरी’ नेटवर्कआणि आरोपी पत्नी निधी हिला ताब्यात घेतल्यानंतर बहुचर्चित हत्याकांडाचा अवघ्या पाच दिवसांच्या आत उलगडला केला.
